AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना भवनासह, शाखा, प्रॉपर्टी आमचीच!! शिवसैनिक तिथंच बसतील, संजय राऊत यांनी ठणकावलं…

निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

शिवसेना भवनासह, शाखा, प्रॉपर्टी आमचीच!! शिवसैनिक तिथंच बसतील, संजय राऊत यांनी ठणकावलं...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2023 | 11:10 AM
Share

कणकवली : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असेल, हा निर्णय निवडणूक आयोगाने (Election commission) दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेना पक्ष शिंदे यांचा म्हटल्यावर शिवसेना भवनासह प्रत्येक जिल्हा, गावा-गावातील शिवसेनेची कार्यालयं, तिथली प्रॉपर्टी एकनाथ शिंदे यांची अर्थात शिवसेनेची होणार हे निश्चित मानलं जातंय. आता उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक कुठे बसणार, पुढील रणनीती कशी ठरवणार, यावरून अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. संजय राऊत यांनी यावरून ठणकावून सांगितलंय. शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. शिवसैनिक तिथेच बसतील. तिथेच बसून काम पाहतील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

‘शिवसेनेला खतम करण्याचे मनसुबे’

निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ देशातली राज्यशकट फक्त शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरलं आहे. एवढा धसका यांनी घेतला आहे. या भीतीतून आणि सूडभावनेतून केलेलं हे कृत्या आहे. हे लोकशाही मार्गाने केलेलं कृत्य नाही. लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार आहे. जनता हे सहन करणार नाही.

‘आयोगाचा गळा दाबून…’

आहे त्या परिस्थितीत निवडणूक घ्यायची हिंमत नव्हती. म्हणून तुम्ही आयोगाचा गळा दाबून हा निर्णय घ्यायला भाग पाडला आहे. निवडणूका घ्या, शिवसेना कुणाची हा फैसला जनतेला करू द्या, असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. महाराष्ट्रातल्या जनतेत कालपासून एक भावनिक वातावरण निर्माण झालंय. चीड आणि संताप आहे. राज्यात पश्चिम बंगालसारखा निकाल लागण्याची खात्री देतो. प. बंगालमध्ये मोदी-शहा- त्यांच्या पक्षाने पश्चिम बंगालच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि वणवा पेटला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी खेळ केलाय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

‘महाशक्ती विरुद्ध शिवसेना अशी लढाई’

उद्धव ठाकरे यांनी काल ना मर्द शब्द वापरला. ते मर्द होते तर स्वतःचा पक्ष घेऊन लढायला हवं होतं. भाजपने हा खेळ सुरु केला. त्यातले हे पात्र. मिंधे गट आणि शिवसेना अशी लढाई नाही. मिंधे गटामागे असलेली सो कॉल्ड महाशक्ती विरुद्ध शिवसेना अशी आहे.

‘त्याच तडफेनं झेपावणार…’

ज्या पद्धतीचं सूडाचं राजकारण सुरु आहे. त्यावर विश्वास ठेवतो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे अशा प्रकारच्या घटनात्मक पदावर नेमून हवे तसे निर्णय मिळवायचे, याला मी नियतीचा फेरा मानत नाही. राज्यपाल असतील, राजभवन, इलेक्शन कमिशन, न्यायव्यवस्था असेल.. तिथे ही कळसूत्री बाहुली आहे. तुम्हाला हवे ते निर्णय मिळवता. या देशात लोकशाहीचं अस्तित्व राहिलेला नाही. हा निर्णय झालेला असला तरी आम्ही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेपवणार, तडफेनं झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. काळाच्या पोटात काय दडलंय, हे कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.