राज्यसभेतील भाषणाचे पोस्टर इस्लामाबादमध्येही झळकले, संजय राऊत म्हणतात…
भाषणाचे पोस्टर्स पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही लागले आहेत. पाकिस्तानमधील एका तरुणाने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय हे भारतीय आमच्याच देशात येऊन त्यांचे पोस्टर लावत असल्याबद्दल त्याने राग व्यक्त केलाय. व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र साजिद नावाचा तरुण आपण पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगतोय.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढण्याला शिवसेनेना पाठिंबा देत निर्णयाचं जोरदार स्वागत केलं. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निर्णयाला पाठिंबा देताना राज्यसभेत केलेलं भाषणही चांगलंच गाजतंय. विशेष म्हणजे त्यांच्या (Sanjay Raut) भाषणाचे पोस्टर्स पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही लागले आहेत. पाकिस्तानमधील एका तरुणाने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय हे भारतीय आमच्याच देशात येऊन त्यांचे पोस्टर लावत असल्याबद्दल त्याने राग व्यक्त केलाय. व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र साजिद नावाचा तरुण आपण पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगतोय.
कलम 370 रद्द करण्यासाठी राज्यसभेमध्ये शिवसेनेची भूमिका मांडली. त्याचे पोस्टर पाकिस्तानमध्ये लागले आहेत. याचा अर्थ असा होतो की शिवसेनेचे विचार पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. गुगलवर संजय राऊत इन पाकिस्तान सर्च केल्यावर व्हिडीओजमध्ये संजय राऊत यांचे शिवसेनेचे विचार दिसत आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.
वाचा – Article 370 | संजय राऊत म्हणाले, संविधानावरचा डाग धुतला, अमित शाहांनी अभिमानाने बाक वाजवला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण आपण पाकिस्तानी असल्याचं सांगतो. साजिद नावाच्या या तरुणाने त्याच्याच देशावर म्हणजे पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली आहे. आज जम्मू काश्मीर घेतलं, उद्या पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेऊ असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. आपण कोणत्या दिशेने जातोय. आपल्याच देशात भारतीयांकडून असे पोस्टर लावले जात आहेत, असं या तरुणाने म्हटलंय.
VIDEO : संजय राऊतांचं धडाकेबाज भाषण