शिवसेना फार पुढे गेली आहे, त्यामुळे दरवाजा खुला आणि दारांच्या फटीला महत्त्व नाही: संजय राऊत
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Chandrakant Patil proposal) भाजपचे दावे खोडले आहेत.
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Chandrakant Patil proposal) भाजपचे दावे खोडले आहेत. भाजपचे दरवाजे खुले, खिडक्या उघड्या, दाराला फटी. कुणी कशातून घुसायचं हा प्रश्न राहिलाच नाही. ते प्रस्ताव मिळाला नाही असं म्हणत आहेत. यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 50-50 चा जो फॉर्म्युला ठरला होता तोच प्रस्ताव आहे, असं मत संजय राऊत यांनी (Sanjay Raut on Chandrakant Patil proposal) व्यक्त केलं.
संजय राऊत म्हणाले, “भाजपने आज फार समंजसपणे वक्तव्ये केली आहेत. मात्र, प्रस्ताव तोच आहे जो ठरला होता. ठरल्याप्रमाणे 50-50 चा प्रस्ताव होता. त्यापेक्षा अधिक काहीही नको.”
शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी : चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही.”