Maharashtra Political Crisis LIVE : राज्यभरात शिंदे गटाकडून फटाके वाजवत जल्लोष
Supreme Court Decision on Maharashtra Government Today LIVE News : राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी राज्यपालांनी घेतलेला निर्णय चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं देखील म्हटलं आहे. दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना कोर्टाने केल्या आहेत. त्यामुळे शिंदे सरकार तुर्तास तरी स्थिर आहे.
16 MLAs Disqualification List Maharashtra
1) एकनाथ शिंदे, 2) अब्दुल सत्तार, 3) संदीपान भुमरे, 4) संजय शिरसाट, 5) तानाजी सावंत, 6) यामिनी जाधव, 7) चिमणराव पाटील, 8) भरत गोगावले, 9) लता सोनावणे, 10) प्रकाश सुर्वे, 11) बालाजी किणीकर, 12) अनिल बाबर, 13) महेश शिंदे, 14) संजय रायमुलकर, 15) रमेश बोरणारे, 16) बालाजी कल्याणकर
LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra politics : विरोधकांचे थोबडे काळे झाले आहे – भरत गोगावले
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदेंचे सहकार भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, विरोधकांचे थोबडे काळे झालेले आहे. त्यांना जे काय अपेक्षित होतं ते घडलेलं नाही त्यामुळे ते नाराज राहणार आहेत. आम्हाला अडचण येणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं. आम्ही समाधानी आहोत आनंदीत आहोत.
‘जे रोज सकाळी उठून चर्चा करायचे सरकार पडेल त्यांची तोंड बंद झालेली आहे. ते उद्यापासून बोलणार नाही करण त्यांचं भविष्य खोटं ठरलेलं आहे. त्यांचा पोपट उडून गेलेला आहे.’ अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलीये.
नितेश कुमार सर्वांना एकत्र घेऊन पंतप्रधान मोदी नको यासाठी ते आलेले आहेत. मात्र तसं काय होणार नाही. सगळ्यांना वाटतं की नितेश आले म्हणजे काहीतरी चमत्कार घडेल. पण चमत्कार घडणार नाही. त्यांना परत जावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असेल मात्र पंतप्रधान मोदींना हे कोणी हरवू शकत नाही. त्यांच्यातच मतभेद आहेत. अजित पवार व पक्षाच्या अंतर्गत जे सुरू आहे. नाना पटोले आणि वडेट्टीवार काय चालू आहे, आपण पाहतोय. त्यामुळे हे काय टिकणार नाही. थोडे दिवस हे चालेल. आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल.
-
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं वादग्रस्त वक्तव्य
कर्नाटकात तुमचे उमेदवार नव्हते हे आमचं नुकसान करणारी बाब
MIM खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर केलं वादग्रस्त वक्तव्य
MIM आणि भाजपची मिलीभगत असल्याचं स्पष्ट करणारं केलं वक्त्व्य
-
-
धाराशिवमध्ये शिंदे गटाचा जल्लोष
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष केला. निकालचे स्वागत करीत फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यापुढे जनतेच्या कामावर भर दिला जाईल असे ही ते म्हणाले.
-
शिंदे गटाकडून ढोलताशा आणि फटाके वाजवत जल्लोष
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कलानगर मातोश्री परिसरात शिंदे गटाकडून जल्लोष.
- अनिल परब यांच्या घरासमोर देखील शिंदे गटाकडून जल्लोष साजरा.
- ढोल ताषाच्या गजरात शिवसेनेच्या शाखेबाहेर फटाके वाजवून आनंद साजरा.
-
तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर कारवाई करावी : ओमराजे निंबाळकर
राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांवर ओढले ताशेरे
कोशारींवर राष्ट्रपतीनी कारवाई करावी अशी ओमराजे निंबाळकर यांची मागणी
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर ओमराजे निंबाळकर यांची मागणी
-
-
ठाण्यात शुक्रवार आणि शनिवार पाणी पुरवठा बंद
मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा आणि वागळे इस्टेस्ट परिसरात पाणी पुरवठा बंद
पाईपलाईन फुटल्याने शुक्रवारी राहणार पाणीपुरवठा बंद
शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार
नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
सरकारला कोणताही धोका राहिलेला नाही
खासदार अनिल बोंडे यांची माहिती
अगोदर राजीनामा द्यालं तर कुणीही वाचवू शकत नाही
उद्धव ठाकरे यांच्यावर अनिल बोंडे यांची टीका
-
नागपूर : कोर्टाच्या निर्णयानंतर जल्लोष
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये उत्साह संचारला
शिंदे गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत गुलाल उधळला
मिठाई वाटत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत
-
मुंबई : हजारो लीटर पाणी वाया
वांद्रे येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली
एचडब्ल्यू वॉर्ड वांद्रे येथील बडी मशिदीजवळ पाईपलाईन फुटली
पाणी गळतीची माहिती मिळताच बीएमसीची टीम पोहोचली
-
इंदापूर : बावडा गावात आनंदोत्सव
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाजवले फटाके
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या गावात उत्साह
हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके
-
समलैगिंग लग्नासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी पू्र्ण
सुप्रीम कोर्टाने निकाल ठेवला राखीव
सर्वोच्च न्यायालयात 10 दिवस सुरु होती सुनावणी
केंद्र सरकारने समलैगिंक विवाहांना मान्यता देण्यास केला विरोध
यामुळे अनेक कायदे आणि नियम बदलावे लागतील
-
नितीश कुमार विरोधकांची मोट बांधणार का?
आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची घेतली भेट
लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी सर्वांचा एकत्र येण्याचा विचार
आदित्य ठाकरे यांनी केले सूचक ट्विट
बिहारचे लढवय्ये मुख्यमंत्री श्री. नितीश कुमार जी आणि लढवय्ये तरुण उप-मुख्यमंत्री तेजस्वी यादव जी यांचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जी यांनी मातोश्री येथे स्वागत केले.
देशात लोकशाही आणि संविधानावर सतत होणारे वार पाहून, सर्वांनीच देश हितासाठी एकत्र येण्याचा विचार होत आहे. हेतू… pic.twitter.com/GasYPgXaJq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 11, 2023
-
मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरच श्रीगणेशा?
आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार
भाजप व शिंदे गटात हाणामारी होणार
आमदार अमोल मिटकरी यांची टीका
तसेच राज्य सरकार आता विस्ताराचा मुहूर्त साधणार असल्याचे केले भाष्य
आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार ! भाजप व शिंदे गटात होणारी हाणामारी पाहायला विसरू नका !! भाग दोन लवकरच..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 11, 2023
-
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा
देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे यांच्यावर उपकार
चित्रा वाघ यांनी ट्विट करुन साधला निशाणा
पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना न्यायव्यवस्थेने धडा शिकवला
देवेंद्रजींचा राजीनामा मागणा-या उद्धव ठाकरेंनी आधी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा…. @OfficeofUT
देवेंद्रजींचे उपकार आहेत तुमच्यावर हे पण विसरलात का…?
पाठीत खंजीर खुपसणा-या गद्दारांना न्यायव्यवस्थेनं धडा शिकवला…
साक्ष, पुराव्याची गरज नसते… जेंव्हा नियती न्याय करत असते……
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 11, 2023
-
शिंदे सरकार अनैतिक, त्यांनी राजीनामा द्यावा
40 गद्दारांचा येत्या दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलाय
आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही-ठाकरे
नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राजीनामा देऊन त्यांनी निवडणुकांना सामोरे जावे
-
ठाकरे सरकार पाडण्यात राज्यपालांचा हात होता
राज्यपालांचं कार्यालय हे हुकुमशाही चालविण्यासाठी वापरलं जातं आहे का?
आदित्य ठाकरे यांचा सवाल
16 आमदार अपात्र ठरणार-ठाकरे
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अनेकांचा पालापाचोळा झाला
नारायण राणे यांनी केली संजय राऊत यांच्यावर टीका
ठाकरे यांना नैतिकतेवर बोलण्याचा कुठलाच अधिकार नाही
त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला
-
ते काय गणपती आहे का बसवायला
नारायण राणे यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही
ठाकरे यांनी नैतिकतेचा बोजवारा उडवला
संख्याबळ नसल्याने ठाकरे यांनी राजीनामा दिला
-
नितेश राणे यांचे ट्विट चर्चेत
देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत केले ट्विट
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केलेले ट्विट चर्चेत
कोणाला लगावला नितेश राणे यांनी टोला
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/dy1y9vFJ2m
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2023
-
माहिती घेतल्याशिवाय मी बोलणार नाही – अजित पवार
मात्र मी जे लातूरला बोललो तसंच घडलं
मला जे काही बोलायचं ते उद्या बोलतो
फक्त दिल्लीला गेलो एवढं सांगू नका
अजित पवारांची मिश्कील टिप्पणी
-
या निकालात एक वाक्य महत्वाचं, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परत मुख्यमंत्री बनले असते – जितेंद्र आव्हाड
म्हणजे या वाक्यातून असं जाणवत की या आधीच्या ज्या काही कारवाया आहेत
त्या नैतिकतेला धरून नाही हे स्पष्ट होतंय
व्हीप बजावणे आणि निलंबनाचा अधिकार पक्षाला आहे
आता सुनील प्रभू हेच व्हीप बजावतील असे कोर्टाने सांगितले
मी आता तेच वाचत आहे, जे आज सुप्रीम कोर्टाने लिहिलेला आहे
आता जे सुनील प्रभू व्हीप बजावतील त्यातून पुढील चित्र स्पष्ट होईल
सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्यात आली
संरक्षण करणे म्हणजेच पाठिंबा काढणे होत नाही, असे त्यांनी नमूद केले
पदापेक्षा आपली नैतिकता मोठी
हीच नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला
हा राजीनामा राजकारणाच्या दृष्ठिने पहिला तर चुकीचा आहे पण नैतिकता पाहिली तर योग्य आहे
या राजीनाम्याचा कोणावर कधी महागात किंवा असं काही पडत नाही पण यात मुळात नैतिकता पाहिली जाते..
-
लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु – राहुल नार्वेकर
प्रतोद म्हणून कुणाची निवड योग्य हे कोर्टाने सांगितलं नाही
राजकीय पक्ष व्हिप नेमेल असे कोर्टाने सांगितलं
-
शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचे निकालाच्या निरीक्षणावरून समोर आलंय – कैलास पाटील
सुप्रीम कोर्टाचा निर्णय जनतेच्या न्यायालयात नेणार
निवडणुका लावल्यास जनता सरकारचा निकाल लावेल
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया
-
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो – राहुल नार्वेकर
राजकीय पक्ष नेमका कुणाचा हा निर्णय आधी घ्यायचाय
सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेणार
कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन निर्णय घेऊ
नेमका किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार राहील हे स्पष्ट झालंय – गुलाबराव पाटील
या निकालावरून शिंदे फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल
न्यायालयाचा निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केलाय
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील
त्यांच्या निर्णयाबद्दल मत व्यक्त करणे योग्य नाही
-
ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय – गिरीश महाजन
याचा मोठा दिलासा शिंदे-फडणवीस सरकारला आहे
हे सरकरा बेकायदा आहे असा आरोप होत होता, ते सर्व मुद्दे खोडलेले आहेत
कुठेही 16 आमदारांचं निलंबन झालं नाही, हे सरकार नियमानुसार बनले असं आज सिद्ध झालंय
ते कशावरंही फटाके फेडतील, त्यांना काय? बेगाने शादीमे अब्दूल्ला दिवाना असं त्यांचं चाललंय
बुद्धी गहाण ठेवली असेल, देवच त्यांना तारो
-
हे सरकार कायदेशीर हे सिद्ध – संजय शिरसाट
लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणारउद्धव ठाकरे यांनी नैतिकतेची भाषा करु नये -
न्यायालयाचा निकालानंतर सेना भवनाबाहेर जल्लोष
शिवसैनिकांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणा
सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी व्यक्त केला आनंद
शिवसेना शिंदे गटाला कोर्टाने फटकारल्याने केली फटाकेबाजी
-
आम्हला विश्वास होता निकाल आमच्या बाजूने लागेल, न्याय मिळेल – भावना गवळी
सरकार स्थिर होते, स्थिर राहिले
मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावर शंका घेण्याचं काम नाही
निर्णय आमच्या बाजूने लागण्याने विस्तार करावा लागेल
अजून कामाला लागावे लागणार आहे
-
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक
13 मे रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता मातोश्री येथे ठाकरे घेणार बैठक
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील रणनीती व दिशा ठरविन्यासाठी बोलावली सर्व आमदारांची बैठक
-
‘नाराज करण्याचा हेतू नव्हता, वस्तूस्थिती होती’- शरद पवार
‘नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असं वाटत नाही’- शरद पवार
‘नाराज करण्याचा हेतू नव्हता, वस्तूस्थिती होती’- शरद पवार
-
काही निर्णय अजून व्हायचे आहेत- शरद पवार
‘ज्यांच्या नावावर निवडून येतात त्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा’- शरद पवार
काही निर्णय अजून व्हायचे आहेत- शरद पवार
‘अध्यक्षांना नियमांच्या चौकटीत राहून काम करावं लागतं’
‘ठाकरेंच्या राजीनाम्याचा विषय माझ्या पुस्तकात’
‘पुस्तकात भूमिका मांडल्यानं काही मित्र नाराज झाले’- शरद पवार
-
सत्तेचा गैरवापर सातत्यानं सुरू- शरद पवार
ठाकरेंच्या राजीनाम्यावर आत्ता चर्चा करण्यात अर्थ नाही- शरद पवार
सत्तेचा गैरवापर सातत्यानं सुरू- शरद पवार
‘राज्यपालांची नियुक्ती चुकीची केली जाते याचं कोश्यारी उदाहण’
-
भाजपची कृती देशहिताची नाही- नितीश कुमार
सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल- शरद पवार
भाजपची कृती देशहिताची नाही- नितीश कुमार
भाजपविरोधी सर्व विरोधीपक्ष एकत्र येतील- नितीश कुमार
पवार विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद- नितीश कुमार
आम्ही एकत्र काम करु, चेहरा नंतर ठरवू- शरद पवार
-
कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल- शरद पवार
कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल- शरद पवार
कर्नाटकातील जनता धर्मनिरपेक्ष सरकार आणेल-पवार
-
नवी दिल्ली: माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीत दाखल
मी सध्या राजकारणापासून दूर आहे
कोर्टाने त्यांचा निर्णय दिला आहे
मी कायद्याचा विद्यार्थी नाही
मी जे निर्णय घेतले ते योग्य पद्धतीने घेतले
कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी म्हणणार का राजीनामा देऊ नका
-
अजित दादांचा निकालावर बोलण्यास नकार
न बोलताच अजित दादा रवाना
मी निकाल बघितलेला नाही
जो पर्यंत व्यवस्थित निर्णय बघत नाही तो पर्यंत बोलणार नाही
मी काल काय सांगितलं होत- अजित दादा
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोषनागपूरातील भांडे प्लॉट येथील शिवसेना कार्यालया जवळ केला जल्लोषढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आलासर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.शिंदे गटाचे रामटेक चे खासदार कृपाल तुमाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आला जलोशबाईट – कृपाल तुमाणे , शिंदे गट खासदार रामटेक -
पॉलिटिकल पार्टी म्हणून शिंदेंची शिवसेना आहे त्यामुळे शिंदेच्या पार्टीचा विप लागू होईल
परिस्थिती अत्यंत स्पष्ट आहे आता पॉलिटिकल पार्टी याचा विप लागू होतो हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंशिवसेना ही पॉलिटिकल पार्टी आहे त्यामुळे शिंदे गट ही पॉलिटिकल पार्टी आहे त्यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव दिलंपॉलिटिकल पार्टी म्हणून शिंदेंची शिवसेना आहे त्यामुळे शिंदेच्या पार्टीचा विप लागू होईलमात्र 16 आमदार आमदार यांच्यासाठी मात्र सुरेश प्रभूंचा विप लागू होईलआज जर अविश्वासाचा प्रस्ताव आला तर वीप कोणाचा लागू होईल याला स्पष्ट उत्तर आहे शिवसेना ही अधिकृत शिवसेना शिंदे गटाकडे आहे त्यामुळे शिंदे गटाला आपला वीक बनवावा लागेल तो जुना विप चालणार नाही -
कल्याणकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी
आमदारांच्या अपात्रते बाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिल्यानंतर नांदेडमध्ये कार्यकर्त्यानी सुटकेचा श्वास सोडलाय. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे पहिल्या सोळा आमदारांत सहभागी होते, त्यामुळे कल्याणकर समर्थकांना निकाळाची मोठी उत्सकूता होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालानंतर कल्याणकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केलीय. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नावाचा समर्थकांनी नारेबाजी केली
-
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सिंधुदुर्गातही जल्लोष
अँकर———- सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सिंधुदुर्गातही जल्लोष करण्यात आला असून वेंगुर्ल्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत हा आनंद साजरा केला.यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली. -
आम्हाला खात्री आहे, अध्यक्ष निरक्षण करून न्याय देतील – अनिल बाबर
सर्वोच न्यायालयाचा निकाल लागला तो दिलासा देणारा आहे. मात्र हा निकाल पात्र का अपात्र यासाठी होता. मात्र अपात्र चा धोका टळला आहे. कोर्टाने आम्हाला दिलासा दिला आहे.
आम्हाला खात्री आहे. अध्यक्ष निरक्षण करून न्याय देतील.
मला आत्मविश्वास होता. आम्ही पात्र होऊ. पण काही गोष्टी न्यायालयाचा निरक्षण बाबत मी बोलणे उचित नाही. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री निर्णय घेतील.
कामाक्षी देवी पाऊली हे शंभर टक्के खरे आहे. पण देवीच्या बाबतीत चुकीचं विधान केली. ते देवीने दाखवून दिले.
ज्या प्रक्रिया आहेत त्याबाबत निरीक्षण दिले आहे,
राजीनामा द्यायची गरज नाही सरकार कडे बहुमत आहे. त्याबाबतीत कोर्टाने निर्णय दिले आहेत.
मंत्रिमंडळात विस्तारस संदर्भात अनिल भाऊ यांनी वरिष्ठ काय ठरवतील हे मला मान्य आहे काम करत राहणं हे माझं काम आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे
-
धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं – मुख्यमंत्री
धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं – मुख्यमंत्री
राजीनामा दिला त्यावेळी दुसरा पर्याय काय होता.
लोकांना अपेक्षित असलेलं काम आम्ही केलं आहे
सत्तेसाठी सरकार दुसरीकडं तयार केलं
-
एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं आहे – मुख्यमंत्री
आज सुप्रीम कोर्टाचे त्यावर शिक्कामोर्तब केले आहे
एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं आहे
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतं केलं आहे
मेरिटप्रमाणे तो निकाल दिला आहे
-
घटनेच्या चौकटीत बसणारा एकमुखी निर्णय आहे – असिम सरोदे
घटनेच्या चौकटीत बसणारा एकमुखी निर्णय आहे
सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल हा सकारात्मक
सगळी न्यायिक प्रक्रिया नीट पार पडली आहे
कुणावरही अन्याय होणार नाही असा निकाल
अपत्र्तेचा निर्णय हा विधिमंडळाकडेच जायला हवा होता आणि तसचं झालं आहे
विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने टाईम बाँड द्यायला हवा होता
राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळेत निर्णय घेणे आता गरजेचे
भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर होती हे कोर्टानं स्पष्ट केलं आहे
राहुल नार्वेकर यांचा तो निर्णय पक्ष समर्पित होता
प्रतोद त्यांच्या हातात असणे म्हणजे ठाकरे गटाला नवीन संधी
एक महिन्यात नार्वेकर यांनी निकाल देणं अपेक्षित अन्यथा ते बेकायादेशिर ठरेल
पॅकेज byte
शिंदे गट नविन प्रतोद नेमू शकातात
आणि त्यांचा व्हीप लागू होईल
कारण निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची हा निर्णय जो दिला होता तो अजूनही अस्तित्वात आहे त्यामुळे प्रतोद हा शिंदे गटाचा होईल
भरत गोगले यांची त्यावेळेस ही नियुक्ती चुकीची होती असं म्हटलं असून त्यामुळे हे सगळं त्या वेळेच्या परिस्थितीला लागू होतं पण निवडणूक आयोगाचा निकाल त्यानंतर आला होता
एकनाथ शिंदे नविन व्हीप नेमू शकतात
एकनाथ शिंदे त्यांचं सरकारं टिकवू शकतात
-
आता हे सरकार पुर्णपणे कायदेशीर झालं आहे
आता हे सरकार पुर्णपणे कायदेशीर झालं आहे
विरोधकांच्या शंकेचं निरसन झालं आहे
नैतिकतेच्या आधारवर राजीनामा दिला
भाजपसोबत निवडून आलात आणि इतरांसोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती.
उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं होतं, नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न केला होता.
हे पुर्णपणे संविधानसोबत काम करीत आहे.
-
निकालाचं आम्ही पुर्ण समाधान व्यक्त करतो – देवेंद्र फडणवीस
निकालाचं आम्ही पुर्ण समाधान व्यक्त करतो.
लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे
हा जो काही निकाल आहे, त्याकडे मी सगळ्याचं लक्ष वेधू इच्छितो
सर्वात पहिल्यांदातर महाविकास आघाडीवर स्टेट को अॅन्टी करता येणार नाही
उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही
-
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टाच्या निकालाच मी स्वागत करतो
सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला की सरकार शिंदे- फडवणीस यांचच राहतील
नऊ महिन्यापासून शिंदे सरकार प्रगती करत आहे या प्रगतीला खीळ बसणार नाही
तर यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील अनिल बोंडे यांनी टोला लगावला
उद्धव ठाकरे यांनी स्वतः पराभव मान्य केला राजीनामा दिला
युद्धाला समोरे न जातात त्यांनी राजीनामा दिला
उद्धव ठाकरे यांनी रणांगण सोडलं
सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे सरकारला धोका नाही
-
न्यायालयाच्या निकालानंतर प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आणि एकमेकांना मिठाई खाऊन उत्साह निर्माण केला आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे मोठे कटआउट्सही लावण्यात आले आहेत.
शिवसेनेचे कार्यकर्ते फटाके फोडत आहेत आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत.
मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचाही या उत्साहात सहभाग आहे.
-
प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष
न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आणि एकमेकांना मिठाई खाऊन उत्साह निर्माण केला आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे मोठे कटआउट्सही लावण्यात आले आहेत.
-
ठाण्यात जल्लोष
सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसैनिकांकडून जल्लोष,
फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवलेठ
ठाण्यात शिवसैनिक करीत आहेत आनंद साजरा
-
भारतीय न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निर्णयाने दाखवून दिलं
चिमणराव पाटील बाईट ऑन सत्ता संघर्ष निकाल*भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय*हा निर्णय येणारच होताभारतीय न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निर्णयाने दाखवून दिलंसत्ता संघर्षाच्या निर्णयावर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिक्रिया -
सरकार चलाविण्याचा निर्णय झाला आहे – दीपक केसरकर
दीपक केसरकर
सरकार चलाविण्याचा निर्णय झाला आहे
आमदारांना आपल म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे ते मांडतील
सुप्रीम कोर्टाचा योग्य निर्णय,,,त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.
-
भरतब गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती कोर्टाने बेकायदेशीर ठरवली
भरतब गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती कोर्टाने बेकायदेशीर ठरवलीराज्यपालांची कृती चुकीची ठरवलीशिंदे यांनी पाठींबा काढला असे पत्र दिले होते, शिवसेनेच्या अंतर्गत वादाकडे राज्यपालांनी लक्ष द्यायला नको होते16 जणांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतीलठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिला म्हणून नाबाम रेबियाचा निकाल इथे लागू होत नाहीएकनाथ शिंदे यांची सरकार पूर्णपणे वाचले आहेउद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होते, शरद पवार यांनी म्हटले आहेच की ठाकरे यांनी कोणाला कल्पना न देता राजीनामा दिला, यामुळे आता परिस्थिती बदलणार नाहीखरी शिवसेना कोण हा निर्णय झालेला आहेनिवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे कडे पक्ष आहेसगळं माप शिंदेंच्या पदरात पडलंउध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात हा निर्णय गेला आहेआता यापुढे महाविकास आघाडीसमोर कायदेशीर लढाई शिल्लक राहिलेली नाही आता जनतेचे कोर्ट हाच पर्यायजयंत पाटील यांच्या नोटिसबाबत माहिती नाहीकाय होणार याचा अंदाज सगळ्यांनाच आला आहेजोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तोपर्यंत महाविकास आघाडीला धोका नाहीअसे दिसत आहे की भावनिक होऊन ठाकरे यांनी राजीनामा दिला हे भोवले का ?असच झाला कारण कोर्टाने देखील म्हटलंय की कर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसत तर कदाचित आम्ही सरकार पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला असतामात्र नैतिकदृष्ट्या काय करावे हे शिंदे-फडणवीस यांना विचाराआमचे राज्यपाल आता गेले, भविष्यात असे प्रश्न निर्माण झाले तर कसे निर्णय घ्यावेत याचे मार्गदर्शन सुप्रीम कोर्टने देशाला दिले आहे -
सत्तासंघर्षाचा निकाल लागला हा सत्याचा विजय आहे
सत्तासंघर्षाचा निकाल लागला हा सत्याचा विजय आहे. गाव खेड्यात संपूर्ण महाराष्ट्रात आनंद निर्माण झाला आहे.
ताशेरे ओढले तरी निकाल आमच्या बाजूने लागला आहे.
यानंतर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू
संजय राऊत अंबादास दानवे आता दुसरं काय बोलणार,
कोर्टाने निकाल दिल्यानंतर नैतिकतेचा मुद्दा कुठे शिल्लक राहतो
पूजा अर्चा केल्याने काहीही होत नाही, आम्हीही पूजा अर्चा करतो पण जे योग्य आहे तेच होतं
विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेतील आमची बाजू कायदेशीर आहे त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल
आज महाराष्ट्रात सगळ्यांना खुशी झालेली आहे मला पण खुशी झालेली आहे.
-
मी राजीनामा दिला नसता, तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो – उद्धव ठाकरे
आज मातोश्रीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले आहेत.
देशात एकूण लोकशाहीची हत्या होत आहेत की काय अशी लोकांना शंका आहे.
सगळे विरोधक एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न करीत आहोत
सर्वोच्छ न्यायालायाने जो काही निकाल दिला आहे, त्यामुळे अनेकांना नागडं केलं आहे
राज्यपाल्यांच्या भूमिकेचं वस्त्रहरण झालं आहे
मी राजीनामा दिला नसता, पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो
माझी लढाई जनतेसाठी आहे
-
कोर्टाचा निर्णय आम्हाला अपेक्षित होता, 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे जाईल
कोर्टाचा निर्णय आम्हाला अपेक्षित होता, 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे जाईल,
आम्ही जे सरकार बनवलं ते कायद्याचा पूर्ण अभ्यास करून बनवलं, हे योग्य सरकार आहे आणि संविधानाचा अभ्यास करून झालेल्या सरकार आहे
आमच्यावर जनतेला विश्वास आहे आणि हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार, सुप्रीम कोर्टाची पूर्ण कॉपी आमच्याकडे आलेली नाही एकदा निर्णयाची प्रत आली तर मग त्याचे विश्लेषण करणार
उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी मेजॉरिटी नव्हती हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला
त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच आमचं सरकार निर्माण झालं
संजय राऊत यांना सकाळपासून खोके पाहण्याची सवय झालेली आहे आमचं इमानदारीचं कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचा सरकार आहे, बाळासाहेबांचे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करीत आहोत
-
शिवसेना पार्टी कुणाची हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे – उदय सामंत
निरीक्षण काय दिली याचा अभ्यास करावा लागेल. आम्हाला अंतिम निर्णय महत्वाचा – उदय सामंत
कालपर्यंत सरकार पडणार असे जे बोलत होते त्यांचे मनशुभे धुळीला मिळाले – उदय सामंत
सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आणि निकाल याचे काही जण भांडवल करतील – उदय सामंत
शिवसेना पार्टी कुणाची हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे – उदय सामंत
चंद्रकांत खैरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत हे सांगायला खैरे एकनाथ शिंदे यांच्या नंदणवन बंगल्यावर यायचे – उदय सामंत
मी ठाकरे यांच्या संपर्कमध्ये याचे पुरावे द्यावेत.. नाहीतर मी नदनवन बंगल्यावर खैरे यायचे याचे पुरावे देतो – उदय सामंत
-
भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय – चिमणराव पाटील
भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय
हा निर्णय येणारच होता
भारतीय न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निर्णयाने दाखवून दिलं
सत्ता संघर्षाच्या निर्णयावर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिक्रिया
-
संजय राऊतने आता गुवाहाटीच्या जंगलात जावे, शहाजीबापू पाटलांची राऊतांवर टीका
– आमदार शहाजीबापू पाटलांची पाहिली प्रतिक्रिया
– कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार
– सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घश्यात जाण्यापासून वाचवली
– संजय राऊतने आता गुवाहाटीच्या जंगलात जावे
– नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे आणि संजय राऊंतानी गुवाहाटीच्या जंगलात जावे
– आमदार शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया
-
न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, आमची बाजु सत्याची आमचं सरकार कायदेशीरचं, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया
न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, आमची बाजु सत्याची आमचं सरकार कायदेशिरच, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया
सत्तासंघर्षाच्या निकाला नंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असुन न्यायालयानं दिलेला निर्णयाचं स्वागत आम्ही करत असुन हा विजय सत्याचा असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलय तर आम्ही जनतेत जावुन काम करत आहोत जनतेच्या सोबत आहोत हे यातुन अधोरेखीत झाल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं असुन उद्धव ठाकरे आणि विरोधक सांगत होते आमदार आणि मुख्यमंत्री अपात्र होणार आणि सरकार ढासळणार मात्र आम्हाला कोर्टाच्या निकालावर विश्वास होता. संजय राऊत याच्या बोलण्याकडं आम्ही लक्ष देत नाही असं सुद्धा शंभुराज देसाई म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला यामुळं त्यांच सरकार गेलं हे सुप्रिमकोर्टाचं निरिक्षण आहे आणि आमचं सरकार कायदेशीर बहुमतातलं आहे आणि इथुन पुढच्या काळ आमच्या सरकारला कोणताच धोका नाही असं शंभुराज देसाई म्हणाले
-
निकालामुळे आम्ही पुर्ण समाधान आहे – फडणवीस
निकालामुळे आम्ही पुर्ण समाधान आहे
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार
पुढचं सगळं विश्लेषण पत्रकार परिषदेत करणार आहेत
-
सरकारच्या स्थिरतेवर परिणाम नाही
उज्वल निकम 121 –
महत्वाचा निकाल सरकारच्या स्थिरतेवर परिणाम नाही मात्र काही निरीक्षण महत्वाची आहे नबाम नबिया निकालाचा यात लागू होत नाही, त्यामुळं सात बेंच कडे हे पाठवले
भरत गोगावले व्हीप लागू होत नाही दोन गट भांडत असतील तर याची हेयरिंग स्पीकर ने घ्यायला हवं होते
राज्यपाल यांनी जे विशेष अधिवेशन बोलावले होते, ते नियमाने नव्हते, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वचेने दिला असल्याने ते पुनर्स्थापना होऊ शकत नाही
पोलिटिकल पार्टीने तो निर्णय घ्यावा निवडणूक आयोगाने ठरविलेली पार्टी की ठाकरे गटाची पार्टी हे निकाल वाचून कळेल
सरकार ला धोका नाही
-
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
अधिवेशन बोलवण्याची शक्यता
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद होणार
-
जो अपेक्षित निर्णय होता.तोच निर्णय कोर्टाने दिला आहे..
जो अपेक्षित निर्णय होता.तोच निर्णय कोर्टाने दिला आहे..
एकनाथ शिंदे यांनी उठावानंतर जे काही कागदपत्र करायला पाहिजे होते ते मजबुतीने केले.
न्यायालयाने मान्य केला आहे जिकडे बहुमत आहे तिकडेच निर्णय गेलेला आहे.
नियुक्ती चुकीची असेल तर ती नियुक्ती पुन्हा करता येईल 16 आमदारांचे जे निलंबन होतं ते निलंबन इथे थांबलेल आहे.
कोर्टाने चाचणी अवैध ठरवली असली तरी बहुमत चाचणी पुन्हा घेता येईल. चाचणी कितीही घेतली तरी ती शिंदे सरकारच्याच बाजूने राहील
निर्णयावर सरकार जाईल अस काही चित्र नव्हतं…
-
आमची निकाल स्वीकारायची तयारी होती – सुषमा अंधारे
-ऑपरेशन इज सक्सेसफुल पण पेशंट इज डेड असा प्रकारचा कोर्टाचा निर्णय होता
-आमची निकाल स्वीकारायची तयारी होती
-ठाकरेंच्या बाजूने निरक्षणे नोंदवली पण शेवटी निकाल त्यांच्या बाजूने लागला
-
त्यामुळे न्यायालयाचे धन्यवाद
सत्यमेव जयते… मी आधीच सांगितलं होतं की आमचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर पूर्णतः विश्वास आहे.. त्यामुळे आमदार अपात्र होतात की काय, अशी चर्चा सुरू असताना आम्हाला दिलासा मिळाला आहे.. त्यामुळे न्यायालयाचे धन्यवाद…
बाई ट – संजय रायमुलकर, आमदार
-
दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
-
निकालानंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल
निकालानंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल
-
आमच्या जीवाला धोका आहे, हे सुध्दा हास्यास्पद आहे
आमच्या जीवाला धोका आहे, हे सुध्दा हास्यास्पद आहे
सुप्रीम कोर्ट सांगेल तो कायदा असतो.
जगण्याचा अधिकार काढून घेता येत नाही
-
अत्यंत महत्वचा निर्णय झाला त्यात दिलासा मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रेस
अत्यंत महत्वचा निर्णय झाला त्यात दिलासा मिळाला आहे
उद्धव ठाकरे यांची याचिका होती बेकायदेशीर सरकार त्याला कोर्टाने ब्रेक लावला
खोके सरकार बोके सरकार असे म्हणाले पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने हे सरकार पडले
नवीन शिंदे फडणवीस सरकार आले ते कायदेशीर आहे, संवेद्धानिक पद्धतीने आले
राज्यपाल याबाबत जे निरीक्षण आहेत ते कोर्टाचे आहेत
एखाद्याने राजीनामा दिला तर ते पद खाली ठेवता येत नाही त्यामुळे हे सरकार बहुमताने आले त्यांना कोर्टने कायम ठेवले
नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा असे संजय राऊत मागणी
राजीनामा देण्याचा काय संबंध, तुम्ही राजीनामा दिला होता, तुमच्यकडे बहुमत नाही हे वाटले तेव्हा राजीनामा दिला
-
दुपारी दोन वाजता शिंदे आणि फडणवीसांची पत्रकार परिषद होणार
दुपारी दोन वाजता शिंदे आणि फडणवीसांची पत्रकार परिषद होणार
-
कायद्यापेक्षा मोठे काहीही नाही, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता – प्रकाश सुर्वे
कायद्यापेक्षा मोठे काहीही नाही, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता.
अध्यक्ष कायद्याच्या आधारे निर्णय घेतील
कोर्टानं म्हटलं सगळं चुकलं…पण तरी सुध्दा शिंदे सरकार वाचलं
कोर्टानं शिंदे आणि भाजप सरकारला फटकारलं आहे – परब
मीचं खरी शिवसेना असा दावा कुणी करु शकत नाही
-
कोर्टानं म्हटलं सगळं चुकलं…पण तरी सुध्दा शिंदे सरकार वाचलं
कोर्टानं म्हटलं सगळं चुकलं…पण तरी सुध्दा शिंदे सरकार वाचलं
कोर्टानं शिंदे आणि भाजप सरकारला फटकारलं आहे – परब
-
निवडणूक आयोगाने पक्षाचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत – खासदार राहुल शेवाळे
– निर्णयाचे स्वागत करतो. ऐतिहासिक निर्णय आहे.
– अधिकार सात खंडपीठाकडे आहे. अध्यक्षांकडे निर्णय दिला आहे.
– निवडणूक आयोगाने अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.
– त्यामुळे पक्षाचे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.
– चार मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत.
– व्हीप कोण आहेत यायचा निर्णय आता अध्यक्ष घेतील.
-
हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागला आहे
भाजपला म्हणणं आहे की तुमचं सरकार घटनाबाह्य आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे
भाजपनं यामधून बाहेर पडावं
यांनी घटनाबाह्य सरकाय आणलं आहे
एकनाथ शिंदे काय करतीँ हा त्यांचा निर्णय
बीजेपी काय करते
हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागला आहे
काहि चुकीचे निर्णय घेण्यात आले
आततायीने निर्णय घेण्यात आला त्याचा हा परिणाम आहे
कायदा सल्लागार मंडळ फेल्युअर झालं आहे
उद्धव ठाकरेंना माहिती देण्यात कमी पडले
भाजपनं राज्यपालांमार्फत तानाशाही केली आहे
विधानसभेत अविश्वासाचा ठरावं आणला नाही
तुम्ही एक्स्ट्रा पॉवर वापरून आणलं आहे
-
महाराष्ट्राच्या अध्यक्षांना अधिकार द्यावा त्यांनी वेळ स्पष्ट केला असता तर बरं झाल असतं
महाराष्ट्राच्या अध्यक्षांना अधिकार द्यावा त्यांनी वेळ स्पष्ट केला असता तर बरं झाल असतं
मग तो दोन महिन्याचा आहे की सहा महिन्याचा
हे सरकार घटनाबाह्य हे यावर थांबलं आहे
उद्धव ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट केली असती तर आणता आलं असतं का ?
तर नाही
कोर्टाला स्वतःहून कायदे तयार करण्याचा अधिकार नाही
ते फक्त लागू करू शकतात
-
सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा
नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा
रेबिया प्रकरण 7 बेंचकडे
राज्यपाल भूमिकेवर कोर्टाचे ताशेरे,बहुमत चाचणी अयोग्य होती
ठाकरेंनी राजीनामा देणं चूक होत, राजीनामा दिला नसता परिस्थिती जैसे थे करता आली असती – कोर्ट
-
बाळासाहेब यांच्या शिवसेनेवरील दावा फेटाळला ही आमच्यासाठी आनंदाची बाब – संजय राऊत
– सुनील प्रभू हेच अधिकृत व्हीप आहेत.
– त्यानुसार हे आमदार अपात्र ठरले आहेत.
– व्हीप याची खात्री बाळगून निर्णय घ्यायला हवा होता.
– फडणवीस यांनी पेढे वाटू नयेत.
– सरकार टिकले म्हणून खाजवत बसवू नये
– नैतिकता असेल तर सरकारने ताबडतोब राजीनामा दयायला हवा.
– शिवसेनेवरचा दावा फेटाळला, बाळासाहेब यांच्या शिवसेनेवरील दावा फेटाळला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
-
सरकार घटनाबाह्य आहे हे कोर्टाने सांगितलं आहे – संजय राऊत
सरकार घटनाबाह्य आहे हे कोर्टाने सांगितलं आहे – संजय राऊत
शिवसेना कुणाची हा फेटाळला आहे
नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा
-
मोठी बातमी : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच
मोठी बातमी : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच
– जुने सरकार आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली.
– निर्णय घेण्यासाठी मोठ्या 7 न्यायाधीशांचे खंडपीठाकडे देण्यात येईल.
-
महाराष्ट्रात शिंदे-भाजपा निर्णय राहणार का ?
राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा दिलासा
-
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
-
ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणलं असतं – कोर्ट
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गट अडचणीत आले.
-
राज्यपाल यांच्या भूमिकेवरही नायालयाचे कडक ताशेरे
– सरकारमधील स्पीकरने अविश्वास प्रस्तावाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर राज्यपालांना अधिकाराचा वापर करणे न्याय्य ठरते.
– कलम 174 मंत्रिपरिषदेच्या मदतीशिवाय आणि सल्ल्याशिवाय या प्रकरणात राज्यपालांची भूमिका घेणे उचित नाही असे याचिकेत नमूद केले आहे.
– राज्यपालांनी ठरावाच्या मुद्यावर आणि विलीगीकरणाच्या नोटीसच्या आधारे केलेल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही .
– राज्यपालांकडे असे कोणतेही वस्तुनिष्ठ परिस्थिती नव्हती ज्या आधारे ठराव करणार्या सरकारच्या विश्वासावर शंका घेऊ शकता.
– राज्यपालांनी काही आमदारांच्या बाजूने असंतोष व्यक्त करणारे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
-
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
आता माझी भूमिका संपलेली आहे
न्य़ायालय जेव्हा बोलणार तेव्हा आम्ही सांगणार आहे
-
निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे
नरेश म्हस्के ( शिवसेना प्रवक्ते ) ऑन निकाल व संजय राऊत
प्रत्येकाला वाटत निकाल आपल्या बाजूने लागावा
आमच्या बाजूने निकाल लागेल
निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे
उध्दव बाळासाहेब ठाकरे हा वेगळा गट म्हणून निर्णय झाला आहे
आम्हाला अपात्र करू शकत नाही
संजय राऊत हे भरकटलेले आहेत
अजित पवार आणि शरद पवार यांच्या वक्तव्याचा पण विरोध केला
राऊत कोणाचे आहेत नेमके शरद पवारांच की उध्दव ठाकरेंचे ते आता सोनिया आणि राहुल गांधी चे झालेत
आघाडी सुद्धा संजय राऊत यांना दोष देत आहेत.
राष्ट्रवादीत अंतर्गत भांडण संजय राऊत लावतात
संजय राऊत मूर्खांचा बाजार आहे
न्याय देवता आहे निकाल आमच्या बाजूने लागेल
आमची बाजू सत्याची आहे
-
सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला दिलासा तर शिंदे गटाला मोठा झटका
– शिंदे गटाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
– गटनेत्यापेक्षा पक्षाचा व्हीप महत्वाचा
– शिंदे गटाने कुठल्याही पात्रता पाठिंबा काढला नाही असे म्हटले नाही.
– बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही.
– राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.
-
बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरु शकत नाही – न्यायाधीश
बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरु शकत नाही – न्यायाधीश
पक्षांतर्गत वाद सोडवण्यासाठी फ्लोर टेस्ट वापरता येत नाही.
-
उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार थोड्याच वेळात मुंबईत होणार दाखल
उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार थोड्याच वेळात मुंबईत होणार दाखल..
त्यांच्या सोबत तेजस्वी यादव आणि अन्य मुख्यमंत्री आमदार व खासदार या ठिकाणी मुंबईत होणार दाखल..
नितीश कुमार यांच्या स्वागता साठी विमानतळ परिसरात jdu पक्षाचे कार्यकर्ते आणि नितीश कुमार यांचा चाहता वर्ग उपस्थित…
-
कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही.
शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून गोगावले (शिंदे गटाचा पाठिंबा असलेले) यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर – सर्वोच्च न्यायालय
कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही.
दहाव्या शेड्यूल अंतर्गत विभाजनाचा बचाव आता उपलब्ध नाही
-
नरहरी झिरवाळ यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नरहरी झिरवाळ यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की, आमदारांच्या मतदारसंघात कार्यक्रम होत असताना, त्यांना आमंत्रित करणे गरजेचे आहे..
किरकोळ बाबी सुधारण्याच्या आदिवासी विकास विभागाला दिला सल्ला
-जपानला जाऊन आल्यावर माझ्या पत्नीचे वजन 4 किलो वाढले.. (गंमतीने)
-केवळ रस्ता करून दिवे लावून विकास होत नाही.. त्याला शिक्षणाची देखील जोड हवी..
-मी काही फार हुशार नव्हतो, आजही नाही..
-मी नितीन गडकरी यांच्याकडे देखील विनंती केली होती, मजुरांसाठी निवारा शेड उभारून द्या..
-मला वाटलं सत्ताधारी आमदारांच्या कानावर आजचा काही निकाल आला की काय? (गंमतीने)
-टीआरटीईचे सब डीविजन हे नाशिकला द्यावे..
-आज भूमिपूजन झालेल्या कार्यक्रमाचे संशोधन कार्य लवकर सुरू होईल
-आमदार हिरामण खोसकर हे दोन तालुक्यांचे आमदार अजे, त्यामुळे त्यांना जास्त देत जा
-
मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही
मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही
-
आताची मोठी बातमी : भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
– काही प्रश्नांची उत्तर बाकी आहेत.
– हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे सोपविण्यात येत आहे.
– व्हीपची नेमणूक विधीमंडळ पक्षाद्वारे किंवा राजकीय पक्षाद्वारे केली जाते.
– भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
– राजकीय पक्षाची आश्वासने आणि धोरण यानुसार मतदान होते. पण, ते नंतर स्वत:ला दुसऱ्या पक्षाशी जोडू शकतात अशी व्यवस्था नाही.
-
राजकीय पक्षानं दिलेला व्हिप दहाव्या सुचीसाठी अत्यंत महत्त्वाचा
राजकीय पक्षानं दिलेला व्हिप दहाव्या सुचीसाठी अत्यंत महत्त्वाचा
३ जुलैला फुट पडली हे अध्यक्षांना कळालं होतं.
सत्तासंघर्षाचं प्रकरण मोठ्या घटनापीठाकडं
काही प्रश्नांची उत्तर बाकी आहेत.
कोर्टाचा आता चिन्हाबाबत निर्णय
गोंगावलेची प्रतोदपती नियुक्ती बेकायदेशीर
भरत गोगावले याची नियुक्ती बेकायदेशीर
-
निकालाशी संबंधित काही मुद्दे मोठ्या खंडपीठाकडे दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 27 जून 2022 रोजी दिलेला आदेश नबाम रेबियाच्या निर्णयावर विसंबून राहिला नाही आणि केवळ महाराष्ट्र उपसभापतींच्या नोटिसांना उत्तर देण्यासाठी वेळ वाढवला आहे. पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नबाम रेबिया प्रकरणातील 2016 च्या निकालाशी संबंधित काही मुद्दे मोठ्या खंडपीठाकडे दिले आहेत.
-
सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरु
सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरु
सात न्यायधिशांकडं सत्तासंघर्षाचं प्रकरण सुरु
-
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग
मुंबई :
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग
सुप्रीम कोर्टाची सर्वात मोठी घोषणा
-
दिल्लीच्या निणर्यामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका
दिल्लीच्या निणर्यामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका
– दिल्लीतल्या सेवा दिल्ली राज्यसरकारच्या अधीन राहतील
– सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल
-
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात
मुंबई :
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून वाचन सुरु
-
निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांशी संपर्क साधतील – जयंत पाटील
माझ्या लग्नाचा वाढदिवस होता
कालच सहा वाजता नोटीस हाती आली
नोटीसी मध्ये कोणताही कारण सांगितलेलं नाही
आयएफएलएस कधीही माझा संबंध आला नाही,मी त्यांच्या दारात कधीही गेलो नाही
कालच एका हवालदाराने नोटीस दिली आहे
( काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी फडणवीस यांना उद्देशून तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला असा उल्लेख केला होता. जयंत पाटील यांचे हे वाक्य महत्त्वाचं)
दोन-तीन दिवस लग्नसराई आहे घरांच्या जवळच्यांची लग्न आहेत
त्यामुळे वेळ मागणारे पत्र मी आज पाठवून देणार आहे
ईडीची नोटीस कशासाठी हे येते हे भारतात सगळ्यांनाच माहीत झाले
त्यामुळे त्यांना जी सोयीची तारीख वेळ वाटते तशी ती नोटीस पाठवतात
माझं राजकीय आयुष्य म्हणजे उघडी किताब आहे
घोटाळे करण्याचे कार्यक्रम मी कधी केले नाही
तुम्हाला कारण माहिती आहेत, यावर सविस्तर नंतर सविस्तर बोलू
अध्यक्षपदावर शरद पवार यांच्यासाठी आग्रही होता त्यामुळे ही नोटीस आली का?
या प्रश्नावर जयंत पाटील यांचा असू शकेल असं उत्तर
आपण राजकारणात आहोत समोरच्याने काहीच करू नये असं गृहीत धरणं चुकीचं
कर्ज काढायचं नाही हे माझं लहानपणापासून धोरण
कर्ज काढले की माणूस घोटाळ्यात येतो त्यामुळे माझा आयएलएफसी काही संबंध नाही
नोटीसीला सहकार्य करणार, योग्य उत्तर देऊ
उदया हजर राहायला सांगितलं होतं मात्र वेळ मागणारे पत्र आज देणार आहे
आमच्या पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नाही
राजीनामा नाट्य नंतर अजित पवार आणि माझी फारशी चर्चाही झालेली नाही
या आधी ज्यांना नोटीसी आल्या त्यांच्याशी बोललो
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून महाराष्ट्रात दुसरा पक्ष नाही असं ईडी ला वाटत असेल
निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांशी संपर्क साधतील
-
निर्णय कुणाच्या बाजून येणार ठाकरे की शिंदे ?
निर्णय कुणाच्या बाजून येणार ठाकरे की शिंदे ?
थोड्याचं वेळात सत्तासंघर्षावरती निर्णय येणार
-
आम्ही मुद्देशीर पद्धतीने मांडत आहोत – अरविंद सावंत
बेकादेशीर लोक सरळ दावा करत आलेले आहेत ज्याप्रमाणे इलेक्शन कमिशन ने निर्णय दिला ते आता सर्वोच्च न्यायालयाला देखील या ठिकाणी संशयाच्या भवऱ्यात आणत आहेत
आम्ही मुद्देशीर पद्धतीने मांडत आहोत
त्यांनी कोणते विषय मांडलेले आहेत ते सांगावे
आज होणार निर्णय आहे तो फक्त महाराष्ट्राला नाहीतर देशाला फरक पडत असा निर्णय आहे
यापूर्वी पक्षांतर देखील होत होती तेव्हा पक्षांतर कायदा का आणला हा देखील प्रश्न आहे
पण याआधी देखील पक्षांतर झालं पण एवढा मोठ्या संख्येने झालं नाही
जर दोन तृतीयांश लोक या ठिकाणी वेगळे होत असतील तर त्यांना देखील वेगळा गट किंवा वेगळा पक्ष निर्माण करता येणार नाही त्यांना विलीनीकरण करता येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे
त्या ठिकाणी म्हणत आहेत दोन तृतीयांश नाही पहिले अर्ध केले नंतर अर्धे गेले असं त्या ठिकाणी बोलत आहेत
जर त्यांना जायचं होतं तर त्यांनी यादी पक्षाशी बोलले असते पक्षासोबत चर्चा केली असती
त्यानंतर अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव देऊ शकले असते
हे सर्व काही न करता तुम्ही या ठिकाणी सोडून जाणं आणि हेडकॉटर च्या छत्रछाय खाली राहणं हे कसं काय होतं बरं
आणि हे लोक ज्या ठिकाणी गेली ते सर्व भाजपचे राज्य कसे काय याचा विचार कोणी केला का नाही
त्याच पक्षांतर्गत कायद्याअंतर्गत हे सर्व लोक या ठिकाणी अपात्र व्हायला हवेत
पण ते या ठिकाणी अपात्र होणार आहे हाच अर्थाने संविधानाचे रक्षण करण आह
आज संविधानाचा विचार झाला नाही तर देशातील उद्या कोणीही कुठे आणि नवीन पक्ष दावा करेल आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याला शून्य अर्थ राहील
अपात्रतेची प्रक्रिया पूर्ण झाली नाही असं कोण म्हणतं हे पहिले तपासून पहा
कोड बोलत आहे का असं किंवा सर्वोच्च न्यायालय बोलत आहेत का असं
मुळात त्यावेळी अध्यक्षच नव्हते त्यामुळे उपाध्यक्षांनी निर्णय घेतला व त्यांना तो अधिकार आहे
व आता त्याच्यावरती नव्या अध्यक्ष बोलत आहेत
पण आता जे अपत्र झाले मग अपत्रांनी निवडून दिलेले अध्यक्ष हे पात्र कसे काय असू शकतात
जर अपात्र असलेल्या लोकांनी एका नागरिकाला निवडून दिलं तर असं कसं काय होऊ शकतं
मग ही कॉन्ट्रोव्हर्सी आहे त्यामधले..
मग या ठिकाणी संविधानाचे संरक्षण झालं पाहिजे
आणि संविधानामध्ये ही तरतूद आहे की पक्षांतर बंदी असा कायदा आहे
आणि जर त्यामध्ये पक्षांतर झालं असेल तर त्यावर काय कारवाई आहे तर अपात्रतेची तरतूद या ठिकाणी आहे
आणि आम्हाला वाटतं अपात्रतेची या ठिकाणी या ठिकाणी निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे
देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास कुठून येतो हे त्यांना विचारावा
माझं म्हणणं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही हा सगळ्यांच्या मनात प्रश्न आला पाहिजे
देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे की लोकशाही जिवंत आहे का की हुकूमशाही आहे
ती एकदा विचारून घ्या महाशक्ती आमचं काही करू शकत नाही आम्हाला कोणी निर्बंध घालू शकत नाही या ठिकाणी समज पसरवला जात आहे
मग त्यांना सीबीआय इलेक्शन कमिशन आणि ज्या काही संस्था आहेत त्या यांना पाहिजे त्या पद्धतीने वागवत आहेत
तुझ्याशी महाशक्तीची काम आहे तर कोर्टाने अनेक वेळा ईडीला फेटाळलेला आहे त्यांना चपराक पडलेला आहे
मी जे मुद्दे मांडले आहेत ते लोक मांडत आहेत का
फक्त कायदेशीर आहेत असं बोलत आहेत परंतु ते सुरतला गेले गुहाटी ला गेले पक्षाच्या अध्यक्षला न सांगता केले हे सगळं कायदेशीर आहे का
आणि त्या वेळी तर राजतल्यापालांनी तर सगळे कायदे गुंडाळून ठेवले होते
राज्यपालांसोबत बाकी सगळे जे काही वागलेले आहेत ते घटनाबाह्य वागलेले आहेत
हे संविधान बाह्य घटना सरकार आहे.
-
थोड्याचं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पीएस नरसिम्हा हे महाराष्ट्रातील निकाल देणार
-
सत्ता संघर्षाच्या निकालाडे सर्वांचे लक्ष
निकालावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया
निकाल आपल्या बाजुने लागणार शिवसेनेच्या नेत्यांना विश्वास
-
राज्यांची केंद्र सरकारने हाती घेऊ नये – सरन्यायाधीश
राज्यांची केंद्र सरकारने हाती घेऊ नये – सरन्यायाधीश
केंद्रशासित प्रदेशामुळं दिल्लीला अमर्यादीत अधिकार
२०१९ मध्ये केंद्राला अधिकार मिळाले होते.
-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पाहा LIVE
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पाहा LIVE
Live निकाल पाहण्यासाठी क्लिक करा : https://www.tv9marathi.com/live-tv -
दिल्ली प्रकरणावर पाच न्यायाधीशांचे निकाल वाचन सुरू
दिल्लीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या निकालाचे वाचन सुरू होणार
दिल्लीमध्ये प्रशासकीय सेवांचे अधीकार कोणाकडे राहील या प्रकरणी निकालाचे वाचन सुरू
-
दिल्ली सरकार विरुद्ध लेफ्टनंट गव्हर्नर प्रकरणाचा निर्णय येण्यास सुरुवात
दिल्ली सरकार विरुद्ध लेफ्टनंट गव्हर्नर प्रकरणाचा निर्णय येण्यास सुरुवात, सर्वोच्च न्यायालय म्हणाले – आम्ही 2019 च्या निर्णयाशी सहमत नाही
-
राहुल शेवाळे कोर्टात दाखल
राहुल शेवाळे कोर्टात दाखल
-
दिल्लीतील बदल्यांचे अधिकार कुणाला ? यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय
दिल्लीतील बदल्यांचे अधिकार कुणाला ? यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय
-
२०१९ निकालावर सहमत नसल्याचं न्यायाधिशाचं मत
दिल्लीच्या निकालाचं न्यायाधीशांकडून वाचन सुरु
पाच न्यायाधिशांचा खंडपीठाचा लाईव्ह निकाल
दिल्लीच्या निकालावर खंडपीठाचं एकमत
२०१९ निकालावर सहमत नसल्याचं न्यायाधिशाचं मत
-
पाच न्यायाधिशांचा खंडपीठाचा लाईव्ह निकाल
दिल्लीच्या निकालाचं न्यायाधीशांकडून वाचन सुरु
पाच न्यायाधिशांचा खंडपीठाचा लाईव्ह निकाल
-
आजच्या सुनावणीत काय होते, याचीही आम्ही वाट पाहत आहोत, असे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.
आजच्या सुनावणीत काय होते, याचीही आम्ही वाट पाहत आहोत, असे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.
सुनावणीत जो निर्णय होईल, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत.
संजय राऊत यांच्यावर देश कायद्यानुसार चालेल की नाही आणि आज जे काही समोर येईल, त्याची मीही वाट पाहत आहे
-
दिल्लीच्या निकालाचं न्यायाधीशांकडून वाचन सुरु
दिल्लीच्या निकालाचं न्यायाधीशांकडून वाचन सुरु
-
कोणत्याही क्षणी महाराष्ट्राचा निकाल येणार
कोणत्याही क्षणी महाराष्ट्राचा निकाल येणार
-
घटनापीठ कोर्टरूममध्ये दाखल
दिल्लीच्या निकालाचे वाचन सुरू झाले
पुढच्या दहा मिनटांत महाराष्ट्राचा निकाल येण्याची शक्यता
-
दिल्लीचा निकाल वाचायला सुरुवात झाली आहे
दिल्लीचा निकाल वाचायला सुरुवात झाली आहे
-
निकालाचे काउंट डाऊन सुरू
नियोजीत कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस नवी मुंबईला रवाना
-
‘मातोश्री’ आणि ‘सामना’ कार्यालय बाहेरील सुरक्षा वाढवली
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर काही वेळात निर्णय येणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीय या निकालाचं वाचन करणार आहेत. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या निकालानंतर राज्यातील राजकारणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील हा संघर्ष या निकालानंतर आणखी वाढू शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याची सुरक्षा आणि सामनाच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्ट १६ आमदारांना अपात्र ठरवणार की निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना देणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता हा निर्णय शिवसेना कुणाची यावर देखील परिणाम करणारा ठरु शकतो.
-
न्यायमुर्तींच्या खुर्च्या लावण्यात आल्या आहेत, थोड्याच वेळात निकाल येणार
काही मिनीटात निकाल येणार, निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष
११.४० मिनीटांनी निकाल येण्याची शक्यता
-
आपली भूमिका संपली – राज्यपाल
आपली भूमिका संपली – राज्यपाल
-
ईडीची नोटीस कशासाठी येते लोकांना चांगलचं माहित आहे – जयंत पाटील
जयंत पाटील
काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता
मला काल ईडीने रात्री नोटीस पाठवली
माझ्या त्या केसचा संबंध नाही
तरी आता बोलावलं आहे.
दहा वाजता एका हवालदाराने मला नोटीस दिली आहे.
मी चौकशीला हजर राहणार आहे
ईडीची नोटीस कशासाठी येते लोकांना चांगलचं माहित आहे.
ज्या कंपनीच्या माहितीसाठी मला बोलावलं आहे, त्याबाबत मला काहीचं माहीत नाही
-
दिल्लीच्या निकालाचं वाचन सुरु, त्यानंतर महाराष्ट्राचा निकाल लागणार
दिल्लीच्या निकालाचं वाचन सुरु
त्यानंतर महाराष्ट्राचा निकाल लागणार
सामना कार्यालायाबाहेर पोलिस बंदोबस्त
मातोश्री बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त
-
दोन तृतांश विलनीकरण झाला झाले आहे का ?
अरंविद सावंत पत्रकार परिषद
दोन तृतांश विलनीकरण झाला झाले आहे का ?
पक्षांतर बंदी कायद्यानुसार हे सर्व आमदार अपात्र ठरणार
त्यांनी घेतलेला निर्णय आहे तो
जे अपात्र आमदार त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणून दिले ते पात्र कसे असतील
-
निकालानंतर शिंदे आणि फडणवीस पत्रकार परिषद घेणार
थोड्याच वेळात घटनापीठ बसणार
-
जो काही निर्णय येईल, त्याचा परिणाम निश्चितच चिरकाल असेल
-आज येणारा निकाल हा मी दिलेल्या निर्णयाला धरूनच असेल असा माझा विश्वास आहे..-कारण मी दिलेल्या निर्णयाला घटनेचा आधार आहे..-जो काही निर्णय येईल, त्याचा परिणाम निश्चितच चिरकाल असेल-16 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे, त्यामुळे त्यांच्या पदाला धोका होऊ शकतो-माझ्या दोन्ही घरांच्या इथे नेटवर्क नसल्याने माझा फोन लागत नव्हता.. -
सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय होईल- राधाकृष्ण विखे पाटील
- जो निर्णय येईल तो सर्व स्विकारतील.
- घटनेची पायमल्ली न करता आमचे सरकार स्थापन झालंय.
- आमची बाजू सत्याची, विजय आमचाच होईल.
- सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा.
-
शिंदे आणि फडणवीस निकालानंतर पत्रकार परिषद घेणार
शिंदे आणि फडणवीस निकालानंतर पत्रकार परिषद घेणार
थोड्याच वेळात घटनापीठ बसणार
-
निकाल काही आला तरी आम्ही त्याचं स्वागत करणार – सुषमा अंधारे
- निकाल का येतोय हा एक माईल स्टोन आहे.
- संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेच्या संबंधाने अभ्यासकांच्या संबंधाने तसेच आयाराम गयाराम करत सतत सत्तेच्या खुर्चीच्या मागे धावाधाव करणारे अशा सर्वांसाठी हा निकाल एक लँडमार्क असणार आहे.
- या निकालाच्या निमित्ताने या देशात लोकशाही जिवंत आहे किंवा नाही याचा सुद्धा निकाल आज लागणार आहे.
- आम्ही ठरवलं आहे येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि निवडणुकांना अजून आठ-दहा महिने आहेत.
- लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडणे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
-
मातोश्रीची सुरक्षा वाढली
कुठल्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता
-
निकाल सकारात्मक राहील अशीच अपेक्षा – सुजय विखे पाटील
- मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास.
- सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सकारात्मक राहील अशीच अपेक्षा.
-
सत्ता संघर्षाचा निकाल साधारणता एक वाजता येईल
सत्ता संघर्षाचा निकाल साधारणता एक वाजता येईल
आधी दिल्लीच्या एका केस निकाली आणि मग आपल्या राज्याच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल त्यामुळे थोडासा वेळ जाईल
हा निकाल देशाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असेल
कारण पक्षांतर बंदी सारख्या कायद्याला नवं वळण देणारा हा निकाल असू शकतो
हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवलं जाईल
न्यायालय कायद्याच्या अनेक बाजू पाहून हा निकाल देईल आणि अध्यक्षांना देखील न्यायालय काही नियम घालून देईल
-
सत्ता संघर्षाचा निकाल देशाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असेल – असीम सरोदे
- पक्षांतर बंदी सारख्या कायद्याला नवं वळण देणारा हा निकाल असू शकतो.
- हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवलं जाईल.
- न्यायालय कायद्याच्या अनेक बाजू पाहून हा निकाल देईल.
- अध्यक्षांना देखील न्यायालय काही नियम घालून देईल.
-
सामना कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
सामना कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
सुप्रीम कोर्टातील शोकसभा संपली
-
युद्धाच्या मैदानात उतरल्यावर जय पराजयाचा विचार करू नये- अब्दुल सत्तार
निकाल आमच्या बाजुने अपेक्षीत असला तरी न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल- अब्दुल सत्तार
एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आम्ही खंबीर पणे उभे आहोत- अब्दुल सत्तार
-
निकाल लोकशाहीची बूज राखणारा असावा – अंबादास दानवे
निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे.
राज्यपालांनी बोलावलेली बहुमत चाचणी बेकायदेशीर होती असंही ठरू शकतं
निकाल विधानसभा अध्यक्षांकडे जाईल असं आम्हाला वाटतं
बंडखोर आमदार सहा वर्षांसाठी निलंबित झाले तर मग कशी निवडणूक लढवणार ?
-
निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. असे माझे मत आहे – अनिल बाबर ( शिंदे गट )
शिवाय आम्ही समाजासाठी काम केले आहे. लोकं समाधानी तर आम्ही समाधानी .
आज निर्णय लागला की सरकार कोसळणार असे काही नाही. विरोधक त्यांची भूमिका पार पाडतात.
मी टी.व्ही बघत नाही. मी माझ्या मतदार संघात फिरलो आणि रात्र भर निवांत झोपलो. शिवाय माझ्या वाट्याला जय पराजय हा आहेच. तो मी मान्य करतो.
माझे ठरलेले कार्यक्रम मी पार पाडत आहे. निकाल जो असेल तो मान्य करू आणि पुन्हा लोकांच्या दारात जाईन.
-
निकाल आमच्याच बाजूने लागेल – संजय शिरसाट
– आमची बाजू आम्ही भक्कमपणे मांडली
– आमच्या अपात्रतेचा प्रश्नच निर्माण होत नाही
– १० वी सूची आम्हाला लागू होत नाही
– आम्ही कोणतंही चुकीचं कृत्य केलेलं नाही
-
निकालासाठी तुळजाभवानी देवीला साकडे घातले नाही लोकांच्या कल्याणासाठी साकडे घातले – चंद्रशेखर बावनकुळे
– जयंत पाटील यांनी ईडीच्या प्रश्नांना उत्तरे दिले पाहिजेत
– सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सत्तेवर परिणाम होणार नाही
-
आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास – अब्दुल सत्तार
– कोर्ट जो निकाल देईल तो मान्य असेल
– कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की निश्चित राहा.
– मला काही टेन्शन नाही
– संजय राऊत यांना काय ट्विट करायचे ते करू द्या, ते आत्ता महत्वाचं नाही
-
भाजप आमदार प्रवीण दरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेटीसाठी शिवतीर्थ वर दाखल
– येत्या 14 मे रोजी गोरेगाव नेस्को येथे गृहनिर्माण सोसायट्यांची सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
– या निमित्ताने प्रवीण दरेकर आज राज ठाकरेंची भेट घेत आहेत.
– तर आज सत्ता संघर्षावार येणाऱ्या निर्णयाबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता
-
मुख्यमंत्री अपात्र ठरल्यास सरकार कोसळणार – संजय राऊत
16 आमदार अपात्र ठरले तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील – राऊत
न्यायालय स्वतंत्र आहे की नाही त्याचा निर्णय आज होईल
-
मुंबई : बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दुपारी शरद पवार यांची भेट घेणार
– बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दुपारी 2 वाजता सिल्व्हर ओक वर शरद पवार यांच्या भेटीसाठी येणार आहेत.
– सिल्व्हर ओक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
– सत्ता संघर्षाचा निकाल नंतर शरद पवार आणि नितीश कुमार यांची सिल्व्हर ओक वर दुपारी बैठक होईल
– या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
-
आम्ही न्याय विकत घेणारे माणसे नाही- संजय राऊत
आम्ही न्याय विकत घेणारे माणसे नाहीत- संजय राऊत
न्याय विकत घेणारी माणसे सत्तेवर आहे
आमच्या न्यायावर विश्वास आहे
अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्यांकडे यावा
मुर्ख लोक बोलताय निकाल आमच्या बाजूने लागेल
-
अमित ठाकरे यांनी घेतली दीपक केसरकर यांची भेट
अमित ठाकरे यांनी घेतली दीपक केसरकर यांची भेट
शिक्षण हक्क कायद्यातल्या २५ टक्के जागांबाबत भेट
शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
त्यानुसार 25 टक्के प्रवेश दिले जातात.
तबब्ल 1800 कोटी रुपये सरकारने शाळांना देणे बाकी आहे.
त्यामुळं संस्थांना प्रवेश देणे परवडत नाही.
याबाबत शिक्षण मंत्र्यांना अवगत केल असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटेपासूनच अवकाळी पाऊस कोसळत आहे. सावंतवाडी बांदा शहर व इतर भागात आज सकाळीच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास दोन तास हा पाऊस सुरु होता.
-
सरकारला धोका नाही
१४५ आमदारांचे पाठबळ असेपर्यंत सरकारला धोका नाही
निकालापूर्वी अजित पवार यांचा मोठा दावा
पवार यांच्या दाव्यानुसार निकाल काही आला तरी सरकारला धोका नाही
-
16 आमदार अपात्र होतील- झिरवळ
१६ आमदार अपात्र होतील- नरहरी झिरवळ
सरकार कोसळणार असल्याचा झिरवळ यांचा दावा
-
अमित ठाकरे दीपक केसरकर यांच्या भेटीला दाखल
अमित ठाकरे दीपक केसरकर यांच्या भेटीला दाखल शिक्षण हक्क कायद्यातल्या २५ टक्के जागांबाबत भेट
-
थोड्याच वेळात सत्ता संघर्षावर निकाल येणार
थोड्याच वेळात सत्ता संघर्षावर निकाल येणार
निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल दिल्लीतील वकिलांचे मत
आज निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 40 वर्षांचा अनुभव
घटनापीठ काय निर्णय देणार ? देशाचे लक्ष
दिल्लीतल्या वकील मंडळींमध्येही निकालाबद्दल कुतूहल
दरम्यान या संदर्भात नवी दिल्लीतले वकील संजय शिरसाट आणि सिद्धार्थ शिंदे यांच्याशी बातचीत केले आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी
-
कल्याणमध्ये कारवाई
कल्याणमध्ये तडीपारी आणि मोक्का कारवाईला वेग
वर्षभरात 16 लोकांवर तडीपार तर 8 जणांवर मोक्का
कल्याणमधील दादा भाईंच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
-
दिल्लीतील वकील म्हणतात…
थोड्याच वेळात सत्ता संघर्षावर निकाल येणार
निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल दिल्लीतील वकिलांचे मत
आज निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 40 वर्षांचा अनुभव
घटनापीठ काय निर्णय देणार ? देशाचे लक्ष
-
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे माझ्या मतदार संघातील असल्याने मला अभिमान- आमदार दिलीप मोहिते
देशाचे न्यायाधीश म्हणून महत्वपूर्ण निकाल घेणार आहेत
गेली नऊ महिने सुरू असलेला सत्तासंघर्ष सुरू आणि हा एक ऐतिहासिक निर्णय ठरू शकेल
मैलाचा दगड राहील असा निर्णय आज होण्याची शक्यता वाटते
आत्तापर्यंत न्यायाधीश चंद्रचूड यांनी धाडसी निर्णय घेतले आहेत
धाडसी न्यायव्यवस्थे मधील कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारे न्यायाधीश आहेत- मोहिते
-
निकाल येऊ द्या, आता जर-तर टिपण्णी करणे योग्य नाही- चंद्रशेखर बावनकुळे
निकाल काही आला तरी फरक पडणार नाही, भाजप पक्ष वाढणार
सध्या पक्षप्रवेशसाठी कोणी अप्रोच झालं नाही
वज्रमूठ सैल होणार आहे
महाविकास आघाडी नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत, त्यांना स्वतःचा पक्ष चालवता आला नाही- बावनकुळे
-
नीतीश कुमार आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची घेणार भेट
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नीतीश कुमार घेत आहेत देशभर नेत्यांच्या भेटीगाठी
काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी घेतली भेट
मुंबईत दुपारी ‘मातोश्री’वर नीतीश कुमार उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
उद्धव ठाकरे यांनी नीतीश कुमारांना स्नेहभोजनाचं दिलं आमंत्रण
‘मातोश्री’ भेटीनंतर नीतीश कुमार ‘सिल्वर ओक’वर शरद पवार यांची भेट घेऊन करणार चर्चा
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत
संजय राऊत यांनी ट्विट करत नरहरी झिरवळ यांच्यावर साधला निशाणा
‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!’
संजय राऊत यांचं ट्विट
-
आम्हाला पूर्ण विश्वास आणि आशा आहे की न्यायाचा विजय होईल- आनंद दुबे
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लगेचच येणार आहे
आम्हाला पूर्ण विश्वास आणि आशा आहे की न्यायाचा विजय होईल
आतापर्यंत जो अत्याचार आणि अपमान झाला त्यातून मुक्ती मिळेल
अखेर विजय सत्याचाच होईल
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया
-
सत्तासंघर्षाचा निकाल देशातील जनतेला लाईव्ह पाहता येणार
सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महानिकाल थोड्याच वेळात
निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
एकनाथ शिंदे राहणार की जाणार? उत्सुकता वाढली
-
अजित पवार नाशिकमध्ये असताना नरहरी झिरवाळ मात्र नॉट रीचेबल
झिरवाळ आपल्या गावात देखील नसल्याने चर्चाना उधाण
झिरवाळ यांचे सगळे फोन सकाळपासून बंद
सत्तासंघर्षावर आज सकाळी लागणार निकाल
सुप्रीम कोर्टाच्या निकाला दिवशीच झिरवाळ नॉट रीचेबल
-
सुप्रीम कोर्टात आज राज्याच्या सत्ताकारणाच्या निकालाची शक्यता, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 आमदारांचे भवितव्य ही या निकालावर अवलंबून
आज सिल्व्हर ओक वर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट होणार आहे
नितीश कुमार सिल्व्हर ओकवर येणार असल्याने सिल्व्हर ओक परिसरात नितीश कुमारचे सर्वत्र बॅनर लागले आहेत
देश मांगे नितीश असा आशय या बॅनरवर असून त्यामुळे शरद पवार आणि नितीश कुमारच्या बैठकीत नेमकं काय घडतंय, देशाच्या राजकारणाची काय नीती ठरतेय हे पाहणं गरजेचे आहे
-
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचा निकाल, दुसरीकडे मुख्यमंत्री लग्न सोहळ्यात व्यस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विरोधीपक्ष नेते अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या लग्नाला लावणार हजेरी
तर अजित पवार यांचे देखील नाशिकमध्ये विविध कार्यक्रम
दुपारी 4 च्या सुमारास मुख्यमंत्री नाशिकमध्ये होणार दाखल
तर अजित पवार यांचे सकाळपासून कार्यक्रम
-
‘निक्काल’ कुणाचा? राज्यातील सत्ता संघर्षाचा फैसला थोड्याच वेळात
राज्यातील सत्ता संघर्षावर 11.30 वाजता निकाल लागणार
सर्वोच्च न्यायालय देणार महानिकाल, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
निकालावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला ठरणार
-
सुप्रीम कोर्टाचा निकाल जो पर्यंत येत नाही तो पर्यंत बोलणं योग्य नाही; राहुल शेवाळे
नवी दिल्ली :
उद्या दोन निकालांची घोषणा होणार आहे. हे ऐतिहासिक निकाल असतील.
राज्यातील राजकीय अस्थिरतेचा शेवट होईल.
महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं.
अमेंडमेंटच्या व्यतिरिक्त नवीन प्रयोग या प्रकरणात झालाय.
त्याला मान्यता मिळेल का हे निकालातून दिसेल.
आम्ही केलेल्या सर्व गोष्टी घटनेला धरून आहेत.
घटनाबाह्य कोणतीही गोष्ट केली नाहीये.
महाविकास आघाडीचे हेच नेते कोर्टाच्या विरोधात यापूर्वी बोलले आहेत.
सर्वोच्च घोटाळा , दिलासा घोटाळा असे वक्तव्य केले आहेत.
त्यांचाच घोटाळा दिसून येतोय.
सुप्रीम कोर्टाचा निकाल जो पर्यंत येत नाही तो पर्यंत बोलणं योग्य नाहीत
राहुल शेवाळे यांचं मत
-
माझा न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर विश्वास – यामिनी जाधव
- माझा न्यायव्यवस्थेवर व बाबासाहेबांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे.
- एकाच क्षेत्रातील डॉक्टरांचे वेगवेगळे विचार असू शकतात तसे अनेक जण तर्क वर्तवत आहेत.
- भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांचा सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देतांना विरोधकांना टोला
-
निकालाआधी दिल्लीत राहुल शेवाळे यांची वकिलांसोबत बैठक
- मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींची आज महत्त्वपूर्ण बैठक
- खासदार राहुल शेवाळे यांची वकिलांसोबत आज रात्री होणार बैठक
- महेश शेठमलांनी, नीरज किशन कौल यांच्यासोबत होणार बैठक
- खासदार राहुल शेवाळे आणि निहार ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार
-
कायद्यानुसार 16 आमदार अपात्र होतील हीच शक्यता -असीम सरोदे
- जर उद्याचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने आला तर शिवसेना कोणाची या बाबतीत ठाकरेंचे पारड जड होईल.
- याआधी देखील मी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाचा निकाल आधी येणं चुकीचं होतं.
- कायद्यानुसार 16 आमदार अपात्र होतील हीच शक्यता.
- सुप्रीम कोर्ट हे सगळे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देईल.
- फक्त निकाल देताना काय अटी व नियम घालेल हे पाहणे महत्वाचे ठरणार
-
राज्यातील राजकीय अस्थिरतेचा उद्या शेवट होईल – राहुल शेवाळे
- उद्या दोन निकालांची घोषणा होणार आहे. हे ऐतिहासिक निकाल असतील.
- राज्यातील राजकीय अस्थिरतेचा शेवट होईल.
- महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
- अमेंडमेंटच्या व्यतिरिक्त नवीन प्रयोग या प्रकरणात झालाय.
- त्याला मान्यता मिळेल का हे निकालातून दिसेल.
- आम्ही केलेल्या सर्व गोष्टी घटनेला धरून आहेत.
- घटनाबाह्य कोणतीही गोष्ट केली नाहीये.
-
सरकार पूर्ण काळ टिकणार – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
निकाल आमच्या बाजूने लागणार आहे.
हे सरकार पूर्ण काळ टिकणार आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
-
निकाल आमच्याच बाजूने लागेल यावर आमचा विश्वास : कृपाल तुमाने
- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागेल
- निकाल आमच्याच बाजूने लागेल यावर आमचा विश्वास
- 16 आमदारांचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा आणि सुप्रीम कोर्टाला देखील आहे
- आम्ही सगळ्या बाबी कोर्टासमोर मांडल्या आहेत
- सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच आम्ही काम केलं आहे
- त्यामुळे आमच्याच बाजूने निर्णय येईल याची खात्री आहे
-
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचन करणार
- पाचही न्यायाधीशांमध्ये एकमत
- सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचन करणार
- सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट नुसार सर्व न्यायाधीशांमध्ये एकमत
-
…तर 16 आमदार उद्या अपात्र ठरतील – नाना पटोले
- आर्टिकल 10 प्रमाणे निर्णय झाल्यास 16 आमदार उद्या अपात्र ठरतील. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.
- तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.
- त्यामुळे आता पुन्हा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे हे आमदार अपात्रच होतील.
- महाविकास आघाडीचं सरकार ज्या प्रकारे पाडण्यात आलं, त्यापेक्षा ही मोठी घटना नक्कीच नसेल.
-
सरकार स्थिर, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत – देवेंद्र फडणवीस
- सरकार स्थिर आहे, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत.
- 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील.
- निकालावर सगळा मुर्खांचा बाजार सुरु आहे.
-
विरोधात जाऊन मतदान केलं नाही त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल – रमेश बोरणारे
- निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे.
- आम्ही कुठलीही चूक केलेली नाही, व्हीप मोडला नाही.
- विरोधात जाऊन मतदान केलं नाही त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल.
-
निकाल आमच्या बाजूने लागेल कारण आमची सत्याची बाजू – संदीपान भुमरे
सत्तासंघर्षाची चर्चा देशभर सुरू आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल कारण आमची सत्याची बाजू आहे.
आम्ही उठाव केला यात काही गैर नाही त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल, आम्हाला धाकधूक लागलेली नाही.
माझे आज उद्या प्रोग्रॅम कायम आहेत. आमची काही चूक नाही त्यामुळे धाकधूक लागण्याचे काही कारण नाही.
खैरे यज्ञाला बसले तरी त्याला जास्त महत्व देऊ नका. देव पाण्यात बुडवून बसले. खैरे आता काही महत्व देण्यासारखे माणूस राहिलेले नाही
-
निकाल आमच्या बाजूनेच येईल – गुलाबराव पाटील
- निकालाची कोणालाच धाकधूक नाहीये.
- निकाल आमच्या बाजूनेच येईल.
- कोर्टाच्या पुढे कोणी जात नाही,कोर्टाचा निकाल सर्वमान्य करावा लागतो म्हणून माझ्यासारख्याने सुप्रीम कोर्टवर बोलणं योग्य नाही.
- या देशाच्या लोकशाहीत सर्वोच्च मान कोर्टाला आहे.
- कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा.
- माझं वैयक्तिक मत आहे की,निकाल आमच्या बाजूने येईल.
-
उद्या दूध का दूध व पाणी का पाणी होईल – चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil on Ahead Of MLA Disqualification Hearing In SC
- 100 टक्के निकाल आमच्या बाजूने लागणार
- राजकीय अभ्यासकांच्या मते अध्यक्षांकडे निकाल येईल
- उद्या दूध का दूध व पाणी का पाणी होईल
- आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला काही सांगत नाहीये का? त्यावरून तुम्ही समजून घ्या
- सरकार शिंदे साहेबांचेच असेल
- शिंदे सरकारच्या विकास कामांमुळे यापुढे देखील जोमाने काम करता येईल
- कायदेशीर दृष्टीने बघितलं तर ही खरी लढाई अध्यक्षांच्या कोर्टातली आहे
- सुनावणी होण्याआधीच हे कोर्टात गेले आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यामुळे या निकालात खूप काही हवा राहिलेली नाही
- घटनापिठाचा निर्णय हा आमच्या बाजूने येईल
- संजय राऊत यांना सिरीयस घेण्याची गरज नाही
-
सत्याचा विजय होतो म्हणून उद्या सत्याचा विजय होणार – सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar on Ahead Of MLA Disqualification Hearing In SC
- कशाचा सत्तासंघर्ष.?,सत्तासंघर्ष असता तर आम्ही इथे दिसलो असतो का?
- कोर्टाला असं अपात्र करता येत नाही,म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही
- सत्याचा विजय होतो म्हणून उद्या सत्याचा विजय होणार
- काही लोकं हवा पसरवतात,मायावी विचार मांडतात आणि गैरसमज निर्माण करतात
- काहीही सत्तासंघर्ष नाही आम्ही जनतेच्या विकासासाठी काम करतो व करत राहणार
- मुंगेरीलालचे DNA असणारे काही नेते आज आहेत…संजय राऊतांना टोला
- मुख्यमंत्री अपात्र होतंच नाही तर बदलाचा प्रश्न येतोच कुठे
- सुधीर मुनगंटीवार यांची सत्तासंघर्षावरील निकालाआधी प्रतिक्रिया
-
शिवसेनेकडे आता स्वप्न बघण्यापलीकडे काही राहिलेलं नाही – गिरीश महाजन
SC hearing MLA Disqualification LIVE Update
– सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देतात की उद्या देतात हे त्यांच्या मर्जीवर आहे. – संजय राऊत यांनी स्वप्न पाहत राहावी. – स्वप्न बघायला पैसे लागत नाही. – स्वप्नाशिवाय दुसरं काय बघणार. – शिवसेनेकडे काहीच राहिलेलं नाही. – निकाल आम्हाला अपेक्षित आहे तोच लागेल व मेरिटवर लागेल. – आत्तापर्यँतचे सर्व निकाल मेरिटवरच लागलेले आहेत. – शिवसेनेकडे आता फक्त स्वप्न बघण्यापलीकडे काही राहिलेलं नाही – त्यांनी आता निकालाची वाट बघावी.
-
Sanjay Raut : न्याय यंत्रणा स्वतंत्र आहे की नाही, याचा फैसला उद्या होईल
संजय राऊत यांचे सूचक विधान
या देशात लोकशाही आहे की नाही हे समजेल
देश संविधानानुसार चालतोय का?- राऊत
आम्ही आशावादी आहोत
-
Court Live : उद्या सत्तासंघर्षाचा महाफैसला
सुप्रीम कोर्टातून सत्तासंघर्षाचा निकाल लाईव्ह
सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडून लाईव्ह स्ट्रिमिंग
16 आमदारांचं उद्या काय होणार?
सुप्रीम कोर्ट सुनावणार याचिकांवर निकाल
अपात्रतेचा चेंडू नेमका कोणाच्या कोर्टात?
की कोर्टच लावणार या प्रकरणाचा निकाल
-
न्यायदेवतेवर विश्वास आहे – आदित्य ठाकरे
SC Hearing on MLA disqualification Live Update
आता 24 तास थांबायला पाहिजे. निर्णय लवकर येणार आहे.
एवढे महिने आपण थांबलेलो आहे. न्यायदेवतेवर विश्वास आहे.
आदित्य ठाकरे यांची सत्तासंघर्षाच्या निर्णयाआधी प्रतिक्रिया
-
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल असेल – उज्जवल निकम
याचे दूरगामी परिणाम होणारहंगामी अध्यक्ष नेमून त्यांच्याकडे प्रकरण जाऊ शकतं -
निर्णय काय होतो हे पाहणं अपेक्षित आहे – पृथ्वीराज चव्हाण
पण राजकीय निर्णय होईल असं अपेक्षित आहे
पण जर त्यांना अपात्र ठरवलं तर काय होईल हे ही पाहावं लागेल
जर ते अपात्र झाले तर मुख्यमंत्री कोण हा ही मुद्दा पुढे येईल
10 व्या परिशिष्टाबाबत तरतूदीचं उल्लंघन झालंय की नाही ते निर्णय ठरवणार
पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरतो का हे या निर्णयातून दिसून येणार
भाजपला कशीही करुन महाविकास आघाडी तोडायची आहे
कारण कर्नाटक निवडणुकीत भाजप पराभूत होणार आहे
त्या पार्श्वभूमीवर निकालाची तारीख आलेली दिसत आहे
-
सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्यावर कुणीच नाही – नरहरी झिरवाळ
त्यांना अपात्र केलंय, म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले
हा महाराष्ट्रापुरता निर्णय नाही, सर्व देशावर याचा परिणाम होईल
हे सरकार पडणारच
-
हे सरकार पडणारच – नरहरी झिरवाळ
– मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्रक्रिया सुरू होताना नार्वेकर साहेब सभागृहात नव्हते.
– मी निर्णय दिला त्यावेळी नार्वेकर साहेब नव्हते. अजूनही मी त्या जागेवर आहे. त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येणार
-जो निर्णय दिलाय, तो मी दिलाय.. त्यामुळे माझ्याकडेच निर्णय येईल.
-अविश्वास दाखल झाल्यावर मान्य व्हावा लागतो. ना माझ्यावरचा अविश्वास मान्य झाला, ना अध्यक्षावरचा..
-सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्यावर कुणीच नाही.
– हा महाराष्ट्रापुरता निर्णय नाही, सर्व देशावर याचा परिणाम होईल.
-
आमच्या वकिलांनी न्यायालयात योग्य ती बाजू मांडली आहे – उदय सामंत
आम्ही योग्य पुरावा दिला आहे
न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर बोलणं योग्य नाही
निकाल देणे हा सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे
उद्योग आणि पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
सगळे पुरावे, सगळी कागदपत्रं देऊन आमची बाजू आम्ही भक्कम केलीय
सर्वोच्च न्यायालयाकडून योग्य निकाल येईल हीच अपेक्षा आम्हाला
-
सत्ता संघर्षावर उद्या पडदा पडणार – संजय शिरसाट
ज्यांनी त्यांनी आपल्याला आपल्या पद्धतीनं मत मांडण्यास सुरूवात केली
16 आमदारांच्या यादीतील मी एक आमदार आहे
आज उठलो आणि उद्या जावून उठाव केला
निवडणूक आयोगानं आमच्या बाजूनं निकाल दिला
सुप्रिम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनं लागेल
उद्याचा निकाल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार लागणार
सुप्रिम कोर्ट उद्या काय निकाल देतो हे पाहणं महत्वाचं
घटनेच्या चौकटीतील हा निकाल असणार
जो सुप्रिम कोर्टाचा निकाल लागेल
सत्ता राहणार की जाणार उद्या ठरेल
त्या माणसावर भाष्य करणं योग्य नाही
उद्या आमच्या बाजूनं निकाल लागेल
कोण कोण आमच्या संपर्कात घ्यायचं
सर्व खुलासे उद्या होणार
शरद पवारांनी भाकरी परतवली
अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणं सोडलं तर बरं होईल
जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील
आमच्या बाजूनं निकाल लागला की दबावात निकाल असं म्हणतील
आरोप करणं हा त्यांचा धंदा, त्यांच्याकडे आम्ही पाहत नाही
-
आमचा संविधानावर विश्वास, निकालाची धाकधूक नाही – आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री असंवैधानिक आहेत 24 तास थांबा
-
सत्ता संघर्षाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण होणार
सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण होणार
माध्यमांना थेट प्रक्षेपण दाखवता येणार
सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू होणार थेट प्रक्षेपण
दिल्ली सरकार विरुद्ध उपराज्यपाल खटला आणि महाराष्ट्र सत्ता संघर्ष खटला हे दोन्ही निकाल उद्या सुप्रीम कोर्ट देणार
-
या 16 आमदारांवर टांगती तलवार
एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
संदिपान भुमरे
संजय शिरसाट
तानाजी सावंत
भरत गोगावले
यामिनी जाधव
चिमणराव पाटील
लता सोनावणे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
अनिल बाबर
महेश शिंदे
संजय रायमुलकर
रमेश बोरणारे
बालाजी कल्याणकर
-
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्या निकाल
उद्या सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल लागणार आहे
दोन घटनापीठाचे उद्या निकाल येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील केसचा समावेश आहे.
सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी आज संकेत दिले आहेत.
Published On - May 11,2023 6:07 AM