“प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, शिवसेनेसाठी!”, संजय राऊतांचं बाळासाहेबांना अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय...

प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, शिवसेनेसाठी!, संजय राऊतांचं बाळासाहेबांना अभिवादन
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 9:12 AM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. “साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी,प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी!”, असं म्हणत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा जुना फोटो त्यांनी शेअर केलाय.

हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है… साहेब… विनम्र अभिवादन ! जय महाराष्ट्र!, असं ट्विट करत संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना संजय राऊत यांची महत्वाची भूमिका राहिली. त्यांनी सातत्याने शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. पण पुढे काहीच दिवसात त्यांच्यावर आरोप करत शिंदेगटाने बंड केलं.  राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलं. त्यानंतर कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना अटक झाली. शिवसेनेत झालेल्या या सगळ्या बदलांनंतर आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन साजरा होतोय. त्यानिमित्त राऊतांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत.

आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलंय. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.