Sanjay Shirsat: उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते पण आता नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणं आम्हाला पसंत नाही- संजय शिरसाट

Sanjay Shirsat : उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते आता ते आमचे कुटुंबप्रमुख नाहीत. ते भाजपसोबत गेले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं पसंत केलं. त्यांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, असं शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

Sanjay Shirsat: उद्धव ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख होते पण आता नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणं आम्हाला पसंत नाही- संजय शिरसाट
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 11:18 AM

औरंगाबाद : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचे कुटुंबप्रमुख होते आता ते आमचे कुटुंबप्रमुख नाहीत. ते भाजपसोबत गेले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं पसंत केलं. त्यांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. ते आता आमचे कुटुंबप्रमुख नाहीत, असं शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं संजय शिरकाट म्हणालेत. शिवाय उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत. तर संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर गेले होतो. त्यावेळी त्यांच्याशी मंत्रिपदावर चर्चा झाली होती. शेवटी यादी फायनल झाली. त्यावेळीही मी त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनी सर्वांशी चर्चा केली आणि यादी तयार केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात हे स्टेटमेंट नाही. मी माझी नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली आहे. मला कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आहे. शिंदेसाहेब ते देतील अशी अपेक्षा आहे, असंही शिरसाट म्हणालेत.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.