Maharashtra Political Crisis LIVE : राज्यभरात शिंदे गटाकडून फटाके वाजवत जल्लोष

| Updated on: May 12, 2023 | 7:06 AM

Supreme Court Decision on Maharashtra Government Today LIVE News : राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे.

Maharashtra Political Crisis LIVE : राज्यभरात शिंदे गटाकडून फटाके वाजवत जल्लोष
SC LIVE hearing on MLA Disqualification
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी राज्यपालांनी घेतलेला निर्णय चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं देखील म्हटलं आहे. दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे  पाठवला आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना कोर्टाने केल्या आहेत. त्यामुळे शिंदे सरकार तुर्तास तरी स्थिर आहे.

16 MLAs Disqualification List Maharashtra

1) एकनाथ शिंदे,  2) अब्दुल सत्तार, 3) संदीपान भुमरे, 4) संजय शिरसाट, 5) तानाजी सावंत, 6) यामिनी जाधव, 7) चिमणराव पाटील, 8) भरत गोगावले, 9) लता सोनावणे, 10) प्रकाश सुर्वे, 11) बालाजी किणीकर, 12) अनिल बाबर, 13) महेश शिंदे, 14) संजय रायमुलकर, 15) रमेश बोरणारे, 16) बालाजी कल्याणकर

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 May 2023 08:45 PM (IST)

    Maharashtra politics : विरोधकांचे थोबडे काळे झाले आहे – भरत गोगावले

    मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदेंचे सहकार भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, विरोधकांचे थोबडे काळे झालेले आहे. त्यांना जे काय अपेक्षित होतं ते घडलेलं नाही त्यामुळे ते नाराज राहणार आहेत. आम्हाला अडचण येणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं. आम्ही समाधानी आहोत आनंदीत आहोत.

    ‘जे रोज सकाळी उठून चर्चा करायचे सरकार पडेल त्यांची तोंड बंद झालेली आहे. ते उद्यापासून बोलणार नाही करण त्यांचं भविष्य खोटं ठरलेलं आहे. त्यांचा पोपट उडून गेलेला आहे.’ अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलीये.

    नितेश कुमार सर्वांना एकत्र घेऊन पंतप्रधान मोदी नको यासाठी ते आलेले आहेत. मात्र तसं काय होणार नाही. सगळ्यांना वाटतं की नितेश आले म्हणजे काहीतरी चमत्कार घडेल. पण चमत्कार घडणार नाही. त्यांना परत जावे लागणार आहे.

    उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असेल मात्र पंतप्रधान मोदींना हे कोणी हरवू शकत नाही. त्यांच्यातच मतभेद आहेत. अजित पवार व पक्षाच्या अंतर्गत जे सुरू आहे. नाना पटोले आणि वडेट्टीवार काय चालू आहे, आपण पाहतोय. त्यामुळे हे काय टिकणार नाही. थोडे दिवस हे चालेल. आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल.

  • 11 May 2023 08:40 PM (IST)

    भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं वादग्रस्त वक्तव्य

    कर्नाटकात तुमचे उमेदवार नव्हते हे आमचं नुकसान करणारी बाब

    MIM खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर केलं वादग्रस्त वक्तव्य

    MIM आणि भाजपची मिलीभगत असल्याचं स्पष्ट करणारं केलं वक्त्व्य


  • 11 May 2023 08:39 PM (IST)

    धाराशिवमध्ये शिंदे गटाचा जल्लोष

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष केला. निकालचे स्वागत करीत फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यापुढे जनतेच्या कामावर भर दिला जाईल असे ही ते म्हणाले.

  • 11 May 2023 08:36 PM (IST)

    शिंदे गटाकडून ढोलताशा आणि फटाके वाजवत जल्लोष

    • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कलानगर मातोश्री परिसरात शिंदे गटाकडून जल्लोष.
    • अनिल परब यांच्या घरासमोर देखील शिंदे गटाकडून जल्लोष साजरा.
    • ढोल ताषाच्या गजरात शिवसेनेच्या शाखेबाहेर फटाके वाजवून आनंद साजरा.
  • 11 May 2023 08:35 PM (IST)

    तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर कारवाई करावी : ओमराजे निंबाळकर

    राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांवर ओढले ताशेरे

    कोशारींवर राष्ट्रपतीनी कारवाई करावी अशी ओमराजे निंबाळकर यांची मागणी

    सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर ओमराजे निंबाळकर यांची मागणी

  • 11 May 2023 08:07 PM (IST)

    ठाण्यात शुक्रवार आणि शनिवार पाणी पुरवठा बंद

    मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा आणि वागळे इस्टेस्ट परिसरात पाणी पुरवठा बंद

    पाईपलाईन फुटल्याने शुक्रवारी राहणार पाणीपुरवठा बंद

    शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार

    नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन

  • 11 May 2023 07:00 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

    सरकारला कोणताही धोका राहिलेला नाही

    खासदार अनिल बोंडे यांची माहिती

    अगोदर राजीनामा द्यालं तर कुणीही वाचवू शकत नाही

    उद्धव ठाकरे यांच्यावर अनिल बोंडे यांची टीका

  • 11 May 2023 06:49 PM (IST)

    नागपूर : कोर्टाच्या निर्णयानंतर जल्लोष

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये उत्साह संचारला

    शिंदे गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत गुलाल उधळला

    मिठाई वाटत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत

  • 11 May 2023 06:26 PM (IST)

    मुंबई : हजारो लीटर पाणी वाया

    वांद्रे येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली

    एचडब्ल्यू वॉर्ड वांद्रे येथील बडी मशिदीजवळ पाईपलाईन फुटली

    पाणी गळतीची माहिती मिळताच बीएमसीची टीम पोहोचली

  • 11 May 2023 06:08 PM (IST)

    इंदापूर : बावडा गावात आनंदोत्सव

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाजवले फटाके

    भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या गावात उत्साह

    हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके

  • 11 May 2023 05:59 PM (IST)

    समलैगिंग लग्नासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी पू्र्ण

    सुप्रीम कोर्टाने निकाल ठेवला राखीव

    सर्वोच्च न्यायालयात 10 दिवस सुरु होती सुनावणी

    केंद्र सरकारने समलैगिंक विवाहांना मान्यता देण्यास केला विरोध

    यामुळे अनेक कायदे आणि नियम बदलावे लागतील

  • 11 May 2023 05:56 PM (IST)

    नितीश कुमार विरोधकांची मोट बांधणार का?

    आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची घेतली भेट

    लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी सर्वांचा एकत्र येण्याचा विचार

    आदित्य ठाकरे यांनी केले सूचक ट्विट

  • 11 May 2023 05:44 PM (IST)

    मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरच श्रीगणेशा?

    आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार

    भाजप व शिंदे गटात हाणामारी होणार

    आमदार अमोल मिटकरी यांची टीका

    तसेच राज्य सरकार आता विस्ताराचा मुहूर्त साधणार असल्याचे केले भाष्य

  • 11 May 2023 05:39 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा

    देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे यांच्यावर उपकार

    चित्रा वाघ यांनी ट्विट करुन साधला निशाणा

    पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना न्यायव्यवस्थेने धडा शिकवला

  • 11 May 2023 05:28 PM (IST)

    शिंदे सरकार अनैतिक, त्यांनी राजीनामा द्यावा

    40 गद्दारांचा येत्या दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलाय

    आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

    विजय सत्याचा होणार, सत्तेचा नाही-ठाकरे

    नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    राजीनामा देऊन त्यांनी निवडणुकांना सामोरे जावे

  • 11 May 2023 05:26 PM (IST)

    ठाकरे सरकार पाडण्यात राज्यपालांचा हात होता

    राज्यपालांचं कार्यालय हे हुकुमशाही चालविण्यासाठी वापरलं जातं आहे का?

    आदित्य ठाकरे यांचा सवाल

    16 आमदार अपात्र ठरणार-ठाकरे

  • 11 May 2023 05:19 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अनेकांचा पालापाचोळा झाला

    नारायण राणे यांनी केली संजय राऊत यांच्यावर टीका

    ठाकरे यांना नैतिकतेवर बोलण्याचा कुठलाच अधिकार नाही

    त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला

  • 11 May 2023 05:16 PM (IST)

    ते काय गणपती आहे का बसवायला

    नारायण राणे यांची घणाघाती टीका

    उद्धव ठाकरे यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही

    ठाकरे यांनी नैतिकतेचा बोजवारा उडवला

    संख्याबळ नसल्याने ठाकरे यांनी राजीनामा दिला

  • 11 May 2023 05:02 PM (IST)

    नितेश राणे यांचे ट्विट चर्चेत

    देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत केले ट्विट

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केलेले ट्विट चर्चेत

    कोणाला लगावला नितेश राणे यांनी टोला

  • 11 May 2023 04:57 PM (IST)

    माहिती घेतल्याशिवाय मी बोलणार नाही – अजित पवार

    मात्र मी जे लातूरला बोललो तसंच घडलं

    मला जे काही बोलायचं ते उद्या बोलतो

    फक्त दिल्लीला गेलो एवढं सांगू नका

    अजित पवारांची मिश्कील टिप्पणी

  • 11 May 2023 04:56 PM (IST)

    या निकालात एक वाक्य महत्वाचं, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परत मुख्यमंत्री बनले असते – जितेंद्र आव्हाड

    म्हणजे या वाक्यातून असं जाणवत की या आधीच्या ज्या काही कारवाया आहेत

    त्या नैतिकतेला धरून नाही हे स्पष्ट होतंय

    व्हीप बजावणे आणि निलंबनाचा अधिकार पक्षाला आहे

    आता सुनील प्रभू हेच व्हीप बजावतील असे कोर्टाने सांगितले

    मी आता तेच वाचत आहे, जे आज सुप्रीम कोर्टाने लिहिलेला आहे

    आता जे सुनील प्रभू व्हीप बजावतील त्यातून पुढील चित्र स्पष्ट होईल

    सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्यात आली

    संरक्षण करणे म्हणजेच पाठिंबा काढणे होत नाही, असे त्यांनी नमूद केले

    पदापेक्षा आपली नैतिकता मोठी

    हीच नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला

    हा राजीनामा राजकारणाच्या दृष्ठिने पहिला तर चुकीचा आहे पण नैतिकता पाहिली तर योग्य आहे

    या राजीनाम्याचा कोणावर कधी महागात किंवा असं काही पडत नाही पण यात मुळात नैतिकता पाहिली जाते..

  • 11 May 2023 04:40 PM (IST)

    लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु – राहुल नार्वेकर

    प्रतोद म्हणून कुणाची निवड योग्य हे कोर्टाने सांगितलं नाही

    राजकीय पक्ष व्हिप नेमेल असे कोर्टाने सांगितलं

     

  • 11 May 2023 04:37 PM (IST)

    शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचे निकालाच्या निरीक्षणावरून समोर आलंय – कैलास पाटील

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय जनतेच्या न्यायालयात नेणार

    निवडणुका लावल्यास जनता सरकारचा निकाल लावेल

    शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया

  • 11 May 2023 04:34 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो – राहुल नार्वेकर

    राजकीय पक्ष नेमका कुणाचा हा निर्णय आधी घ्यायचाय

    सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेणार

    कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन निर्णय घेऊ

    नेमका किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही

  • 11 May 2023 04:24 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार राहील हे स्पष्ट झालंय – गुलाबराव पाटील

    या निकालावरून शिंदे फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल

    न्यायालयाचा निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केलाय

    16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील

    त्यांच्या निर्णयाबद्दल मत व्यक्त करणे योग्य नाही

  • 11 May 2023 04:23 PM (IST)

    ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय – गिरीश महाजन

    याचा मोठा दिलासा शिंदे-फडणवीस सरकारला आहे

    हे सरकरा बेकायदा आहे असा आरोप होत होता, ते सर्व मुद्दे खोडलेले आहेत

    कुठेही 16 आमदारांचं निलंबन झालं नाही, हे सरकार नियमानुसार बनले असं आज सिद्ध झालंय

    ते कशावरंही फटाके फेडतील, त्यांना काय? बेगाने शादीमे अब्दूल्ला दिवाना असं त्यांचं चाललंय

    बुद्धी गहाण ठेवली असेल, देवच त्यांना तारो

  • 11 May 2023 04:21 PM (IST)

    हे सरकार कायदेशीर हे सिद्ध – संजय शिरसाट

    लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार
    उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेची भाषा करु नये
  • 11 May 2023 04:20 PM (IST)

    न्यायालयाचा निकालानंतर सेना भवनाबाहेर जल्लोष

    शिवसैनिकांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणा

    सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी व्यक्त केला आनंद

    शिवसेना शिंदे गटाला कोर्टाने फटकारल्याने केली फटाकेबाजी

  • 11 May 2023 04:18 PM (IST)

    आम्हला विश्वास होता निकाल आमच्या बाजूने लागेल, न्याय मिळेल – भावना गवळी

    सरकार स्थिर होते, स्थिर राहिले

    मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावर शंका घेण्याचं काम नाही

    निर्णय आमच्या बाजूने लागण्याने विस्तार करावा लागेल

    अजून कामाला लागावे लागणार आहे

  • 11 May 2023 04:09 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

    13 मे रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता मातोश्री येथे ठाकरे घेणार बैठक

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील रणनीती व दिशा ठरविन्यासाठी बोलावली सर्व आमदारांची बैठक

  • 11 May 2023 04:02 PM (IST)

    ‘नाराज करण्याचा हेतू नव्हता, वस्तूस्थिती होती’- शरद पवार

    ‘नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असं वाटत नाही’- शरद पवार

    ‘नाराज करण्याचा हेतू नव्हता, वस्तूस्थिती होती’- शरद पवार

  • 11 May 2023 03:59 PM (IST)

    काही निर्णय अजून व्हायचे आहेत- शरद पवार

    ‘ज्यांच्या नावावर निवडून येतात त्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा’- शरद पवार

    काही निर्णय अजून व्हायचे आहेत-  शरद पवार

    ‘अध्यक्षांना नियमांच्या चौकटीत राहून काम करावं लागतं’

    ‘ठाकरेंच्या राजीनाम्याचा विषय माझ्या पुस्तकात’

    ‘पुस्तकात भूमिका मांडल्यानं काही मित्र नाराज झाले’-  शरद पवार

  • 11 May 2023 03:51 PM (IST)

    सत्तेचा गैरवापर सातत्यानं सुरू- शरद पवार

    ठाकरेंच्या राजीनाम्यावर आत्ता चर्चा करण्यात अर्थ नाही- शरद पवार

    सत्तेचा गैरवापर सातत्यानं सुरू- शरद पवार

    ‘राज्यपालांची नियुक्ती चुकीची केली जाते याचं कोश्यारी उदाहण’

  • 11 May 2023 03:46 PM (IST)

    भाजपची कृती देशहिताची नाही- नितीश कुमार

    सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल- शरद पवार

    भाजपची कृती देशहिताची नाही- नितीश कुमार

    भाजपविरोधी सर्व विरोधीपक्ष एकत्र येतील- नितीश कुमार

    पवार विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद- नितीश कुमार

    आम्ही एकत्र काम करु, चेहरा नंतर ठरवू- शरद पवार

  • 11 May 2023 03:43 PM (IST)

    कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल- शरद पवार

    कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल- शरद पवार

    कर्नाटकातील जनता धर्मनिरपेक्ष सरकार आणेल-पवार

  • 11 May 2023 03:34 PM (IST)

    नवी दिल्ली: माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीत दाखल

    मी सध्या राजकारणापासून दूर आहे

    कोर्टाने त्यांचा निर्णय दिला आहे

    मी कायद्याचा विद्यार्थी नाही

    मी जे निर्णय घेतले ते योग्य पद्धतीने घेतले

    कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी म्हणणार का राजीनामा देऊ नका

  • 11 May 2023 03:20 PM (IST)

    अजित दादांचा निकालावर बोलण्यास नकार

    न बोलताच अजित दादा रवाना

    मी निकाल बघितलेला नाही

    जो पर्यंत व्यवस्थित निर्णय बघत नाही तो पर्यंत बोलणार नाही

    मी काल काय सांगितलं होत- अजित दादा

  • 11 May 2023 03:06 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नागपुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
    नागपूरातील भांडे प्लॉट येथील शिवसेना कार्यालया जवळ केला जल्लोष
    ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला
    सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
    शिंदे गटाचे रामटेक चे खासदार कृपाल तुमाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आला जलोश
    बाईट – कृपाल तुमाणे , शिंदे गट खासदार रामटेक
  • 11 May 2023 02:55 PM (IST)

    पॉलिटिकल पार्टी म्हणून शिंदेंची शिवसेना आहे त्यामुळे शिंदेच्या पार्टीचा विप लागू होईल

    परिस्थिती अत्यंत स्पष्ट आहे आता पॉलिटिकल पार्टी याचा विप लागू होतो हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं
     शिवसेना ही पॉलिटिकल पार्टी आहे   त्यामुळे शिंदे गट ही पॉलिटिकल पार्टी आहे त्यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव दिलं
     पॉलिटिकल पार्टी म्हणून शिंदेंची शिवसेना आहे त्यामुळे शिंदेच्या पार्टीचा विप लागू होईल
    मात्र 16 आमदार आमदार यांच्यासाठी मात्र सुरेश प्रभूंचा विप लागू होईल
     आज जर अविश्वासाचा प्रस्ताव आला तर वीप कोणाचा लागू होईल याला स्पष्ट उत्तर आहे शिवसेना ही अधिकृत शिवसेना शिंदे गटाकडे आहे त्यामुळे शिंदे गटाला आपला वीक बनवावा लागेल तो जुना विप चालणार नाही
  • 11 May 2023 02:55 PM (IST)

    कल्याणकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी

    आमदारांच्या अपात्रते बाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिल्यानंतर नांदेडमध्ये कार्यकर्त्यानी सुटकेचा श्वास सोडलाय. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे पहिल्या सोळा आमदारांत सहभागी होते, त्यामुळे कल्याणकर समर्थकांना निकाळाची मोठी उत्सकूता होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालानंतर कल्याणकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केलीय. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नावाचा समर्थकांनी नारेबाजी केली

  • 11 May 2023 02:54 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सिंधुदुर्गातही जल्लोष

    अँकर———- सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सिंधुदुर्गातही जल्लोष करण्यात आला असून वेंगुर्ल्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत हा आनंद साजरा केला.यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.
  • 11 May 2023 02:37 PM (IST)

    आम्हाला खात्री आहे, अध्यक्ष निरक्षण करून न्याय देतील – अनिल बाबर

    सर्वोच न्यायालयाचा निकाल लागला तो दिलासा देणारा आहे. मात्र हा निकाल पात्र का अपात्र यासाठी होता. मात्र अपात्र चा धोका टळला आहे. कोर्टाने आम्हाला दिलासा दिला आहे.

    आम्हाला खात्री आहे. अध्यक्ष निरक्षण करून न्याय देतील.

    मला आत्मविश्वास होता. आम्ही पात्र होऊ. पण काही गोष्टी न्यायालयाचा निरक्षण बाबत मी बोलणे उचित नाही. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री निर्णय घेतील.

    कामाक्षी देवी पाऊली हे शंभर टक्के खरे आहे. पण देवीच्या बाबतीत चुकीचं विधान केली. ते देवीने दाखवून दिले.

    ज्या प्रक्रिया आहेत त्याबाबत निरीक्षण दिले आहे,

    राजीनामा द्यायची गरज नाही सरकार कडे बहुमत आहे. त्याबाबतीत कोर्टाने निर्णय दिले आहेत.

    मंत्रिमंडळात विस्तारस संदर्भात अनिल भाऊ यांनी वरिष्ठ काय ठरवतील हे मला मान्य आहे काम करत राहणं हे माझं काम आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे

  • 11 May 2023 02:36 PM (IST)

    धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं – मुख्यमंत्री

    धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं – मुख्यमंत्री

    राजीनामा दिला त्यावेळी दुसरा पर्याय काय होता.

    लोकांना अपेक्षित असलेलं काम आम्ही केलं आहे

    सत्तेसाठी सरकार दुसरीकडं तयार केलं

  • 11 May 2023 02:34 PM (IST)

    एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं आहे – मुख्यमंत्री

    आज सुप्रीम कोर्टाचे त्यावर शिक्कामोर्तब केले आहे

    एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं आहे

    सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतं केलं आहे

    मेरिटप्रमाणे तो निकाल दिला आहे

  • 11 May 2023 02:22 PM (IST)

    घटनेच्या चौकटीत बसणारा एकमुखी निर्णय आहे – असिम सरोदे

    घटनेच्या चौकटीत बसणारा एकमुखी निर्णय आहे

    सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल हा सकारात्मक

    सगळी न्यायिक प्रक्रिया नीट पार पडली आहे

    कुणावरही अन्याय होणार नाही असा निकाल

    अपत्र्तेचा निर्णय हा विधिमंडळाकडेच जायला हवा होता आणि तसचं झालं आहे

    विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने टाईम बाँड द्यायला हवा होता

    राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळेत निर्णय घेणे आता गरजेचे

    भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर होती हे कोर्टानं स्पष्ट केलं आहे

    राहुल नार्वेकर यांचा तो निर्णय पक्ष समर्पित होता

    प्रतोद त्यांच्या हातात असणे म्हणजे ठाकरे गटाला नवीन संधी

    एक महिन्यात नार्वेकर यांनी निकाल देणं अपेक्षित अन्यथा ते बेकायादेशिर ठरेल

    पॅकेज byte

    शिंदे गट नविन प्रतोद नेमू शकातात

    आणि त्यांचा व्हीप लागू होईल

    कारण निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची हा निर्णय जो दिला होता तो अजूनही अस्तित्वात आहे त्यामुळे प्रतोद हा शिंदे गटाचा होईल

    भरत गोगले यांची त्यावेळेस ही नियुक्ती चुकीची होती असं म्हटलं असून त्यामुळे हे सगळं त्या वेळेच्या परिस्थितीला लागू होतं पण निवडणूक आयोगाचा निकाल त्यानंतर आला होता

    एकनाथ शिंदे नविन व्हीप नेमू शकतात

    एकनाथ शिंदे त्यांचं सरकारं टिकवू शकतात

  • 11 May 2023 02:18 PM (IST)

    आता हे सरकार पुर्णपणे कायदेशीर झालं आहे

    आता हे सरकार पुर्णपणे कायदेशीर झालं आहे

    विरोधकांच्या शंकेचं निरसन झालं आहे

    नैतिकतेच्या आधारवर राजीनामा दिला

    भाजपसोबत निवडून आलात आणि इतरांसोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती.

    उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं होतं, नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न केला होता.

    हे पुर्णपणे संविधानसोबत काम करीत आहे.

  • 11 May 2023 02:14 PM (IST)

    निकालाचं आम्ही पुर्ण समाधान व्यक्त करतो – देवेंद्र फडणवीस

    निकालाचं आम्ही पुर्ण समाधान व्यक्त करतो.

    लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे

    हा जो काही निकाल आहे, त्याकडे मी सगळ्याचं लक्ष वेधू इच्छितो

    सर्वात पहिल्यांदातर महाविकास आघाडीवर स्टेट को अॅन्टी करता येणार नाही

    उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही

  • 11 May 2023 02:08 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया

    सुप्रीम कोर्टाच्या निकालाच मी स्वागत करतो

    सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला की सरकार शिंदे- फडवणीस यांचच राहतील

    नऊ महिन्यापासून शिंदे सरकार प्रगती करत आहे या प्रगतीला खीळ बसणार नाही

    तर यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील अनिल बोंडे यांनी टोला लगावला

    उद्धव ठाकरे यांनी स्वतः पराभव मान्य केला राजीनामा दिला

    युद्धाला समोरे न जातात त्यांनी राजीनामा दिला

    उद्धव ठाकरे यांनी रणांगण सोडलं

    सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे सरकारला धोका नाही

  • 11 May 2023 02:05 PM (IST)

    न्यायालयाच्या निकालानंतर प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे.

    न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आणि एकमेकांना मिठाई खाऊन उत्साह निर्माण केला आहे.

    न्यायालयाच्या निकालानंतर प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे मोठे कटआउट्सही लावण्यात आले आहेत.

    शिवसेनेचे कार्यकर्ते फटाके फोडत आहेत आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत.

    मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचाही या उत्साहात सहभाग आहे.

  • 11 May 2023 02:04 PM (IST)

    प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष

    न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आणि एकमेकांना मिठाई खाऊन उत्साह निर्माण केला आहे.

    न्यायालयाच्या निकालानंतर प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे मोठे कटआउट्सही लावण्यात आले आहेत.

  • 11 May 2023 01:55 PM (IST)

    ठाण्यात जल्लोष

    सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसैनिकांकडून जल्लोष,

    फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवलेठ

    ठाण्यात शिवसैनिक करीत आहेत आनंद साजरा

  • 11 May 2023 01:37 PM (IST)

    भारतीय न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निर्णयाने दाखवून दिलं

    चिमणराव पाटील बाईट ऑन सत्ता संघर्ष निकाल
    *भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय*
    हा निर्णय येणारच होता
    भारतीय न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निर्णयाने दाखवून दिलं
    सत्ता संघर्षाच्या निर्णयावर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिक्रिया
  • 11 May 2023 01:36 PM (IST)

    सरकार चलाविण्याचा निर्णय झाला आहे – दीपक केसरकर

    दीपक केसरकर

    सरकार चलाविण्याचा निर्णय झाला आहे

    आमदारांना आपल म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे ते मांडतील

    सुप्रीम कोर्टाचा योग्य निर्णय,,,त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.

  • 11 May 2023 01:36 PM (IST)

    भरतब गोगावले  यांची  प्रतोद म्हणून नियुक्ती कोर्टाने  बेकायदेशीर ठरवली

    भरतब गोगावले  यांची  प्रतोद म्हणून नियुक्ती कोर्टाने  बेकायदेशीर ठरवली
     राज्यपालांची कृती चुकीची ठरवली
    शिंदे यांनी पाठींबा काढला असे पत्र दिले होते, शिवसेनेच्या अंतर्गत वादाकडे राज्यपालांनी लक्ष द्यायला नको होते
     16 जणांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील
     ठाकरे यांनी स्वतः राजीनामा दिला म्हणून नाबाम  रेबियाचा निकाल इथे लागू होत नाही
    एकनाथ शिंदे यांची  सरकार पूर्णपणे वाचले आहे
    उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला  नको होते, शरद पवार यांनी म्हटले आहेच की ठाकरे यांनी कोणाला कल्पना न देता राजीनामा दिला, यामुळे आता परिस्थिती बदलणार नाही
    खरी शिवसेना कोण हा निर्णय झालेला आहे
     निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे कडे पक्ष आहे
    सगळं माप शिंदेंच्या पदरात पडलं
     उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात हा निर्णय गेला आहे
    आता यापुढे महाविकास आघाडीसमोर कायदेशीर लढाई शिल्लक राहिलेली नाही आता जनतेचे कोर्ट हाच पर्याय
    जयंत पाटील यांच्या नोटिसबाबत माहिती नाही
     काय होणार याचा अंदाज सगळ्यांनाच आला आहे
    जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तोपर्यंत महाविकास आघाडीला धोका नाही
    असे दिसत आहे की भावनिक  होऊन ठाकरे यांनी राजीनामा दिला हे भोवले का ?
    असच झाला कारण कोर्टाने देखील म्हटलंय की कर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसत तर कदाचित आम्ही सरकार पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला असता
    मात्र नैतिकदृष्ट्या काय करावे  हे शिंदे-फडणवीस यांना विचारा
     आमचे राज्यपाल आता गेले, भविष्यात असे प्रश्न निर्माण झाले तर कसे निर्णय घ्यावेत याचे मार्गदर्शन सुप्रीम कोर्टने देशाला दिले आहे
  • 11 May 2023 01:33 PM (IST)

    सत्तासंघर्षाचा निकाल लागला हा सत्याचा विजय आहे

    सत्तासंघर्षाचा निकाल लागला हा सत्याचा विजय आहे. गाव खेड्यात संपूर्ण महाराष्ट्रात आनंद निर्माण झाला आहे.

    ताशेरे ओढले तरी निकाल आमच्या बाजूने लागला आहे.

    यानंतर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू

    संजय राऊत अंबादास दानवे आता दुसरं काय बोलणार,

    कोर्टाने निकाल दिल्यानंतर नैतिकतेचा मुद्दा कुठे शिल्लक राहतो

    पूजा अर्चा केल्याने काहीही होत नाही, आम्हीही पूजा अर्चा करतो पण जे योग्य आहे तेच होतं

    विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेतील आमची बाजू कायदेशीर आहे त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल

    आज महाराष्ट्रात सगळ्यांना खुशी झालेली आहे मला पण खुशी झालेली आहे.

  • 11 May 2023 01:27 PM (IST)

    मी राजीनामा दिला नसता, तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो – उद्धव ठाकरे

    आज मातोश्रीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले आहेत.

    देशात एकूण लोकशाहीची हत्या होत आहेत की काय अशी लोकांना शंका आहे.

    सगळे विरोधक एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न करीत आहोत

    सर्वोच्छ न्यायालायाने जो काही निकाल दिला आहे, त्यामुळे अनेकांना नागडं केलं आहे

    राज्यपाल्यांच्या भूमिकेचं वस्त्रहरण झालं आहे

    मी राजीनामा दिला नसता, पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो

    माझी लढाई जनतेसाठी आहे

  • 11 May 2023 01:20 PM (IST)

    कोर्टाचा निर्णय आम्हाला अपेक्षित होता, 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे जाईल

    कोर्टाचा निर्णय आम्हाला अपेक्षित होता, 16 आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे जाईल,

    आम्ही जे सरकार बनवलं ते कायद्याचा पूर्ण अभ्यास करून बनवलं, हे योग्य सरकार आहे आणि संविधानाचा अभ्यास करून झालेल्या सरकार आहे

    आमच्यावर जनतेला विश्वास आहे आणि हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार, सुप्रीम कोर्टाची पूर्ण कॉपी आमच्याकडे आलेली नाही एकदा निर्णयाची प्रत आली तर मग त्याचे विश्लेषण करणार

    उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी मेजॉरिटी नव्हती हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला

    त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच आमचं सरकार निर्माण झालं

    संजय राऊत यांना सकाळपासून खोके पाहण्याची सवय झालेली आहे आमचं इमानदारीचं कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचा सरकार आहे, बाळासाहेबांचे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करीत आहोत

  • 11 May 2023 01:18 PM (IST)

    शिवसेना पार्टी कुणाची हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे – उदय सामंत

    निरीक्षण काय दिली याचा अभ्यास करावा लागेल. आम्हाला अंतिम निर्णय महत्वाचा – उदय सामंत

    कालपर्यंत सरकार पडणार असे जे बोलत होते त्यांचे मनशुभे धुळीला मिळाले – उदय सामंत

    सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आणि निकाल याचे काही जण भांडवल करतील – उदय सामंत

    शिवसेना पार्टी कुणाची हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे – उदय सामंत

    चंद्रकांत खैरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत हे सांगायला खैरे एकनाथ शिंदे यांच्या नंदणवन बंगल्यावर यायचे – उदय सामंत

    मी ठाकरे यांच्या संपर्कमध्ये याचे पुरावे द्यावेत.. नाहीतर मी नदनवन बंगल्यावर खैरे यायचे याचे पुरावे देतो – उदय सामंत

  • 11 May 2023 01:17 PM (IST)

    भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय – चिमणराव पाटील

    भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय

    हा निर्णय येणारच होता

    भारतीय न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निर्णयाने दाखवून दिलं

    सत्ता संघर्षाच्या निर्णयावर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिक्रिया

  • 11 May 2023 01:14 PM (IST)

    संजय राऊतने आता गुवाहाटीच्या जंगलात जावे, शहाजीबापू पाटलांची राऊतांवर टीका

    – आमदार शहाजीबापू पाटलांची पाहिली प्रतिक्रिया

    – कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार

    – सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घश्यात जाण्यापासून वाचवली

    – संजय राऊतने आता गुवाहाटीच्या जंगलात जावे

    – नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे आणि संजय राऊंतानी गुवाहाटीच्या जंगलात जावे

    – आमदार शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया

  • 11 May 2023 01:13 PM (IST)

    न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, आमची बाजु सत्याची आमचं सरकार कायदेशीरचं, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया

    न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, आमची बाजु सत्याची आमचं सरकार कायदेशिरच, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया

    सत्तासंघर्षाच्या निकाला नंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असुन न्यायालयानं‌ दिलेला निर्णयाचं स्वागत आम्ही करत असुन हा विजय सत्याचा असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलय तर आम्ही जनतेत जावुन काम करत आहोत जनतेच्या सोबत आहोत हे यातुन अधोरेखीत झाल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं असुन उद्धव ठाकरे आणि विरोधक सांगत होते आमदार आणि मुख्यमंत्री अपात्र होणार आणि सरकार ढासळणार मात्र आम्हाला कोर्टाच्या निकालावर विश्वास होता. संजय राऊत याच्या बोलण्याकडं आम्ही लक्ष देत नाही असं सुद्धा शंभुराज देसाई म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला यामुळं त्यांच सरकार गेलं हे सुप्रिमकोर्टाचं निरिक्षण आहे आणि आमचं सरकार कायदेशीर बहुमतातलं आहे आणि इथुन पुढच्या काळ आमच्या सरकारला कोणताच धोका नाही असं शंभुराज देसाई म्हणाले

  • 11 May 2023 01:10 PM (IST)

    निकालामुळे आम्ही पुर्ण समाधान आहे – फडणवीस

    निकालामुळे आम्ही पुर्ण समाधान आहे

    मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार

    पुढचं सगळं विश्लेषण पत्रकार परिषदेत करणार आहेत

  • 11 May 2023 01:09 PM (IST)

    सरकारच्या स्थिरतेवर परिणाम नाही

    उज्वल निकम 121 –

    महत्वाचा निकाल
    सरकारच्या स्थिरतेवर परिणाम नाही
    मात्र काही निरीक्षण महत्वाची आहे
    नबाम नबिया निकालाचा यात लागू होत नाही, त्यामुळं सात बेंच कडे हे पाठवले

    भरत गोगावले व्हीप लागू होत नाही
    दोन गट भांडत असतील तर याची हेयरिंग स्पीकर ने घ्यायला हवं होते

    राज्यपाल यांनी जे विशेष अधिवेशन बोलावले होते, ते नियमाने नव्हते,
    तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वचेने दिला असल्याने ते पुनर्स्थापना होऊ शकत नाही

    पोलिटिकल पार्टीने तो निर्णय घ्यावा
    निवडणूक आयोगाने ठरविलेली पार्टी की ठाकरे गटाची पार्टी हे निकाल वाचून कळेल

    सरकार ला धोका नाही

  • 11 May 2023 01:08 PM (IST)

    थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

    अधिवेशन बोलवण्याची शक्यता

    थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

    बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद होणार

  • 11 May 2023 01:03 PM (IST)

    जो अपेक्षित निर्णय होता.तोच निर्णय कोर्टाने दिला आहे..

    जो अपेक्षित निर्णय होता.तोच निर्णय कोर्टाने दिला आहे..

    एकनाथ शिंदे यांनी उठावानंतर जे काही कागदपत्र करायला पाहिजे होते ते मजबुतीने केले.

    न्यायालयाने मान्य केला आहे जिकडे बहुमत आहे तिकडेच निर्णय गेलेला आहे.

    नियुक्ती चुकीची असेल तर ती नियुक्ती पुन्हा करता येईल 16 आमदारांचे जे निलंबन होतं ते निलंबन इथे थांबलेल आहे.

    कोर्टाने चाचणी अवैध ठरवली असली तरी बहुमत चाचणी पुन्हा घेता येईल. चाचणी कितीही घेतली तरी ती शिंदे सरकारच्याच बाजूने राहील

    निर्णयावर सरकार जाईल अस काही चित्र नव्हतं…

  • 11 May 2023 01:00 PM (IST)

    आमची निकाल स्वीकारायची तयारी होती – सुषमा अंधारे

    -ऑपरेशन इज सक्सेसफुल पण पेशंट इज डेड असा प्रकारचा कोर्टाचा निर्णय होता

    -आमची निकाल स्वीकारायची तयारी होती

    -ठाकरेंच्या बाजूने निरक्षणे नोंदवली पण शेवटी निकाल त्यांच्या बाजूने लागला

  • 11 May 2023 01:00 PM (IST)

    त्यामुळे न्यायालयाचे धन्यवाद

    सत्यमेव जयते… मी आधीच सांगितलं होतं की आमचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर पूर्णतः विश्वास आहे.. त्यामुळे आमदार अपात्र होतात की काय,  अशी चर्चा सुरू असताना आम्हाला दिलासा मिळाला आहे..  त्यामुळे न्यायालयाचे धन्यवाद…

    बाई ट – संजय रायमुलकर, आमदार

  • 11 May 2023 12:57 PM (IST)

    दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार

    दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार

  • 11 May 2023 12:55 PM (IST)

    निकालानंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल

    निकालानंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल

  • 11 May 2023 12:54 PM (IST)

    आमच्या जीवाला धोका आहे, हे सुध्दा हास्यास्पद आहे

    आमच्या जीवाला धोका आहे, हे सुध्दा हास्यास्पद आहे

    सुप्रीम कोर्ट सांगेल तो कायदा असतो.

    जगण्याचा अधिकार काढून घेता येत नाही

  • 11 May 2023 12:50 PM (IST)

    अत्यंत महत्वचा निर्णय झाला त्यात दिलासा मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रेस

    अत्यंत महत्वचा निर्णय झाला त्यात दिलासा मिळाला आहे

    उद्धव ठाकरे यांची याचिका होती बेकायदेशीर सरकार त्याला कोर्टाने ब्रेक लावला

    खोके सरकार बोके सरकार असे म्हणाले पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने हे सरकार पडले

    नवीन शिंदे फडणवीस सरकार आले ते कायदेशीर आहे, संवेद्धानिक पद्धतीने आले

    राज्यपाल याबाबत जे निरीक्षण आहेत ते कोर्टाचे आहेत

    एखाद्याने राजीनामा दिला तर ते पद खाली ठेवता येत नाही त्यामुळे हे सरकार बहुमताने आले त्यांना कोर्टने कायम ठेवले

    नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा असे संजय राऊत मागणी

    राजीनामा देण्याचा काय संबंध, तुम्ही राजीनामा दिला होता, तुमच्यकडे बहुमत नाही हे वाटले तेव्हा राजीनामा दिला

  • 11 May 2023 12:49 PM (IST)

    दुपारी दोन वाजता शिंदे आणि फडणवीसांची पत्रकार परिषद होणार

    दुपारी दोन वाजता शिंदे आणि फडणवीसांची पत्रकार परिषद होणार

  • 11 May 2023 12:44 PM (IST)

    कायद्यापेक्षा मोठे काहीही नाही, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता – प्रकाश सुर्वे

    कायद्यापेक्षा मोठे काहीही नाही, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता.

    अध्यक्ष कायद्याच्या आधारे निर्णय घेतील

    कोर्टानं म्हटलं सगळं चुकलं…पण तरी सुध्दा शिंदे सरकार वाचलं

    कोर्टानं शिंदे आणि भाजप सरकारला फटकारलं आहे – परब

    मीचं खरी शिवसेना असा दावा कुणी करु शकत नाही

  • 11 May 2023 12:43 PM (IST)

    कोर्टानं म्हटलं सगळं चुकलं…पण तरी सुध्दा शिंदे सरकार वाचलं

    कोर्टानं म्हटलं सगळं चुकलं…पण तरी सुध्दा शिंदे सरकार वाचलं

    कोर्टानं शिंदे आणि भाजप सरकारला फटकारलं आहे – परब

  • 11 May 2023 12:42 PM (IST)

    निवडणूक आयोगाने पक्षाचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत – खासदार राहुल शेवाळे

    – निर्णयाचे स्वागत करतो. ऐतिहासिक निर्णय आहे.

    – अधिकार सात खंडपीठाकडे आहे. अध्यक्षांकडे निर्णय दिला आहे.

    – निवडणूक आयोगाने अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.

    – त्यामुळे पक्षाचे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.

    – चार मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत.

    – व्हीप कोण आहेत यायचा निर्णय आता अध्यक्ष घेतील.

  • 11 May 2023 12:40 PM (IST)

    हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागला आहे

    भाजपला म्हणणं आहे की तुमचं सरकार घटनाबाह्य आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे

    भाजपनं यामधून बाहेर पडावं

    यांनी घटनाबाह्य सरकाय आणलं आहे

    एकनाथ शिंदे काय करतीँ हा त्यांचा निर्णय

    बीजेपी काय करते

    हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागला आहे

    काहि चुकीचे निर्णय घेण्यात आले

    आततायीने निर्णय घेण्यात आला त्याचा हा परिणाम आहे

    कायदा सल्लागार मंडळ फेल्युअर झालं आहे

    उद्धव ठाकरेंना माहिती देण्यात कमी पडले

    भाजपनं राज्यपालांमार्फत तानाशाही केली आहे

    विधानसभेत अविश्वासाचा ठरावं आणला नाही

    तुम्ही एक्स्ट्रा पॉवर वापरून आणलं आहे

  • 11 May 2023 12:37 PM (IST)

    महाराष्ट्राच्या अध्यक्षांना अधिकार द्यावा त्यांनी वेळ स्पष्ट केला असता तर बरं झाल असतं

    महाराष्ट्राच्या अध्यक्षांना अधिकार द्यावा त्यांनी वेळ स्पष्ट केला असता तर बरं झाल असतं

    मग तो दोन महिन्याचा आहे की सहा महिन्याचा

    हे सरकार घटनाबाह्य हे यावर थांबलं आहे

    उद्धव ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट केली असती तर आणता आलं असतं का ?

    तर नाही

    कोर्टाला स्वतःहून कायदे तयार करण्याचा अधिकार नाही

    ते फक्त लागू करू शकतात

  • 11 May 2023 12:36 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा

    नवी दिल्ली

    सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा

    रेबिया प्रकरण 7 बेंचकडे

    राज्यपाल भूमिकेवर कोर्टाचे ताशेरे,बहुमत चाचणी अयोग्य होती

    ठाकरेंनी राजीनामा देणं चूक होत, राजीनामा दिला नसता परिस्थिती जैसे थे करता आली असती – कोर्ट

  • 11 May 2023 12:35 PM (IST)

    बाळासाहेब यांच्या शिवसेनेवरील दावा फेटाळला ही आमच्यासाठी आनंदाची बाब – संजय राऊत

    – सुनील प्रभू हेच अधिकृत व्हीप आहेत.

    – त्यानुसार हे आमदार अपात्र ठरले आहेत.

    – व्हीप याची खात्री बाळगून निर्णय घ्यायला हवा होता.

    – फडणवीस यांनी पेढे वाटू नयेत.

    – सरकार टिकले म्हणून खाजवत बसवू नये

    – नैतिकता असेल तर सरकारने ताबडतोब राजीनामा दयायला हवा.

    – शिवसेनेवरचा दावा फेटाळला, बाळासाहेब यांच्या शिवसेनेवरील दावा फेटाळला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

  • 11 May 2023 12:33 PM (IST)

    सरकार घटनाबाह्य आहे हे कोर्टाने सांगितलं आहे – संजय राऊत

    सरकार घटनाबाह्य आहे हे कोर्टाने सांगितलं आहे – संजय राऊत

    शिवसेना कुणाची हा फेटाळला आहे

    नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा

  • 11 May 2023 12:29 PM (IST)

    मोठी बातमी : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच

    मोठी बातमी : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच

    – जुने सरकार आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली.

    – निर्णय घेण्यासाठी मोठ्या 7 न्यायाधीशांचे खंडपीठाकडे देण्यात येईल.

  • 11 May 2023 12:27 PM (IST)

    महाराष्ट्रात शिंदे-भाजपा निर्णय राहणार का ?

    राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.

    १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे

    खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा दिलासा

  • 11 May 2023 12:24 PM (IST)

    खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा

    राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.

    १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे

    खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा

  • 11 May 2023 12:24 PM (IST)

    ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणलं असतं – कोर्ट

    उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गट अडचणीत आले.

  • 11 May 2023 12:22 PM (IST)

    राज्यपाल यांच्या भूमिकेवरही नायालयाचे कडक ताशेरे

    – सरकारमधील स्पीकरने अविश्वास प्रस्तावाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर राज्यपालांना अधिकाराचा वापर करणे न्याय्य ठरते.

    – कलम 174 मंत्रिपरिषदेच्या मदतीशिवाय आणि सल्ल्याशिवाय या प्रकरणात राज्यपालांची भूमिका घेणे उचित नाही असे याचिकेत नमूद केले आहे.

    – राज्यपालांनी ठरावाच्या मुद्यावर आणि विलीगीकरणाच्या नोटीसच्या आधारे केलेल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही .

    – राज्यपालांकडे असे कोणतेही वस्तुनिष्ठ परिस्थिती नव्हती ज्या आधारे ठराव करणार्‍या सरकारच्या विश्वासावर शंका घेऊ शकता.

    – राज्यपालांनी काही आमदारांच्या बाजूने असंतोष व्यक्त करणारे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

  • 11 May 2023 12:19 PM (IST)

    माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    आता माझी भूमिका संपलेली आहे

    न्य़ायालय जेव्हा बोलणार तेव्हा आम्ही सांगणार आहे

  • 11 May 2023 12:19 PM (IST)

    निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे

    नरेश म्हस्के ( शिवसेना प्रवक्ते ) ऑन निकाल व संजय राऊत

    प्रत्येकाला वाटत निकाल आपल्या बाजूने लागावा

    आमच्या बाजूने निकाल लागेल

    निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हा वेगळा गट म्हणून निर्णय झाला आहे

    आम्हाला अपात्र करू शकत नाही

    संजय राऊत हे भरकटलेले आहेत

    अजित पवार आणि शरद पवार यांच्या वक्तव्याचा पण विरोध केला

    राऊत कोणाचे आहेत नेमके शरद पवारांच की  उध्दव ठाकरेंचे ते आता सोनिया आणि राहुल गांधी चे झालेत

    आघाडी सुद्धा संजय राऊत यांना दोष देत आहेत.

    राष्ट्रवादीत अंतर्गत भांडण संजय राऊत लावतात

    संजय राऊत मूर्खांचा बाजार आहे

    न्याय देवता आहे निकाल आमच्या बाजूने लागेल

    आमची बाजू सत्याची आहे

  • 11 May 2023 12:17 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला दिलासा तर शिंदे गटाला मोठा झटका

    – शिंदे गटाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

    – गटनेत्यापेक्षा पक्षाचा व्हीप महत्वाचा

    – शिंदे गटाने कुठल्याही पात्रता पाठिंबा काढला नाही असे म्हटले नाही.

    – बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही.

    – राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.

  • 11 May 2023 12:16 PM (IST)

    बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरु शकत नाही – न्यायाधीश

    बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरु शकत नाही – न्यायाधीश

    पक्षांतर्गत वाद सोडवण्यासाठी फ्लोर टेस्ट वापरता येत नाही.

  • 11 May 2023 12:15 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार थोड्याच वेळात मुंबईत होणार दाखल

    उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार थोड्याच वेळात मुंबईत होणार दाखल..

    त्यांच्या सोबत तेजस्वी यादव आणि अन्य मुख्यमंत्री आमदार व खासदार या ठिकाणी मुंबईत होणार दाखल..

    नितीश कुमार यांच्या स्वागता साठी विमानतळ परिसरात jdu पक्षाचे कार्यकर्ते आणि नितीश कुमार यांचा चाहता वर्ग उपस्थित…

  • 11 May 2023 12:13 PM (IST)

    कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही.

    शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून गोगावले (शिंदे गटाचा पाठिंबा असलेले) यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर – सर्वोच्च न्यायालय

    कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही.

    दहाव्या शेड्यूल अंतर्गत विभाजनाचा बचाव आता उपलब्ध नाही

  • 11 May 2023 12:13 PM (IST)

    नरहरी झिरवाळ यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

    नरहरी झिरवाळ यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

    -अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की, आमदारांच्या मतदारसंघात कार्यक्रम होत असताना, त्यांना आमंत्रित करणे गरजेचे आहे..

    किरकोळ बाबी सुधारण्याच्या आदिवासी विकास विभागाला दिला सल्ला

    -जपानला जाऊन आल्यावर माझ्या पत्नीचे वजन 4 किलो वाढले..
    (गंमतीने)

    -केवळ रस्ता करून दिवे लावून विकास होत नाही..
    त्याला शिक्षणाची देखील जोड हवी..

    -मी काही फार हुशार नव्हतो, आजही नाही..

    -मी नितीन गडकरी यांच्याकडे देखील विनंती केली होती, मजुरांसाठी निवारा शेड उभारून द्या..

    -मला वाटलं सत्ताधारी आमदारांच्या कानावर आजचा काही निकाल आला की काय?
    (गंमतीने)

    -टीआरटीईचे सब डीविजन हे नाशिकला द्यावे..

    -आज भूमिपूजन झालेल्या कार्यक्रमाचे संशोधन कार्य लवकर सुरू होईल

    -आमदार हिरामण खोसकर हे दोन तालुक्यांचे आमदार अजे, त्यामुळे त्यांना जास्त देत जा

  • 11 May 2023 12:11 PM (IST)

    मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही

    मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही

  • 11 May 2023 12:11 PM (IST)

    आताची मोठी बातमी : भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

    – काही प्रश्नांची उत्तर बाकी आहेत.

    – हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे सोपविण्यात येत आहे.

    – व्हीपची नेमणूक विधीमंडळ पक्षाद्वारे किंवा राजकीय पक्षाद्वारे केली जाते.

    – भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

    – राजकीय पक्षाची आश्वासने आणि धोरण यानुसार मतदान होते. पण, ते नंतर स्वत:ला दुसऱ्या पक्षाशी जोडू शकतात अशी व्यवस्था नाही.

  • 11 May 2023 12:07 PM (IST)

    राजकीय पक्षानं दिलेला व्हिप दहाव्या सुचीसाठी अत्यंत महत्त्वाचा

    राजकीय पक्षानं दिलेला व्हिप दहाव्या सुचीसाठी अत्यंत महत्त्वाचा

    ३ जुलैला फुट पडली हे अध्यक्षांना कळालं होतं.

    सत्तासंघर्षाचं प्रकरण मोठ्या घटनापीठाकडं

    काही प्रश्नांची उत्तर बाकी आहेत.

    कोर्टाचा आता चिन्हाबाबत निर्णय

    गोंगावलेची प्रतोदपती नियुक्ती बेकायदेशीर

    भरत गोगावले याची नियुक्ती बेकायदेशीर

  • 11 May 2023 12:03 PM (IST)

    निकालाशी संबंधित काही मुद्दे मोठ्या खंडपीठाकडे दिले आहेत.

    सर्वोच्च न्यायालयाने 27 जून 2022 रोजी दिलेला आदेश नबाम रेबियाच्या निर्णयावर विसंबून राहिला नाही आणि केवळ महाराष्ट्र उपसभापतींच्या नोटिसांना उत्तर देण्यासाठी वेळ वाढवला आहे. पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नबाम रेबिया प्रकरणातील 2016 च्या निकालाशी संबंधित काही मुद्दे मोठ्या खंडपीठाकडे दिले आहेत.

  • 11 May 2023 12:00 PM (IST)

    सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरु

    सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरु

    सात न्यायधिशांकडं सत्तासंघर्षाचं प्रकरण सुरु

  • 11 May 2023 12:00 PM (IST)

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग

    मुंबई : 

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग

    सुप्रीम कोर्टाची सर्वात मोठी घोषणा

  • 11 May 2023 11:59 AM (IST)

    दिल्लीच्या निणर्यामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका

    दिल्लीच्या निणर्यामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका

    – दिल्लीतल्या सेवा दिल्ली राज्यसरकारच्या अधीन राहतील

    – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

  • 11 May 2023 11:58 AM (IST)

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात

    मुंबई : 

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून वाचन सुरु