Sanjay Raut Press Conference : पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी सोमय्यांचे थेट संबंध, राऊत म्हणाले, पुराव्यानिशी सांगतोय, पूर्ण क्रोनोलॉजी सांगितली
किरीट सोमय्या यांच्या या आरोपांना आज खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. इतकंच नाही तर राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी थेट संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
मुंबई : भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या यांच्या या आरोपांना आज खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. इतकंच नाही तर राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank Scam) गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी (Rakesh Wadhwan) थेट संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. आमचे 19 बंगले काढतात. ईडीकडे काम नाही का? महाराष्ट्रातील लोकांच्या मागे लागता काय? तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय. तुम्ही शिवसेना आणि महाराष्ट्रासोबत पंगा घेतलाय, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचलनालयाला आणि किरीट सोमय्या यांना दिलाय.
किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, ‘तुमचे प्रिय असतात ना ततपप करत, त्यांनी म्हणे पीएमसी बँक घोटाळा काढला. दुसरा एक काढलाय पत्रा चाळ या सगळ्याशी आमचा संबंध लावला. मला तर ती बँकही माहीत नाही. आणि त्यांनी ज्यांची नावं घेतलेली आहेत, ते सगळे माझे मित्र आहेत. मी टाळणार नाही. पळपुटा नाही मी. आता ते वारंवार सांगतात की पीएमसी बँक घोटाळ्याचे पैसे वापरतात. राकेश वाधवान हा त्यातला एक आरोपी आहे. तो एक मोठा बिल्डर होता. बरंच काय काय सांगतात. आमचे सगळ्यांचे त्यांच्यासंबंध आहेतस अंसम्हणतात. त्याचे पैसे वापरतात असं म्हणतात. आता मला सांगा की राकेशला तेव्हा कोण ओळखत नाही. राकेशच्या अकाऊंटमधून भाजपच्या खात्यावर 20 कोटी गेले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.
नील सोमय्या आणि किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप
ईडी वाले सुनो.. सीबीआयवाले सुनो.. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे तो एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारचो की निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची, नील सोमय्याची आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि त्याला लुबाडलं आणि आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. तब्बल 100 कोटी घेतले. लडानीच्या नावावर त्यांनी जमीन घेतली. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी खरेदी केली. त्यांनी अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सौमय्या आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केलाय.
सोमय्यांचा निकॉन प्रकल्पाची चौकशी करा- राऊत
निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली, तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे की याची ताबडतोब चौकशी करा, नील सोमय्याला अटक करा. राऊत पुढे म्हणाले की, मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, असा टोलाही राऊतांनी सोमय्या यांना लगावलाय. तसंच देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी राऊत यांनी केलीय.
इतर बातम्या :