“…तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती”, संजय राऊत यांचा घणाघात

काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्या आहेत, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. आता संजय राऊतांनी नारायण राणेंवर घणाघात केला आहे

...तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती, संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut Narayan Rane
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 12:13 PM

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आता याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर सरकारमधील अनेक नेत्यांनी बेताल वक्तव्य केली आहेत. काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्या आहेत, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. आता संजय राऊतांनी नारायण राणेंवर घणाघात केला आहे

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी नारायण राणेवर टीका केली. जर कोणत्या राज्यात झालं असतं तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती, असा घणाघात संजय राऊतांनी केला. तसेच संजय राऊतांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ओपन चॅलेंज दिले. हिंमत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल अशी बेताल विधाने करणाऱ्या मंत्र्याला जोड्याने मारा, असं आव्हानच संजय राऊतांनी दिलं.

“तुम्ही शिवभक्त असाल तर रस्त्यावर उतरायला हवं होतं”

“मोदींच्या काळात पूल कोसळला. दीडशे लोक मेले. त्यावर बोला म्हणावं. राणे तुम्ही खासदार आहात. तुम्ही मराठी माणूस आहात. तुम्ही तरी विचार करून बोला. कुणाची बाजू घेत आहात. हे जर कोणत्या राज्यात झालं असतं तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती. तुमच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला. तुम्ही खासदार आहात. तुम्ही शिवभक्त असाल तर रस्त्यावर उतरायला हवं होतं”, असे संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“या कामात पैसे खाल्ले. महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपये खाल्ले. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार सर्व गायब आहे. मुख्यंत्र्याच्या मुलाला विचारा कंत्राटदार कुठे आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला विचारा आपटे कुठे आहे? नेव्हीने काय बनवलं? हा पुतळा पीडब्ल्यूडीने बनवला. तुमचं सरकार जबाबदार आहे. फडणवीस आमचं तोंड उघडू देऊ नका. तुमचं पाप आहे. महाराजांचा पराभव अफजल खान, औरंगजेब करू शकला नाही. भाजप आणि फडणवीस यांची विकृत मनोवृत्तीने महाराजांचा पराभव झाला आहे”, असाही घणाघात संजय राऊतांनी केला.

नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.