बदनामीकारक व्यंगचित्रामुळे हल्ला, सेनेकडून अप्रत्यक्ष समर्थन, भाजपची सडकून टीका

कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही", अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे (Sanjay Raut Shivsena talk on Ex Navy Officer).

बदनामीकारक व्यंगचित्रामुळे हल्ला, सेनेकडून अप्रत्यक्ष समर्थन, भाजपची सडकून टीका
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 11:39 PM

मुंबई : “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही”, अशी भूमिका शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या एका निवदेनाद्वारे मांडली आहे. हे निवेदन संजय राऊत यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. शिवसैनिकांनी काल (11 सप्टेंबर) कांदिवलीत राहणाऱ्या 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण केली होती. याप्रकरणावर आज (12 सप्टेंबर) शिवसेनेने निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडली (Sanjay Raut Shivsena talk on Ex Navy Officer).

“महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूने पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध फुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने, एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे”, अशी भूमिका शिवसेनेने संजय राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मांडली आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया 

“सत्तेचा माज आणि मस्ती काय असते हे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी दाखवून दिले आहे. तसेच त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांना मारहाण झाल्याचे समर्थन केल्याचेही दाखवून दिले. मला आश्चर्य वाटते. एका बाजूला बोलतात कायदा हातात घेणाऱ्याची गय नाही आणि त्याच वेळेला शिवसेना शाखाप्रमुखांनी कायदा हातात घेतला. त्याच्यांवर या महाविकास आघाडी सरकारवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या प्रकरणावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या असतानाही शिवसैनिकांनी केलेली मारहाण किती योग्य हे याठिकाणी संयज राऊत यांनी दाखवून दिलं. हे कायद्यासाठी आणि लोकशाहीच्या राज्यासाठी धोकादायक आहे”, असं विधानपरिपषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेच्या भूमीकेवर आपली प्रतिक्रिया मांडली.

काय आहे प्रकरण?

मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्याकडील ‘महानगर -1’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राजकीय पुढार्‍यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले. या कारणावरुन कमलेश कदम आणि इतर आठ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला मारहाण करत डोळ्याला दुखापत केली म्हणून समतानगर पोलीस ठाणे येथे कलम 325, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.(Sanjay Raut Shivsena talk on Ex Navy Officer).

संबंधित बातम्या :

नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन

नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.