यूपी, बिहारसाठी मोदींच्या टार्गेटवर महाराष्ट्र सरकार, राऊत म्हणतात हा तर महाराष्ट्राचा अपमान !
शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल लोकसभेत दिलेल्या उत्तरावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.
नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल लोकसभेत दिलेल्या उत्तरावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केलाय त्याविषयी महाराष्ट्र सरकारनं बोलावं, असं संजय राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं. कोरोना या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक आरोग्य संघटनेनंही मांडणी केलीय. त्या महामारीचं खापर महाराष्ट्रावर खापर फोडण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले सुप्रीम कोर्टानं, हाय कोर्टानं इतरांना दिले होते. डॉक्टर, नर्सेस यांनी काम केलं होतं. हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील बोलायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या सरकारनं बोलावं
संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर बोलताना सोनू सूद हे कोणाचे होते, सोनू सूदला राज्यपालांकडं कोण घेऊन जातं होतं, असा सवाल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी बोलावं, असं ते म्हणाले. राज्य सरकारमध्ये बसलेल्यांनी बोलावं, प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का?, असा सवाल देखील त्यांनी केला.
सोमय्यांनी बायडनला भेटावं
किरीट सोमय्यांच्या आरोपांचं पोलीस पाहतील. किरीट सोमय्यांनी राज्यपालांकडे जावं. त्यांनी जो बायडन यांना भेटावं, आंतरराष्ट्रीय न्यायलयात जावं. कायद्याचं राज्य आहे, कोणावरही खुनी हल्ला झाला असेल तर कायदा काम करतो, असं देखील संजय राऊत म्हणाले न्यायालयांचे मालक आम्ही नाही, न्यायलयांचे मालक कोण आहे ते सर्वांना माहिती आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
महागाईला जागतिक परिस्थिती जबाबदार असते, मात्र कोणत्याही सरकारला महागाईच्या खाईत मरताना पाहता येईल का?, असं देखील संजय राऊत म्हणाले. निवडणुका आहेत, जाहीरनामा प्रसिद्ध होत असेल, त्यात चांगल्या गोष्टी असतील तर त्याचं आम्ही स्वागत करु. राज्यासाठी, राष्ट्रासाठी चांगली पाऊलं उचलली असतील तर त्या गोष्टी आम्ही घेऊ, असं संजय राऊत म्हणाले. भाजपशी आमचं काय नळावरचं भांडण आहे का? असं संजय राऊत म्हणाले
इतर बातम्या:
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग कोर्ट निर्णय देणार?