Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य : राऊत
(Sanjay Raut Mansukh Hiren Death)
मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणतील सत्य जितक्या लवकर बाहेर येईल, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य ठरेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. (Sanjay Raut on Mansukh Hiren Suspicious Death)
विरोधीपक्षाने काही प्रश्न उपस्थित केले असतील, ते प्रश्न योग्य आणि मुद्देसूद असतील, त्यांच्याकडे याविषयी काही माहिती असेल, तर त्याचा तपास व्हायला हवा. मनसुख हिरेन यांचा मृत्यू धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली, याबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहेत. या शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.
तितकं या सरकारच्या प्रतिमेसाठी चांगलं
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये, कारण ती एक निरपराध व्यक्ती आहे, तिचा बळी कोणत्या कारणामुळे गेलाय, हत्या असो किंवा आत्महत्या, त्याला कोण जबाबदार आहे, याबाबतचं सत्य गृह खातं जितक्या लवकर बाहेर काढेल, तितकं या सरकारच्या प्रतिमेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी योग्य ठरेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू
विधानसभा अधिवेशन सुरु असताना महत्त्वाच्या गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू झाला. विरोधीपक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे. पीडित कुटुंबाचा आक्रोश माझ्यासाठी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसाठी वेदनादायक आहे, असं संजय राऊत म्हणाले. हा तपास एएनआयकडे देण्याची गरज नाही, मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, मी एखाद्या अधिकाऱ्याच नाव घेणार नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
27 फेब्रुवारीला काय घडलं?
मनसुख हिरेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून त्यांना फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातून 3 वाजता फोन आला. 1 मार्चला सायंकाळी 4 वाजता नागपडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली.
जॉईंट सी. पी. भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचं मनसुख हिरेन यांनी तक्रारीत म्हटलंय. बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणातील संशयित असल्याचं सागिंतल्याचं मनसुख हिरेन यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
(Sanjay Raut on Mansukh Hiren Suspicious Death)