‘शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल’, संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांना निर्वाणीचा इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. राऊत उद्या शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शिवसेना भवन परिसरात पाहणी केली. तसंच शिवसेनेच्या सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचनाही दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि उद्या महाराष्ट्र बोलणार आहे, अशा शब्दात राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

'शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल', संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांना निर्वाणीचा इशारा
संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 6:15 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात (Central Investigation Agency) आक्रमक भूमिका घेतलीय. राऊत उद्या शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शिवसेना भवन परिसरात पाहणी केली. तसंच शिवसेनेच्या सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचनाही दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि उद्या महाराष्ट्र बोलणार आहे, अशा शब्दात राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोपांची मालिका सुरु केलीय. या आरोपांनंतर संजय राऊतांनी आक्रमक होत पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांची आणि केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिलाय.

‘उद्या त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते’

उद्याच्या पत्रकार परिषदेकडे त्यांचं लक्ष असायलाच पाहिजे. त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी तर आवर्जुन ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. मला वाटतं उद्या त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते. केंद्रीय तपास यंत्रणांचे जे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार उद्यापासून. शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी मर्दानगी शिकवली, ती उद्या दिसेल, अशा शब्दात राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना इशारा दिलाय.

राऊत पुढे म्हणाले की, कुणीही उठावं आणि महाराष्ट्राची बदनामी करावी हे चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसारच ही पत्रकार परिषद होईल. ही पोलखोल नाही, खोलायला त्यांच्याकडे आहे काय? ते आतून पोकळ आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.

‘हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे’

तत्पूर्वी सकाळीही संजय राऊत यांनी माध्यमांशी संवात साधत भाजपला इशारा दिला होता. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल. उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होतं ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असं सांगतानाच हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या इशाऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच त्यांनी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असा बॉम्बगोळा टाकल्याने भाजपचे ते तीन नेते कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

इतर बातम्या :

संजय राऊतांसारखी भाषा आमच्या तोंडी शोभत नाही, त्यांना उत्तर द्यावंच लागेल; किरीट सोमय्यांचं पुन्हा चॅलेंज

VIDEO: नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.