Sanjay Raut Video: राजकारणाच्या पिचवरील ओपनर संजय राऊत थेट क्रिकेटच्या मैदानात! जोरदार शाब्दिक फटकेबाजी
संजय राऊत आज पुण्यात थेट क्रिकेटच्या (Cricket) मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी जोरदार (शाब्दिक) फटकेबाजी केली. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो, आज मैदानावरही केली, असं संजय राऊत म्हणाले.
पुणे : राजकारणाच्या पिचवर शिवसेनेची किंबहुना महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) खिंड भक्कमपणे लढवताना आपण शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) नेहमी पाहतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची होणारी कोंडी असेल, संजय राऊत महाविकास आघाडीचे ओपनर बॅट्समन राहिले! भाजपसह सर्वच विरोधकांना वार ते सहजतेनं स्वीकारतात आणि त्याच तडफेनं परतवूनही लावतात. हेच संजय राऊत आज पुण्यात थेट क्रिकेटच्या (Cricket) मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी जोरदार (शाब्दिक) फटकेबाजी केली. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो, आज मैदानावरही केली, असं संजय राऊत म्हणाले.
मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो आज मैदानावर केली. मला राजकारणात स्टम्पच्या मागे राहून खेळाडूला यष्टिचित करायला आवडतं. मी एकही चेंडू खाली जाऊ देत नाही, असे शाब्दिक षडकार संजय राऊत यांनी लगावले.
संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका
देशात सध्या दिलासा घोटाळा सुरू आहे. त्याला विविध कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना मेळाव्याच्या निमित्ताने ते सध्या शहरात आहे, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात ज्याप्रकारची राजवट सुरू आहे, त्यावरून असे वाटते की इंग्रजांची राजवट सुरू आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. नवनीत राणा यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या वागणुकीवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सवाल उपस्थित केला होता, त्यावर विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका करत इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा चांगली होती, अशी टीका केली.
‘इंग्रजांची राजवट बरी होती असं म्हणायची वेळ’
देशात ज्याप्रकारची राजवट सुरू आहे, त्यावरून असे वाटते की इंग्रजांची राजवट सुरू आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. नवनीत राणा यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या वागणुकीवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सवाल उपस्थित केला होता, त्यावर विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका करत इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा चांगली होती, अशी टीका केली.