Sanjay Raut : मातोश्री ते दिल्ली | संजय राऊत यांच्या जामिनासाठी भाजपा तयार होईल ? अखेर सुनील राऊतांची भावासाठी धावाधाव

सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Sanjay Raut : मातोश्री ते दिल्ली | संजय राऊत यांच्या जामिनासाठी भाजपा तयार होईल ? अखेर सुनील राऊतांची भावासाठी धावाधाव
खा. संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत.Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 11:54 AM

मुंबई : राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत. ईडीने (ED) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. संजय राऊत यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आज अनोखे कनेक्शन आणि कुणालाही विश्वास बसणार नाही, असा प्रयत्न संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut)करत असल्याची चर्चा आहे. याविषयी अजून कुणीही खात्री केलेली नाही पण शक्यतांना वेग आला आहे.

संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, यानंतर सुनील राऊत हे थेट मुंबई विमानतळाकडून दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे.

सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटायला गेल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाच्या बड्या नेत्याकडून यात मध्यस्थीचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण संजय राऊत यांना खरोखर भाजपाकडून सॉफ्ट कॉर्नर दिला जाईल का? संजय राऊत यांच्याविरोधात आज भाजपाचे डझनाहून जास्त नेते आहेत, ते संजय राऊत यांना जामीन द्यावा, हे मनापासून मान्य करतील का? हे देखील प्रश्न आहेत.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांची सुटका व्हावी, म्हणून जो काही ४ भिंतीत कथित तह होईल, तो भाजपाला आणि संजय राऊत यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपातील नेत्यांना मान्य होईल का? जे कार्यकर्ते सोशल मीडियावर शिव्या खात होते आणि देत होते, त्यांना देखील हे मान्य होईल का?

जे संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला घायाळ करत होते, सामनामधून टीकेचे बाण सोडत होते, ज्या संजय राऊतांनी शेवटपर्यंत मातोश्रीसोबत आपलं नातं अधिक विश्वासाचं आणि घट्ट आहे हे दाखवून दिलं. ते राऊत यूटर्न घेतील का? भाजपा नेते किरिट सोमय्या यानंतर शांततेची भूमिका घेतील का?

दुसरीकडे संजय राऊत हा अनोखा तह झाला, तर बाहेर येऊन शांत बसतील का, किंवा भाजपासोबतचा कथित तह होईल, तर तो मान्य करतील का? संजय राऊत जेलमध्ये राहण्याच्या भीतीने तयार होतील असं वाटतं का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.