Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर राजकारणात ठिणग्या, भाजपचा पलटवार
Sanjay Raut Press Conference LIVE : शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात (Shiv sena Bhavan, Dadar) आज (मंगळवार 15 फेब्रुवारी, 2022) पत्रकार परिषद घेणार आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेनेच्या आजच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेकडे (Press conference of Sanjay Raut) लागलं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत हे महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट करण्याची शक्यताय. मोठ्या संख्येनं शिवसेनेचे कार्यकर्ते हे शिवसेना भवनाच्या दिशेनं निघालेत. दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुढची पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काय खळबळजनक खुलासे केले जातात, याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची नजर लागली आहे. भाजपचे (Bhartiya Janata Party) साडे तीन लोक तुरुंगात जातील असा आरोप संजय राऊतांनी केला होता.आता ते साडेतीन लोक कोण आहे, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचंही राऊतांनी म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेसह राजकीय घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जाणून घेऊयात यांच संदर्भातले ताजे आणि वेगवान अपडेट्स
LIVE NEWS & UPDATES
-
नारायण राणे उद्या काय बोलणार?
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची उद्या बुधवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सांध्यकाळी 4.00 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
-
चंद्रकांत पाटलांनी राऊतांची खिल्ली उडवली
गेले २-३ दिवस मोठी गोष्ट बाहेर काढणार असल्याचा कांगावा यांनी केला. जगात आजपर्यँत कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही, यांचीच पहिल्यांदा होत आहे, असे हे वागत होते. या सर्वातून शेवटी ‘खोदा पहाड निकला चुहा’ असं सिद्ध झालं. इतरांविषयी बोलताना अपशब्दांचा वापर करणं ही यांची संस्कृतीच आहे. pic.twitter.com/wozD7lAIjI
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 15, 2022
-
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
आम्हीही झुकणार नाही
संजय राऊतांना कंबोज यांचे खुले आव्हान
संजय राऊतांचे स्मग्लरशी संबंध काय? हे मी येणाऱ्या काळात सांगेल
मी त्यांचे कॉल रेकॉर्डींग देणार आगामी काळात
संजय राऊत माझ्या घरी आलेले फोटो बघा
मोहीत कंबोज यांनी फोटो दाखवले
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
आज मुंबईत एवढी मोठी कारवाई झाली, त्यावर तुम्ही का गप्प बसले?
ही जुगलबंदी जोडी कोण आहे, त्यांच्याशी तुमचा संबंध काय आहे?
संजय राऊतांची आरोप खोटे, नवाब मलिकांसारखे हे उघडे पडले आहेत
पाटकरबरोबर संजय राऊतांचा संबंध यावरही उत्तर द्या
संजय राऊत आज लोकांसमोर एक्स्पोज झाले आहेत
मी संजय राऊत यांना लीगल नोटीस पाठवणार
ही सलीम जावेदची जोडी देशात एक्स्पोज झाली आहे
कंगनाचे घर तोडण्याचे काम तुम्ही केले
नारायण राणेंवर खोटी केस तुम्ही केली
नितेश राणेंवर इगोसाठी केस केली
रवी राणा यांच्यावरही खोटे आरोप तुम्ही केले
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
प्रवीण राऊतांनी सत्तेचा दुरूपयोग करून 175 एकर जमीन एका बिल्डरला विकली
हा पाच हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे
यात प्रवीण राऊत यांना साडेसातशे कोटी मिळाले
त्यात संजय राऊतांना किती कट मिळाला?
संजय राऊत आणि ग्रॅन्ड हयात हॉटेलचा काय संबंध आहे?
संजय राऊत यांचा स्मग्लर लोकांशी काय संबंध आहे?
यात संजय राऊतांना किती कोटी मिळतात?
मोहीत कंबोज यांच्याकडून सवालांची सरबत्ती
-
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
प्रवीण राऊतांबरोबर मिळून संजय राऊतांनी स्कॅम केला
माझेच त्या स्कॅमध्ये नुकसान झाले आहे
फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन खोटे आरोप करू नका
माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, पूर्ण प्रकरणाची चौकशी करा
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
जमीन स्वस्त घेतली सांगता
एवढी जमीन तर आहे का? मुंबईत
बारामतीची वनस्पती खाऊन बोलत होता का?
मी राकेश वाधवान याच्यावर केलेला एफआयआर आहे
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
मी फडणवीसांशी प्रामाणिक आहे
पण तुम्ही पवारांशी प्रमाणिक आहे की उद्धव ठाकरेंशी?
आज तुमच्याबरोबर एकही सत्तेतला माणून नव्हता
आजचा तुमचा शो फ्लॉप होता
तुम्ही आरोप केले तर तुम्हाला आधी अभ्यासाची गरज
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
2017 ला दरवर्षी संजय राऊत माझ्या घरी आले
दरवर्षी ते माझ्या घरी गणपतीला येतात
मग ओळखत नाही, तर गजनी झाले का?
राऊतांनी अनेकदा माझ्याकडून पैसे घेतले
-
भाजप नेते मोहीत कंबोज Live
सलीम जावेदमधील जोडीतल्या जावेदने प्रेस कॉन्फरन्स घेतली
राऊत मोठ्या नेत्यांबाबत बोलतात
माझ्यासारख्या सदोतीस वर्षाच्या मुलाशी सरकार लढत आहे
मला अनेक खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला
खोट्या स्टोरी घेऊन बाजारात येतात
-
फडणवीसांनी राऊतांच्या आरोपांची धास्ती घेतली?
फडणवीस दिल्लील जाण्याची शक्यता
चंद्रकांत पाटील आधीच गेलेत
-
नितेश राणेंची राऊतांवर घणाघाती टीका
चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!!
चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !!
याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2022
-
राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठी मोहीत कंबोज मैदानात
All Media Are Invited For #PressConference At My Residence Khushi Belmondo Santacruz At 6.15 Pm today For All Answers !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 15, 2022
-
कुणाची नावं घ्यायची त्याची घ्या-राऊत
एकादा माणूस अडचणीत आल्यास त्याचा थयथयाट होतो
तुमच्या मुलीच्या लग्नाची चौकशी होते, तर कायतर दोष असेल
काही दोष नसेल तर न्यायलय ईडीला विचारणा करेल
गेले दोन दिवस दवंडी पिटत होते
राऊतांच्या गळ्याशी आरोप आल्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांना वाकवून यंत्रणा राऊतांनी राबवली
-
चंद्रकांत पाटलांनी राऊतांची खिल्ली उडवली
खोदा पाहड आणि निकला चुहा
आशा आरोपांनी काय होत नाही
पुरावे आहेत, तर एजन्सीकडे जा
त्यांनी नाही ऐकलं तर कोर्टाकडे जा
आम्ही कोर्टाच्या निर्णयांमुळेच टीकलो आहोत
-
संजय राऊतांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
मी चाणाक्य आहे असा अभास संजय राऊतांना झाला आहे
राऊतांच्या ईडी मागे लागली हे मला माहीत नाही
राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील खर्चाची चौकशी केली आहे
आपल्यावर आरोप झाले म्हणून माझ्यावर आरोप करू नये
संजय राऊत नऊ कोटींचं नाही तर नऊ लाखांचं कार्पेट म्हणाले
शिवसेनेचे कॅबिनेटमध्ये मंत्री होते
त्यांना त्यावेळी कळलं नाही का? शिवसेनेचे मंत्री जागरूक होते
-
शिवसेनेचे आमदार का आले नव्हते?-दरेकर
राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार-दरेकर
-
खोदा पहाड, निकला चूहे का फोटो-मुनगंटीवार
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत काहीही निघालं नाही,
संजय राऊतांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल-फडणवीस
-
संजय राऊत तोंडवर आपटले-दरेकर
छातूरमातूर गोष्टी करून काय होणार नाही-दरेकर
पुरावे द्या आणि सोमय्यांना जेलमध्ये टाका
राऊतांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही
सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते
एकतर सरकार तुमचं ऐकत नाही
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल
जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
देवेंद्र फडणवीसांचा आणकी एक फ्रंट मॅन आहे मोहीत कंबोज नावाच
फडणवीस तुम्हाला बुडवणार आहे
पत्राचाळमध्ये मोहीत कंबोज याचा प्रोजेक्ट सुरू आहे
आणि आमच्यावर भष्टाचाराचे आरोप करतोय
या प्रोजेक्टमध्ये पीएमसी घोटाळ्याचे पैसे लागले आहेत
फडणवीसांचा ब्लू एन्ड बॉय आहे, याकडे एवढा पैसा कठून आला, हे फक्त फडणवीसांनाच माहीत आहे
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार
2024 मध्ये परिवर्तन होणार
हा फक्त ट्रेलर आहे
येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार
दिल्लीत जावा नायतर कुठेही जावा तुम्ही वाचणार नाही
राऊतांनी भाजपला ठणकावलं
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
अमित शाह, मोदींना माझा सवाल आहे, हीच तुमची लोकशाही आहे का?
माझ्या जवळच्या लोकांवर रेड सुरू झाल्यावर मी अमित शाह यांना फोन केला
त्यांना सांगितलं माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा
माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न
पण मला जेलमध्ये टाकण्यासारखी जेल अजून बनली नाही
अलिबागमदून 80 वर्षाच्या वृद्धाला उचलून नेलं
ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथेच तू मरणार म्हणून धमकावलं
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
ईडीची लोकं कुठं बसतात, कुठं खातात, कुठं पितात, सगळं तुम्हाला सांगू शकतो,
सगळ्यांची माहिती आहे..
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसची तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत.. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता… सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो.. ईडी भ्रष्ट आहे, हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावाय
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
ईडी आणि सीबीआय, ईओडब्लू, पंतप्रधान, गृहमंत्री मला ऐकत आहेत
मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी किसकी है?
किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत
किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे
पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि जमीन घेतली दुसऱ्याच्या नावावर
वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
मी पळपुटा नाही, मी माझ्या मित्रांना टाळणार नाही
माझ्या मित्रांना मुद्दाम फ्रेम केले
पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख
राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले
राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
भाजपच्या काळात पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला
कोण आहे अमोल काळे ?
पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्या हातात आहे
ते ईडीला देणार
आमची गुंठ्यातली जमीन मोजली, आमचे नसणारे बंगले दाखवले
आता भाजपला मीही दाखवतो
ईडीने चुकीच्या माणसांशी पंगा घेतला आहे
ईडीने शिवसेना आणि महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
ईडीची टक्कर शिवसेनेशी आहे
हरयाणातला दूधवाला नरवरला ईडी ओळखते का?
नरवर 7 हजार कोटींचा मालक कसा झाला?
महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरात त्याचं येणं जाणं होतं
भाजपच्या मनी लॉन्ड्रीगच्या केसेस लवकरच देणार
साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले
भाजपच्या काळातल्या भ्रष्टाचारातून गेले
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
भाजपच्या वनमंत्र्यांच्या मुलीचे लग्न ईडीला दिसले नाही का?
माझं खुलं आव्हान आहे ईडीला, तुम्ही मला जेलमध्ये टाकून दाखवा
मात्र माझ्याबरोबर भाजपवालेही जेलमध्ये असतील
मी जिथे कपडे शिवून घेतले तिशेही ईडीवाले गेले
आता फक्त बुटवाल्याकडे जाण्याचे बाकी आहेत
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
लोकांना तिहारच्या जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या
माझ्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला लागले आहेत
फुलवाले, पताकावाले, मेहंदीवेल्याडे पण ईडीवाले गेले
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
मी कधीही चुकीचे काम केलं नाही
ईडीच्या लोकांनी सकाळी माझ्या बँकेची स्टेटमेंट नेली
ईडीच्या लोकांनी माझ्या 50 गुंठे जमिनीची चौकशी केली
पाहटे चार वाजता ईडीने घरातून लोक उचलले
माझ्या विरोधात खोट्या साक्ष लिहून देण्यास जबरदस्ती केली
त्यांना अनेक तास डांबून ठेवलं
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे घेतली हे दाखवावं
बाराव्या माणसाकडून पाटणकरांनी जमीन घेतली
राऊतांनी पूर्ण यादी वाचली
पाटणकर आणि देवस्थानाचा काही संबंध नाही
आम्ही देवस्थानाकडून जमीनी खरेदी केल्या नाहीत
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
मराठी माणसाविषयी भाजपला द्वेष
किरीट सोमय्यांनी काही वर्षापूर्वी मराठी भाषा सक्तीची नसावी असं अपील केलं होतं
आणि मुंबईत भाजप मराठी कट्टा चालवते
हाच तो, भडवा, दलाल, कोर्टात जातो आधी याचं थोबाड बंद करा
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
किरीट सोमय्यांचा भडवा, दलाल म्हणून उल्लेख
माझं आव्हान आहे त्या दलालाला, आपण चार बसेस करून पिकनीकला जाऊ
जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन
आणि जर बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू
कुठे आहेत एकोणवीस बंगले?
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो
मात्र सुरूवात इथे शेवट ईडीच्या कार्यालयापुढे करू
इतके घाणेरडे राजकारण कधी झालं नाही
महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे
आम्ही मागे हटणार नाही
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
वडिलांना अटक करू अशा मुलांना धमक्या दिल्या गेल्या
असे राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही
गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ले झाले
मुख्यमंत्र्यांनी मला लोकांसमोर सत्य मांडण्यास सांगितलं
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्रास दिल्यास आम्ही झुकणार नाही
आम्हाला बाळासाहेबांनी झुकायला शिकवलं नाही
काहीही करा हे सरकार पडणार नाही
हे सांगितल्यापासून माझ्या आजुबाजुच्या लोकांना अडकवण्याचा प्रयत्न झाला
माझ्यावरील सर्व आरोप खोटे,
मराठी माणसाने धंदा करू नये असे यांना वाटते
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
मी नकार दिल्यानंतर पवारांवरील धाडीबाबत सांगितलं
त्यानंतर पवारांच्या कुटुंबियांवर धाडी पडू लागल्या
ईडीचे लोक तिथे ठाण मांडून बसले
याच धमक्या त्यांनाही दिल्या
केंद्रीय पोलीस आणून थंड पाडण्याची धमकी
हे बोलल्यानंतर माझ्यावर आणि माझ्या लोकांवर तीन दिवसांत धाडी सुरू
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रमुख लोक मला भेटले
त्यांनी मला सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडण्यास सांगितले
आमची संपूर्ण तयारी झाली आहे
राष्ट्रपती राजवट आणू, अन्यथा आमदार फोड, पण सरकार आणू
असे भाजप नेते म्हणाले
तुम्ही आम्हाला मदत केली नाही, तर तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील, फिक्स करतील
याची सर्व सेटिंग दिल्लीत झाली आहे, तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, अशा धमकी दिल्या
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे
सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत आहे
एकशे सत्तरचे बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे?
उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, ते सर्व त्या पत्रात आहे
माझ्यासारख्या लोकांना त्रास दिला जातोय
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
महाराष्ट्र गांडूची औलाद नाही
आम्ही घाबरणार नाही
कितीही वार केले तरी आम्ही थांबणार नाही
अनेक आमच्या नेत्यांना त्रास दिला गेला
राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना त्रास दिला गेला
केंद्रीय तपास यंत्रणेचे आमच्यावर हल्ले
हे देशावरचे संकट आहे
असेच सरकार पश्चिम बंगालमध्येही आलं आहे
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
बाळासाहेब सांगायचे कुणाच्या बापाला घाबरू नका
गुन्हा केला नसेल तर निडर रहा
मुख्यमंत्री हीच सेना पुढे नेत आहेत
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
संपूर्ण शिवसेना इकडे उपस्थित आहे
राऊतांनी जुन्या सहकाऱ्यांची नावं घेतली
मुख्यमंत्र्यांना माझा शिवसेना भवनातून नमस्कार
आता मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन आलेला
मुख्यमंत्री वर्षावरून पत्रकार परिषद पाहत आहे
सर्वांनी मला आशिर्वाद दिले
महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमक सुरू आहे
त्याविरोधत कोणीतरी रणशिंग फुंकायला हवे होते
ते आम्ही इथून फुंकत आहोत
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
जय महाराष्ट्र, करून पत्रकार परिषदेला सुरूवात
मला वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे-राऊत
बाळासाहेब ठाकरे यांना राऊतांचं अभिवादन
या वास्तूला एक महत्व आहे
अनेक लढे आम्ही याच वास्तू मधून लढलो
अनेक हल्ले पचवले
नुसते हल्ले नाही, अतिरेकी हल्ले पचवले
या वास्तूखाली बॉम्बस्फोट झाले
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
संजय राऊत पत्रकार परिषदेत बसले
आता कुणाची पोलखोल होणार?
बोलण्याआधी राऊतांनी फाईली कुठे आहेत विचारलं?
राऊतांचा सहकाऱ्यांना सवाल
राऊतांनी सर्व फाईली मागवून घेतल्या
राऊतांच्या फाईलींमध्ये कोणते मोठे गुपीत?
-
संजय राऊतांची पत्रकार परिषद Live
पत्रकार परिषदेआधी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण
आनंदराव अडसूळ, दिवाकर रावतेही पुष्पहार अर्पण करण्यास उपस्थित
-
संजय राऊत पत्रकार परिषदेत दाखल
शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या सोबत
मुंबईच्या महापौरही राऊतांच्या सोबत
खासदार विनायक राऊत पत्रकार परिषदेत संजय राऊतांसोबत
-
पत्रकार परिषदेला कोणते नेते उपस्थित?
खासदार अरविंद सावंत
खासदार विनायक राऊत
कामगार नेते, शिवसेना उपनेते सचिन अहिर
खासदार अनिल देसाई
आमदार मनीषा कायंदे
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के
आमदार रवींद्र फाटक
आमदार सदा सरवणकर
मंत्री उदय सामंत
शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित
संजय राऊत एकटे पडले म्हणून भाजपचे नेते सांगत होते
मात्र संजय राऊत एकटे नाहीत हे भाजपला दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते, आमदार, खासदार, मंत्री उपस्थित
-
आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शांत-शिवसैनिक
भाजप चिरीमिरी आहे,
कुठे फाडून फेकून देऊ कळणार नाही,
मुंबईत शिवसैनिकांचा एल्गार
बाप हा बाप असतो, भाजपच्या डिवचण्याचा फरक नाही पडत
-
राऊत सेना भवनात दाखल होताच एकच जल्लोष
शिवसेना खासदार संंजय राऊतांचं कार्यकर्त्यांना हात उंचावून प्रतिसाद, सेना भवनात राऊत दाखल होताच एकच जल्लोष
शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात दाखल @rautsanjay61 @ShivSena थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात pic.twitter.com/lnTqPEXdoP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2022
-
उरली अवघी काही मिनिटं
काही मिनिटात संजय राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊत शिवसेना भवनात दाखल
शिवसैनिकांची मोठी घोषणाबाजी
मुंबई जिंकणे हे भाजपचे केवळ स्वप्न-कार्यकर्ते
-
संजय राऊतांनी हात वर करून अभिवानदन केलं
सेनाभवनात शिवसैनिकांची मोठी गर्दी
संजय राऊतांना सेनाभवनात नेताना मोठी गर्दी
संजय राऊत शिवसेना भवनाच्या आत दाखल
-
शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
संजय राऊत दाखल झाल्यावर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह
शिवसैनिकांची भाजवविरोधात जोरदार घोषणाबाजी
गर्दीतून मार्ग काढत शिवसैनिकांची गाडी पुढे
बर्दाश किया अब बर्बाद करेंगे नारा खरा ठरणार?
-
संजय राऊत सेनाभवनात दाखल
संजय राऊत शिवसेना भवनात दाखल
कोणत्या घोटाळ्याचा गौप्यस्फोट?
संजय राऊतांना सुरक्षा रक्षकांचा गराडा
सेनाभवनात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली
-
संजय राऊत खुद्द बोलतील तेव्हा सर्व स्पष्ट होईल-बांदेकर
काही मिनिटात राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊत काय बॉम्ब फोडणार
भाजप नेत्यांची ऐनवेळी दिल्ली वारी
भाजप नेत्यांबाबत बोलणं राऊतांनी टाळलं
-
मोठ्या संख्येनं शिवसैनिक दाखल सेनाभवनात दाखल
मोठ्या संख्येनं शिवसैनिक सेना भवनात दाखल झाले आहेत. बहुप्रतीक्षित पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातले शिवसैनिक सेना भवन परिसरात दाखल झाले आहेत.
-
आदेश बांदेकरसह अनेक सेना नेते सेनाभवनात दाखल
आदेश बांदेकरसह अनेक नेते सेना भवनात दाखल, संजय राऊतही सामना कार्यालयातून सेना भवनाच्या दिशेनं निघाले
-
संजय राऊत शिवसेना भवनाकडे रवाना
संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी रवाना
संजय राऊत सामनाच्या कार्यालयातून निघाले
काही मिनिटात राऊतांची पत्रकार परिषद
-
मनसेचा ट्विट करून शिनसेनेला टोला
अभी तो टॉस हुआ है – आदित्य ठाकरे
पत्रकार परिषद म्हणजे सिक्सर आहे – सुप्रिया सुळे
शिवसेना भवनाबाहेर मोठं स्क्रीन – बातमी
अरे, पत्रकार परिषद आहे की क्रिकेटची मॅच आहे??
– अमेय खोपकर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 15, 2022
-
आत्ताची सर्वात मोठी अपडेट
भाजप नेत्यांची दिल्ली वारी
किरीट सोमय्याही दिल्लीला रवाना
भाजप नेत्यांच्या अचानक दिल्ली वारीने चर्चांना उधाण
संजय राऊतांकडे कुणाची फाईल? कुणाचा व्हिडिओ
-
शिवसेनेची नेतेमंंडळी जमण्यास सुरूवात
संजय राऊत यांचे पक्षातील निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी आणि बाळा कदम सामनात दाखल
-
‘चोर की दाढी में चुगार’ नवनीत राणांचा राऊतांवर टीका
संजय राऊत दरोरोज नऊ वाजता पत्रकार परिषद घेतात त्यात काही नवीन नाही. रोज पोपट येऊन बोलतात. त्यांना सवय झाली आहे. त्यात काहीच नसते. चोर की दाढी मे चुगार, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना ईडी ची भीती वाटत आहे. तुमचे काळे धंदे असेल तर ते ही बंद होईल,संविधान ला मागे ठेऊन हे सरकार काम करत आहे अशी टीका खासदार नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे. -
किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणारे शिवसैनिक मुंबईकडे रवाना
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला पुण्याहून शिवसैनिक मुंबईकडे निघालेत,
– शिवाजीनगरहून मुंबईकडे रवाना,
– शिवसेना शहरप्रमुखांसह नगरसेवक आणि शिवसैनिकांचा समावेश,
– किरीट सोमय्यांना धक्काबुक्की प्रकरणातील शिवसैनिक मुंबईकडे रवाना,
-
खा. नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत दरोरोज नऊ वाजता पत्रकार परिषद घेतात त्यात काही नवीन नाही..
रोज पोपट येऊन बोलतात.त्यांना सवय झाली आहे. त्यात काहीच नसते.
चोर की दाढि मे चूगार अशी त्यांची परिस्थिती आहे.त्यांना ईडी ची भीती वाटत आहे…
तुमचे काळे धंदे असेल तर ते ही बंद होईल,संविधान ला मागे ठेऊन हे सरकार काम करत आहे..
खा. नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका…
-
शिवसेना भवनाजवळ वाहतूक मंदावली, पर्यायी मार्ग वापरा! पोलिसांचं आवाहन
चार वाजता संजय़ राऊत यांची पत्रकार परिषद, शिवसेना भवनाच्या जवळ झाले वाहतुकीची कोंडीमुंबई पोलिसांनी मार्ग बदलण्याबाबत केले होते ट्विट, ट्राफिक होऊ नये म्हणून केले होते ट्विटमुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की गडकरी चौक, दादर, मुंबई येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल गार्डन ते गडकरी जंक्शन ते राजबढे चौक दोन्ही वाहिनीवर दुपारी 14.00 ते 18.00 वा पर्यंत वाहतुक संथ गतीने चालू राहू शकते. कृपया आपण नमूद वेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 15, 2022
-
जयप्रभा स्टुडिओ सिनेसृष्टीसाठी वापरता यावा हे कोल्हापूरकरांची पहिल्यापासूनच भावना
जयप्रभा स्टुडिओ सिनेसृष्टीसाठी वापरता यावा हे कोल्हापूरकरांची पहिल्यापासूनच भावना
लतादीदींच्या स्मृती जपण्यासाठी जयप्रभा स्टुडिओत स्मारक करण्यासंदर्भात अनेकांनी भूमिका
मात्र आता याची विक्री झाल्याचे समोर आले
आता या जागेबाबत शासन स्तरावर काय करता येईल याबाबत विचार करून
जागेची किंमत ठरवून जयप्रभा स्टुडिओ जागा घेता येईल का यासाठी प्रयत्न करू
चित्रनगरीला जयप्रभा स्टुडिओ जोडता येईल का या ही दृष्टीने ही प्रयत्न करणार
मूळ मालक मंगेशकर कुटुंबीय आहेत आता विक्री झाली आहे त्यामुळे या वादात पाडण्यात अर्थ नाही
मंगेशकर कुटुंबाने ही स्मारका बाबत वाद करू नये अशी भूमिका घेतली आहे
आता मागे काय घडलं यापेक्षा पुढे चांगलं काय करत येईल हे पाहूया
वादानंतर मूळ मालकांनी केलेल्या मागणीवर शासकीय स्तरावर चर्चा सुरू होईल त्यावेळी यावर बोलता येईल
अमित देशमुख, एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊ
मालकांकडून लेखी मागणी आल्या शिवाय निर्णय घेता येणार नाही
जयप्रभा संदर्भात लता दीदी हयात असतांना त्यांची भेट मागितली होती मात्र कोरोनामुळे त्या कोणाला भेटत नव्हत्या
-
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगरपंचायती काँग्रेसची एक हाती सत्ता
शांततेत पार पडली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया
कोरची नगरअध्यक्ष हर्षलता भैसारे काँग्रेस,
उपाध्यक्ष – हिरा राऊत काँग्रेस
कोरची नगरपंचायत मागील पाच वर्ष शिवसेना अडीच वर्ष भाजप अडीच वर्षे सत्तेत होते
पण आता काँग्रेसने एकहाती सत्ता या ठिकाणी हासिल केलेली आहे
-
‘झुकेंगे नहीं!’ शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी
वाघाच्या फोटोवर झुकेंगे नहीं, असं म्हणत शिवसेनेची सेना भवनाबाहेर पोस्टरबाजी
-
तब्बल 4 तास छापेमारी! हसीना पारकरच्या घरातून ED अधिकारी अखेर निघाले
हसीना पारकरच्या घरी चालली तब्बल 4 तास ईडीची छापेमारी, चार तासांच्या छापेमारीनं ईडीचे अधिकारी हसीना पारकरच्या घरातून निघाले
-
कोल्हापूरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
कोल्हापूरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
दसरा चौक ते जिल्हाधिकारी असा निघणार मोर्चा,
केंद्र सरकारने खत़ाची दरवाढ कमी करावी ,पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती कमी करा,
वीज कनेक्शन कापू नका या मागणीसाठी आज काढणार मोर्चा,
राजू शेट्टी करणार मोर्चाचं नेतृत्व,
-
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी सुरु
शिवसेना भवनातून घेतलेला थेट आढावा, दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी तयारीला वेग
पाहा व्हिडीओ-
-
मोठी बातमी! छोटा शकीलचा नातेवाईक ईडीच्या ताब्यात
छोटा शकीलचा नातेवाईक सलिम प्रुट ईडीच्या ताब्यात, गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईकला अखेर ताब्यात घेण्यात आलं, आता कसून चौकशी सुरु
-
शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त
आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आहे.
-
देवळा नगरपंचायत नगराध्यक्षपदी भारती आहेर
-देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदी भाजपच्या भारती आहेर यांचा यांची वर्णी…
-विरोधात एकही अर्ज नसल्याने फक्त घोषणेची औपचारिकता बाकी…
-१७ पैकी १५ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारती आहेर यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे…
-भाजपचे नेते केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आल्याने केदा आहेर यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे..
-
नारायण राणेंच्या घरात सिधुदुर्गमधील घरासमोर आंदोलन
सिधुदुर्गमधील नारायण राणेंच्या घरासमोर आंदोलन पोलिसांचा बंदोबस्त आंदोलनात नारायण राणेच्या विरोधात घोषणा
-
ईडी गुजरातमध्ये कधी जाणार? राऊतांचा सवाल!
ईडी गुजरातमध्ये कधी जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. नेमकं संजय राऊत यांनी काय म्हटलंय, पाहा व्हिडीओ –
-
केंद्रानं 7 वर्षात काय केलं? सुप्रिया सुळे आक्रमक
ICE चा गैरवापर सुरु आहे, विरोधी पक्षातच नोटीशी कशा येतात, याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, विरोधात असल्या की नोटीस येतात, भाजपमध्ये गेल्या की नोटीस कशा विरघळतात हा प्रश्नच आहे, लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय, असं सुप्रियाा सुळे यांनी म्हटलंय. तसंच गुजरात बँक घोटाळ्यावरुनही त्यांनी हल्लाबोल केलाय. या देशात कुठल्याही राज्यात घोटाळा असेल, तर त्यांची जबाबदारी केंद्राने घ्यावी, इतक्या वर्षाचा हिशोब नको का द्यायला? 7 वर्षाचा हिशोब सांगा, मग चेक्स आणि बँलन्से एकाच कंपनीत कशा राहून केल्या, त्याचं स्पष्टीकरण केंद्रानं द्यावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
-
चंद्रपुरात पहाटेच्या सुमारास वाघोबाचे दर्शन
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार,
या भागात कार्यरत कामगारांना झाले दर्शन, या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे जातो मार्ग,
वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव ठरत आहेत कामगारांसाठी धोकादायक,
वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज
-
राऊत सामना कार्यलयात पोहोचले!
शिवसेना खासदार संजय राऊत सामना कार्यलयात दाखल, आज संध्याकाळी काय बोलणार याकडे लक्ष
-
आज 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद!
शिवसेना भवनात दुपारी 4 वाजता पार पडणार पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष, संजय राऊत मोठे गौप्यस्फोट करण्याची दाट शक्यता
-
आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये किरीट सोमय्यांनी दाखल केला गुन्हा
आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 89 पानी पोलिस तक्रार 7 दिवसात गुन्हा दाखल करणार राऊतांच्या जवळच्या लोकांवर गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई का केली नाही. सुजीत पाटकरला अटक का केली नाही संजय राऊतांनी नौटकी बंद करावी. चहावाल्याची नीट चौकशी करा सुजीत पाठकरला अटक करा
-
मी जेलमध्ये जायला तयार, पण… – सोमय्या
संजय राऊतांना मी मूर्ख वाटलो काय? आता मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण त्याआधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. सोमय्यांचा राऊतांना थेट चॅलेंज
-
आझाद नगर पोलिस स्थानकात सोमय्यांची तक्रार
किरीट सोमय्या यांनी 89 पानांची तक्रार आझाद नगर पोलिस स्थानकात दिली आहे. राऊतांच्या निकटवर्कीय पाटकर यांनी कोविड पेशंटच्या जीवाशी खेळ केला, धंदा केला,कोट्यवधी रुपये लाटल्याचा पुन्हा एकदा आरोप सोमय्यांनी केलाय. सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. सात दिवसांत एफआयआर दाखल करा, नाहीतर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये केस फाईल करणार, अशा इशारा त्यांना दिलाय. इटरनर हेल्थ केअरचं रजिस्ट्रेशन करताना बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
-
राऊतांकडून शिवसेना भवनाबाहेरुन फोटो ट्वीट!
आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच संजय राऊत यांनी सकाळी सेना भवनाबाहेरुन फोटो ट्वीट करत आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/pZwS2WCXWg
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 15, 2022
-
नाशकातून मुंबईच्या दिशेनं सेना कार्यकर्ते रवाना!
शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले
संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित
घोषणाबाजी देत शिवसेनेचे नेते निघाले
-
सौ सोनार की एक लोहार की, आजच्या पत्रकार परिषदेच्या आधी राऊतांची सूचक इशारा
आजच्या पत्रकार परिषदेआधी काय म्हणाले संजय राऊत?
Published On - Feb 15,2022 10:32 AM