एवढं खोटारडं सरकार कधी पाहिलं नाही, राजकारणात इतका जळफळाट नको; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : उद्धव ठाकरे बारसूला जाणार, जनता त्यांचं स्वागत करणार आणि महाडला भव्य सभा होणार; संजय राऊतांचं वक्तव्य

एवढं खोटारडं सरकार कधी पाहिलं नाही, राजकारणात इतका जळफळाट नको; संजय राऊतांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 10:55 AM

मुंबई : मुंबईतील बीकेसी परिसरातील महाविकास आघाडीची काल वज्रमूठ सभा झाली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. या सभेवर शिवसेना-भाजप युतीकडून टीका करण्यात आली. त्याला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तसंच बारसूतील आंदोलनावरही राऊत भाष्य केलंय. उद्धव ठाकरे बारसूला जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आणि महाडच्या सभेच्या तयारीबाबतही राऊत बोललेत.

एवढं खोटारडं सरकार याआधी कधी पाहिलं नव्हतं. सध्याचं सरकार खोटारडं आहे. राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड जळफळाट सुरू आहे. पण इतका जळफळाट चांगला नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

ठाकरे बारसूला जाणार

रिफायनही प्रकल्पाविरोधात रत्नागिरीतील बारसूमध्ये आंदोलन होत आहे. स्थानिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तिथे स्थानिक लोकांना भेटायला उद्धव ठाकरे जाणार आहेत. “येत्या 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसूला जाणार आहेत. स्थानिक लोक त्यांचं उत्साहात स्वागत करतील. महाडलाही उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणालेत.

महाविकास आघाडीची सभा भव्यच!- राऊत

काल अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं की महाविकास आघाडीच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. महाविकास आघाडीवरचा विश्वास आणि नेत्यांवरील प्रेमापोटी लोक या सभेला आले होते. महाविकास आघाडीची सभा भव्यच होती. काही लोकांना ती दिसत नाही हा त्यांचा दोष आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मविआच्या कालच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद पाहता भाजप अजून दहा वर्षं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचं धाडस करेल, असं दिसत नाही. पण त्या आधीच महाराष्ट्र आणि दिल्लीत सत्तांतर नक्की आहे. भाजपचा दारूण पराभव निश्चित आहे. मुंबई शिवसेनेचीच आहे आणि राहणार, असंही संजय राऊत म्हणालेत.

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचीच विजय होणार. लोक गद्दारांच्या पाठीशी कधीही उभे राहणार नाहीत. लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विजय निश्चित आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.