Sanjay Raut PC : ‘कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत’, राऊतांचं थेट आव्हान
सकाळपासून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित लोकांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवलाय.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय. आज सकाळपासून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित लोकांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवलाय.
संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचं तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. ज्या ईडी अधिकाऱ्यानं निवडणूक लढवली त्यानं पन्नास जणांचा खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. मी अतिशय जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाही. तर भ्रष्टाचारही साफ करायला हवा, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय.
जितेंद्र नवलानीवरुन राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत पुढे म्हणाले की, मागच्या काही वर्षापासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट त्यांचं एक नेटवर्क बिल्डर, डेव्हलपर आणि कॉर्पोरेटरला धमकावण्याचं काम करतंय. ईडीकडून या सगळ्यांकडून वसूली केली जातेय. या सगळ्यांचे डॉक्यूमेंट्स दिले आहेत. जितेंद्र नवलानी हे सगळ्यात महत्वाचं नाव आहे. 60 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसूल केले आहेत. यात कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्यांनी ईडी चौकशी केली. त्या कंपन्यांची ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलानी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
ED और अन्य केंद्रीय जांच एजेंसियों को यही काम रह गया है कि जहां-जहां शिवसेना का कार्यकर्ता हैं, जहां-जहां शिवसेना की शाखा है, जहां-जहां शिवसेना के लोग चुनाव लड़ने जा रहे हैं। वहां छापा मारेंगे: शिवसेना नेता संजय राउत pic.twitter.com/xK6YAC5D8r
— ANI_HindiNews (@AHindinews) March 8, 2022
ईडी अधिकाऱ्यांना राऊतांचा इशारा
2017 ईडीनं दिवाणा हाऊसिंग फायनान्सची चौकशी सुरु केलीय. जितेंद्र नवलानीच्या कंपनीला 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2020 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून नवलानीला 10 कोटी ट्रान्सफर केले. नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले. 15 कोटी रुपयांबाबत अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. सेक्यूरिटी ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश, चेक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन, असा इशाराही राऊतांनी यावेळी दिलाय.
Mumbai police will begin the investigation of criminal syndicate and extortion racket by a nexus of ED officials. Mark my words, some of these ED officers will go to jail too: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/yFPCEmBtAF
— ANI (@ANI) March 8, 2022
मुंबई पोलीस तपासासाठी सक्षम
मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. एफआयआर मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नवलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलिस आजपासून चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस सक्षम आहेत, असा दावा करत राऊत यांनी एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांना आणि भाजपला इशारा दिलाय.
ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा- राऊत
ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी आज तुमच्यासमोर आणला आहे. पुढच्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांच्या नावासकट सगळं सांगेन. या सगळ्याचा सूत्रधार कोण ते मी तुम्हाला सांगेन. आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कुणाच्या इशाऱ्यावर आमच्यावर कारवाया सुरु आहेत? पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असं थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलंय.
इतर बातम्या :