साळवींपाठोपाठ कोकणातील ठाकरे गटाच्या दुसऱ्या मोठ्या नेत्याकडून खंत व्यक्त, संजय राऊत म्हणाले…
"थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात. विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात. तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला पक्ष मोठा वाटतो" रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया.

“मला लोकांनी समजावलेलं तुम्ही सुरेश धस यांची बाजू घेऊ नका, ते कधीही पलटी मारतील. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुरेश धस एकच आहेत. ही त्यांच्या स्वार्थाची लढाई आहे. दुर्देवाने ते सत्य होताना दिसतय. मला वाईट वाटतं एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रुचा बाजार मांडला, व्यापार केला. ती लहान मुल न्यायासाठी धसांच्या मागे धावत होती” अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजपा आमदार सुरेश धस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टीका केली.
“सुरेश धस यांनी असं कृत्य केलं असेल, तर देव त्यांना क्षमा करणार नाही. इतिहास त्यांना क्षमा करणार नाही. बीडची जनता, राज्यातली जनता हे लक्षात ठेवेल. त्यांनी असं केलं असेल तर ते विश्वासघाताच्या पुढचं पाऊल आहे” असं संजय राऊत म्हणाले. “धसांकडून न्यायाची अपेक्षा ठेऊ नका, असं बीडचे लोक वारंवार सांगत होते. कराड, धनंजय मुंडे आणि धस एकच आहेत. मला अपेक्षा आहे धस यांच्याकडून असं कुठलही कृत्य झालेलं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘एकनाथ शिंदे यांचा स्वत:चा कोणताही पक्ष नाही’
पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला संपवून टाका, असं शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलय. त्यावर राऊत म्हणाले की, तो “अमित शाह यांचा पक्ष आहे. अमित शाहना जे हवं ते शिंदे बोलतात. एकनाथ शिंदे यांचा स्वत:चा कोणताही पक्ष नाही. अमित शाह यांनी शिवसेनेचा एक गट फोडला आणि तो शिंदे यांच्या ताब्यात दिला. अमित शाह यांनी शिंदेंकेडे पक्ष चालवायला दिलाय”
भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले
क्षमता असूनही मला काम करायची संधी मिळाली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “काल चर्चा झाली आहे. आज आम्ही सगळे शिवसेना नेते एकत्र भेटत आहोत. कोणाची काही खंत असेल त्यावर चर्चा करु”