Sanjay Raut : अजय चौधरी यांचं तिकीट कापलं जाण्याच्या मुद्यावर संजय राऊत म्हणाले….
Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाच्या मुंबईतील काही आमदारांचा डच्चू मिळेल असं बोललं जातय अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर या दोघांना मातोश्रीवरच्या बैठकीच निमंत्रण नव्हतं असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
“काँग्रेस हायकमांडने आज चर्चा करण्यासाठी रमेश चेन्नीथला यांना पाठवलं आहे. मी कोणावरही व्यक्तीगत टिप्पणी केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची, धोरणात्मक भूमिका असते. मी उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय कधीच काही बोलत नाही” असं संजय राऊत म्हणाले. नाना पटोले बैठकीत असले, तर चर्चा होणार नाही अशी भूमिका होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अशा भूमिका आमच्या पक्षाकडून मांडल्या जात नाहीत. अशा भूमिका कोणी घेत नाही”
उद्धव ठाकरे गटाच्या मुंबईतील काही आमदारांचा डच्चू मिळेल असं बोललं जातय अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर या दोघांना मातोश्रीवरच्या बैठकीच निमंत्रण नव्हतं असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “एकाच दिवशी सगळ्यांना आमंत्रण दिलं जात नाही. अजय चौधरी हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. ते गटनेते आहेत. अजय चौधरी यांच्याविषयी अशा अफवा पसरवल्या जात असतील तर ते चुकीच आहे”
अजय चौधरी यांची उमेदवारी धोक्यात का आली?
मातोश्रीवर गुरुवारी बैठक झाली. त्या बैठकीच अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे या दोघांच तिकीट कापलं जाणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर दोघेही मागच्या दोन टर्मपासून आमदार आहेत. चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर यांच्याजागी माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवडीतून अजय चौधरी यांच्याजागी लालबाग राजा मंडळाचे सुधीर साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेना फुटल्यानंतर अजय चौधरी हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. त्यांना विधानसभेत गटनेता बनवण्यात आलं. याच निष्ठेमुळे त्यांचं तिकीट पक्कं मानलं जात होतं. पण लोकसभेला त्यांच्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना अपेक्षित लीड मिळाला नाही. हे अजच चौधरी यांची उमेदवारी धोक्यात येण्यामागच एक कारण आहे.