AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाविकास आघाडीतील ‘शिक्षणसम्राट’ मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला’, भातखळकरांचा खोचक टोला

महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षणसम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला आणि सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.

'महाविकास आघाडीतील 'शिक्षणसम्राट' मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला', भातखळकरांचा खोचक टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 10:29 PM

मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षणसम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला आणि सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय. (Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray over school fee hike)

वीज बिलाच्या बाबतीत सवलत देणार अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याच्या बाबतीत सुद्धा केवळ चालढकल करण्याचे धोरण अवलंबलं आहे. केवळ शासन निर्णय आणि परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम ‘शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः आणि भारतीय जनता पार्टीने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून आणि सभागृहात मागणी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. यासंदर्भात आमची लढाई न्यायालयात सुरुच आहे. न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी-पालकांना फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार, असा निर्धारही अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलाय.

‘फी मध्ये 50 टक्के सवलत देऊन विद्यार्थी पालकांना दिलासा द्या’

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कायद्यात सुधारणा करुन फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली होती. करत कोरोनाच्या काळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फी करिता तगादा लावणार्‍या व फी अदा न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणार्‍या मुंबई-नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय निव्वळ धूळफेक करणारा आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

…तर त्या शाळेतील विदयार्थ्यांनी कुठं जायचं?

संबंधित 8 शाळांची एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठं जायचं? याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करावा. कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः व भाजपने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम ‘शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी निकाल!

Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray over school fee hike

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....