Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘होय, शिवसेनेचा आकडा घटलाय!’ राऊतांनी मान्य केलं, वाचा संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्समधले 3 मोठे मुद्दे

Eknath Shine : संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत पुन्हा एकदा फुटलेल्या आमदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.

Sanjay Raut : 'होय, शिवसेनेचा आकडा घटलाय!' राऊतांनी मान्य केलं, वाचा संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्समधले 3 मोठे मुद्दे
संजय राऊत Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:08 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांच्या बंडखोरीचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीआंश आमदारांचा पाठिंबा आबे, हे त्यांच्या पत्रातून स्पष्ट झालंय. या सगळ्या घडामोडीवर संजय राऊत (Sanjay Raut on Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच शिवसेना आमदारांची (Shiv sena MLA) संख्या महाविकास आघाडीतून कमी झाली आहे, हे मान्य केलंय. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पहिल्यांदा सत्ता समीकरणाच्या गणितासोबत अन्य दोन मुद्द्यांवर महत्त्वाचं भाष्य केलंय. यावेळी महाविकास आघाडीसोबत बंडखोर शिवसेना आमदारांना उद्देशून संजय राऊत यांनी मांडलेले 3 मोठे मुद्दे कोणते होते, जाणून घेऊयात…

मुद्दा क्रमांक 1 – हो..शिवसेनेचा आकडा कमी झालाय

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र पाहता शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांचा महाविकास आघाडी सरकारमधील आकडा घटला असल्याचं मान्य केलंय. एकनाथ शिंदे यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे, यावर बोलताना संजय राऊतांनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय. कोण म्हणतं 40 आहे, कोण म्हणतं 140 आमदार त्यांच्याकडे आहेत. पण महाविकास आघाडी एकसंघ आहे, असं त्यांनी नमूद केलं. शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. लोकशाहीत बहुमत आकड्यांवर चाललं, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं, असंही ते म्हणालेत. आता ही सगळी कायदेशीर लढाई असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय.

मुद्दा क्रमांक 2 – भावनिक साद

दरम्यान, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत पुन्हा एकदा फुटलेल्या आमदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील…मुंबईत आल्यावर त्या आमदारांची निष्ठेची, बाळासाहेबांवर भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. सभागृहात हा विषय येईल, तेव्हा मविआच्या बाजूने आमचा निकाल लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

मुद्दा क्रमांक 3 – पवारांना धमकी, राणेंवर टीका

दरम्यान, नारायण राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. अशाप्रकरणा शरद पवारांना धमकावणं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीय. मोदी शाह यांनी याकडे लक्ष द्यावं, असं सांगतानाच संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरु असलेल्या हालचालींवरही त्यांनी निशाणा यावेळी निशाणा साधला.

वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.