SDCC Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय. तर, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झालीय. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केला आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय. तर, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झालीय. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि सुशांत नाईक यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता. भाजपची एकहाती सत्ता बँकेवर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हा बँकेत दाखल झालेले आहेत, त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.
नारायण राणे यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचं अभिनंदन
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे थोड्याच वेळात पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव
संतोष परब हल्ला प्रकरणी मनीष दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या घटनेमुळं जिल्हा बँकेची निवडणूक राज्य पातळीवर पोहोचला होता. त्या वादाचे पडसाद जिल्हा बँक निवडणुकीत उमटले होते. अखेर भाजपनं विजय मिळवल्यानंतर आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. विक्टर डांटस आणि सुशांत देसाई यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी अर्ज केला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभव झाला आहे.
भाजप 11 तर महाविकास आघाडी 8 जागांवर विजयी
संतोष परब हल्ला प्रकरण आणि नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यास मिळवलेलं यश यामुळं ही निवडणूक राज्यभर चर्चेत होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी ती राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशीच होती. जिल्हा बँकेत भाजपला हरवणं म्हणजे राणेंच्या वर्चस्वला धक्का लावणं असं समीकरण होतं. त्यामुळे शिवसेना त्वेषाने या निवडणुकीत उतरली होती. पण तरीही राणेंनी 11 जागा जिंकत बँकेवर आपलंच वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं. तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकून मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं होतं.
इतर बातम्या: