शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात…
राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असताना नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली.
नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली. या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “राज्यात राष्ट्रपती राजवट लवकर दूर व्हावी यावर आमच्या तिन्ही पक्षांचे एकमत आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होईल याबाबत मी खात्रीने बोलू (Sanjay raut meet Sharad Pawar) शकतो.”
“मी शरद पवारांना भेटायला गेलो हे खरं आहे. ते देशाचे, महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवारांच्या भेटीत राज्यातील शेतकरी आणि ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांनी राज्यात ओला दुष्काळाची पाहणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत पंतप्रधानांची भेट घेऊन काही करता येईल का याबाबत मी त्यांनी विनंती केली. राज्यातील एक प्रतिनिधी त्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून जावा. ओला दुष्काळाची माहिती त्यांनी दिली जावे यासाठी मी त्यांची भेट घेतली,” असे संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sanjay raut meet Sharad Pawar) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनतंर संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली.
“शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्याशी सत्तास्थापनेबाबत चर्चा केली नसेल, तर आम्ही याबाबत काय करणार,” असेही ते यावेळी (Sanjay raut meet Sharad Pawar) म्हणाले.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत नेमकं काय चाललं आहे याबद्दल मी बोलणे योग्य ठरणार नाही. तो वेगळा पक्ष आहे आणि आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही,” असेही संजय राऊत (Sanjay raut meet Sharad Pawar) म्हणाले.
“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे. ती लवकर दूर व्हावी याबाबत आमचे एकमत आहे. राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होईल,” असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला.
“आम्ही राज्यातील राजकारणाविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबद्दल त्यांना माहिती दिली. इतर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही नजर ठेवणार पुढे पावलं काय असणार हे ठरणार. या स्थितीबाबत त्यांचा विचार काय याबाबत चर्चा करणार. कोणासोबत सरकार बनवावं याबाबत कोणतीही चर्चा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येण्यावर काही जण नाराज आहेत. राजकीय स्थितीबाबत चर्चा करताना युती झालेल्या पक्षांनाही सोबत घेतलं पाहिजे. कोणासोबतच जायचं की नाही याबाबतच चर्चा झाली नाही”, असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं.