VIDEO | उदयनराजेंची बॉक्सिंग बॅगसोबत पंचिंग, म्हणतात ‘तायक्वांदो प्लेयर… मॅन’
उदयनराजेंनी मित्राच्या घरातच असणाऱ्या जिममध्ये बॉक्सिंग बॅगबरोबर जोरदार पंचिंग केलं. (Udayanraje Bhosale Kick Boxing Video)
सातारा : राजकीय मैदानात नेहमी शाब्दिक फायटिंग करणारे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा नवा अंदाज पाहायला मिळाला. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे जबरदस्त फिल्मी स्टाईल बॉक्सिंग करत असतानाचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. (Satara MP Udayanraje Bhosale Kick Boxing Video)
छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील जावळीमध्ये राहणारे आपले मित्र अजीजभाई मुजावर यांच्याकडे गेले होते. त्यावेळी घरातच असणाऱ्या जिममध्ये त्यांनी बॉक्सिंग बॅगबरोबर जोरदार पंचिंग केलं. एका तरुणाने पंचिंग बॅग धरली, तर उदयनराजेंनी त्यावर हात साफ केला. त्यानंतर त्याच्याकडे लूक देत ‘तायक्वांदो प्लेयर… मॅन’ असा डायलॉगही उदयनराजेंनी मारला. त्याचप्रमाणे करेल फिरवून दंड मारत आपण स्वतः फिट असल्याचंही उदयनराजेंनी दाखवून दिलं.
पाहा व्हिडीओ :
“फॅमिली प्लॅनिंग असते तर लसींचा साठा कमी पडला नसता”
दरम्यान, देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.
“कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी नाही”
सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.
संबंधित बातम्या:
आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी
भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
(Satara MP Udayanraje Bhosale Kick Boxing Video)