Rajya Sabha Election : सचिन अहिर, पाडवींना सेनेचं विधान परिषदेचं तिकिट कन्फर्म? संजय राऊत म्हणतात, “अधिकृतपणे लवकरच जाहीर”
शिवसेनेकडून सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. "लवकरच अधिकृतपणे ही बाब जाहीर केली जाईल", असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मुंबई : विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेकडून सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. “लवकरच अधिकृतपणे ही बाब जाहीर केली जाईल”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
लवकरच अधिकृत घोषणा
शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. “सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचं नाव आधीपासूनच चर्चेत होतं. त्यांच्या नावाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संमती दिली. लवकरच अधिकृतपणे ही उमेदवारी जाहीर करण्यात येईल”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आमशा पाडवी कोण आहेत?
कट्टर शिवसैनिक आमशा पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण काँग्रेसचे नेते केसी पाडवी यांच्याकडून त्यांचा 2 हजार 96 मतांनी पराभव झाला. आज त्यांना शिवसेनेने विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात निवडणुकीचे रंग चढू लागले आहे. राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अश्यात आता विधान परिषदेसाठी दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. सध्या शिवसेना मोठ्या चेहऱ्यांपेक्षा कट्टर आणि स्थानिक नेत्यांना उनेदवारी देण्यावर भर देत असल्याचं दिसतंय. त्यातूनच राज्यसभेसाठीसंजय पवार आणि विधानपरिषदेसाठी आता आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
आमशा पाडवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. “मला खासदार संजय राऊत यांचा फोन आला. त्यांनी अनिल देसाई, आदित्य ठाकरे यांनीही मला याबद्दल सांगितलं, की विधान परिषदेसाठी आम्ही तुमचं नाव घेतलं आहे. दुर्गम भागात मी काम केलं. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचं माझ्या कामावर विश्वास ठेवत आज आमच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी दिली. मला याचा आनंद आहे. मी इथून पुढेही असंच चांगलं काम करीत राहिल”, असं आमशा पाडवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.