संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा, संतोष बांगर यांची जीभ घसरली…

संजय राऊत यांच्यावर टीका करताना संतोष बांगर यांची जीभ घसरली...

संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा, संतोष बांगर यांची जीभ घसरली...
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 12:10 PM

मुंबंई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना संतोष बांगर यांची जीभ घसरली आहे. “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत. “संजय राऊत यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असं म्हणत संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी संजय राऊतांवर शाब्दिक हल्ला चढवलाय.

आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, असंही संतोष बांगर यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. सरकार कर्नाटकबाबत काही ठोस भूमिका का घेत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात, असं म्हणत राऊतांनी शिंदेवर घणाघात केलाय.राऊतांच्या या वक्तव्यावर बांगर यांनी आक्रमक पलटवार केलाय.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गप्प आहेत. ते सीमावादावर बोलायला घाबरतात, असं संजय राऊत म्हणालेत. त्यावरून शिंदेगट आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि मुख्यमंत्री शिंदे यांना एका खोलीत बंद करा. मग कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा निघेल, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये. त्यालाही बांगर यांनी उत्तर दिलंय.

विरोधीपक्षातील नेत्यांना काही कामं उरली नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत, असं म्हणत बांगर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाला उत्तर दिलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.