संजय राऊत वाढदिवस साजरा करणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत वाढदिवस साजरा करणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:25 PM

मुंबई : शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. दरवर्षी 15 नोव्हेंबरला राऊत यांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मात्र, यावेळी ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना त्यांनी फेसबुकद्वारे ही माहिती दिली आहे. (Sanjay Raut will not celebrate his birthday because of corona pandamic)

“15 नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे. गेल्या आठ महिन्यांपासून आपण सर्वजण कोव्हिड-19 या महामारीच्या जागतिक संकटाचा सामना करीत आहोत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिका, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. तेसच, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. ही बाब आपल्यासाठी आनंदाची आहे. असे असले तरी कोरोना परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करणे उचित होणार ठरणार नाही” असं राऊत म्हणाले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाके न फोडण्याचे तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे. राऊत यांना ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहे.

दरम्यान, राऊत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी तसेच शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयात मोठी रेलचेल असते. मोठमोठ्या राजकीय व्यक्ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याकडे येतात. पण, मी वाढदिवस साजरा केला नाही तरी तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा माझ्यासोबत असतील असं राऊत म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊत यांची किरीट सोमय्यांवर लाखोली!

Sanjay Raut | ठाकरे सरकार पाच वर्षे चालणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच: संजय राऊत

sanjay raut! आमची टांग वर झाल्यास भूमंडळ हालते; संजय राऊत यांचा इशारा

(Sanjay Raut will not celebrate his birthday because of corona pandamic)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.