चंद्रकांत खैरे.. तुमच्या क्लिप बाहेर काढल्या तर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही… संतोष बांगर यांचा पलटवार!
संतोष बांगर यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केलेली टीका जिव्हारी लागल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतोष बांगर यांच्यावर आगपाखड केली होती.
नागपूरः चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) माझ्यावर बोलू नये. त्यांचं भांडं खोलायला गेलं तर काय काय बाहेर येईल.. लोक याला घरात घेत नाहीत. यांच्या एकेक क्लिप बाहेर काढल्या तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असं वक्तव्य संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलंय. संतोष बांगर यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केलेली टीका जिव्हारी लागल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतोष बांगर यांच्यावर आगपाखड केली होती.
ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं, त्यांच्याच नेत्यांबद्दल तुम्ही असं बोलता.. तुमचे काय धंदे आहेत माहिती आहेत. हा बांगर मटक्याच्या अड्ड्यांतून दिवसाला 1 लाख रुपये कमावतो, याचे लफडे झाकण्यासाठी हा शिंदेंकडे गेला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी आज केला. त्याला संतोष बांगर यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय.
टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, ‘ चंद्रकांत खैरेंना संभाजीनगरच्या जनतेने दाखवलं आहे. एखाद्याच्या घरात जाण्याचीही त्यांची लायकी नाही. त्यांची वाईट नजर आहे. त्यांनं भांडं खोललं तर अनेक गोष्टी बाहेर निघतील.. अशा इशारा संतोष बांगर यांनी दिला.
माझे जुगाराचे अड्डे आहेत, असा आरोप खैरेंनी केलाय. तसं असतं तर मला लोकांनी निवडून दिलं असतं का, असा सवाल संतोष बांगर यांनी केला. यानंतर त्यांनी खैरेंनाच इशारा दिला.
तुमच्या एकेक क्लिप बाहेर काढल्या तर अवघड होईल. तुमच्यासोबत काम करणारा, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काम करणाऱ्याच एका नेत्याकडे या सगळ्या क्लिप आहेत. त्या बाहेर काढल्या तर चंद्रकांत खैरे यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलंय.