Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉब लिंचिंग करणारे हिंदूविरोधी, सरसंघचालकांचं वक्तव्य, राऊत म्हणतात, ‘वक्तव्यामागे काही विशेष संदेश आहे का?’

गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात. पण हे भाजपला मान्य आहे काय? असा सवाल आजच्या सामनातून विचारला गेला आहे. | Saamana Editorial

मॉब लिंचिंग करणारे हिंदूविरोधी, सरसंघचालकांचं वक्तव्य, राऊत म्हणतात, 'वक्तव्यामागे काही विशेष संदेश आहे का?'
संजय राऊत, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 6:59 AM

मुंबई : मुसलमान हे या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत असे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी गर्वाने सांगितले. फक्त त्यांनी स्वतःला भारतीय मानावे असे भागवत म्हणाले. तसंच मुस्लिमांना देश सोडून जायला लावणारे हिंदू नाहीत, असंही सरसंघचालक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial)सरसंघचालकांच्या वक्तव्यावर भाजपला टोमणे मारण्यात आलेत. धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे, सरसंघचालकांना असं वक्तव्य करावं लागलं, यापाठीमागे काही संदेश आहे का?, असं विचारत अग्रलेखातून भाजपला टोला लगावण्यात आलाय. (Sanjay Raut Saamana Editorial on RSS SarsanghChalak Mohan Bhagwat Statement on Hindu Muslim)

सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले, त्यामागे काही विशेष संदेश आहे काय?

मुसलमान हे या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गर्वाने सांगितले. फक्त त्यांनी स्वतःला हिंदुस्थानी मानावे असे भागवत यांचे मागणे आहे. हिंदू हा सहिष्णू, तितकाच विनम्र आहे. त्याने आक्रमणकारी मोगलांचा प्रतिकारही सहनशीलतेनेच केला. मोगल आक्रमक होते म्हणून हिंदूंनी त्यावर तलवार चालवली. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे राष्ट्रीयत्वच होते. भागवत यांनी त्याचाच पुरस्कार केला आहे. धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे. ते थांबवा! सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले. त्यामागे काही विशेष संदेश आहे काय?

निवडणूक राज्याची असो किंवा देशाची दंगल, धर्मद्वेष हाच ‘त्यांचा’ अजेंडा

सर्व हिंदुस्थानींचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, हिंदुस्थानात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. त्यावर आता राष्ट्रीय चर्चा व्हायला हरकत नाही. मुळात असे काय घडले की, सरसंघचालकांना मुसलमानांना त्यांच्या ‘डीएनए’ची आठवण करून द्यावी लागली.

लोकांना काय नको हे भाजपला समजलं आहे काय?

गेल्या पाच-सहा वर्षांत देशाचे वातावरण अतिफाजील, उन्मादी लोकांच्या हाती गेले. निवडणूक राज्याची असो नाहीतर देशाची, दंगली, उन्माद, धार्मिक फाळणी, धर्मद्वेष हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा अजेंडा राहिला. पण हा ‘उन्माद’ प. बंगालात अजिबात चालला नाही. किंबहुना केरळातही भाजप स्टाईल हिंदुत्व लोकांनी स्वीकारलं नाही. उत्तर प्रदेशात वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे. हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय?

भागवतांचे विचार झटकून टाकता येण्यासारखे नाहीत

गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात व राष्ट्रीय ऐक्य हेच देशाला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल, असे स्पष्ट करतात. भागवत यांनी मांडलेले विचार झटकून टाकता येणार नाहीत. उन्मादी पद्धतीने राज्य चालविणाऱ्यांचे कान सरसंघचालकांनी टोचले आहेत.

(Sanjay Raut Saamana Editorial on RSS SarsanghChalak Mohan Bhagwat Statement on Hindu Muslim)

हे ही वाचा :

राज्यपालांनी 12 रोखले, भास्कर जाधवांनी 12 ‘बाद’ केले, भाजपानं आयती संधी दिली? वाचा सविस्तर

पदोन्नतीसह मुस्लिम आरक्षणासाठी आठवलेंचा एल्गार, उद्या आझाद मैदानात रिपाइंचं आंदोलन

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठाकरे सरकारनं का घेतला? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.