AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांच्या दुसऱ्याच बैठकीला मोठा फटका, शरद पवार आणि ममता बॅनर्जी राहणार गैरहजर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 17 आणि उद्या 18 जुलै रोजी ही बैठक बंगळुरू येथे होत आहे. या बैठकीत अजेंडा आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

विरोधकांच्या दुसऱ्याच बैठकीला मोठा फटका, शरद पवार आणि ममता बॅनर्जी राहणार गैरहजर
Opposition meet Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली | 17 जुलै 2023 : पाटणा येथील बैठक यशस्वी झाल्यानंतर आज विरोधकांची महाबैठक होत आहे. बंगळुरू येथे विरोधकांची दोन दिवस बैठक चालणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला देशभरातील 24 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सहा अजेंडे मांडण्यात येणार आहेत. आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खास डिनरही देण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. त्यामुळे या बैठीकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 17 आणि उद्या 18 जुलै रोजी ही बैठक बंगळुरू येथे होत आहे. या बैठकीत अजेंडा आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली आहेत. शरद पवार यांच्या पक्षातच फूट पडल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुतण्यानेच दगा दिल्याने पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्ष सावरण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे आज बंगळुरू येथे होणाऱ्या डिनरला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा आजच्या डिनरला जाणार नाहीत. त्या उद्या बैठकीत भाग घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पवार, दीदी नाही

ममता बॅनर्जी यांच्या गुडघ्याची मायक्रोसर्जरी झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या थेट उद्याच बैठकीला येणार आहेत. मात्र, दोघेही आजच बंगळुरूला पोहोचतील. पण रात्रीभोजनाला हजर राहणार नाहीत. तर शरद पवार आज मुंबईत पक्षाच्या आमदारांना भेटणार आहेत. राज्याचं पावसाळी अधिवेशन असल्याने ते आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे ते बंगळुरूला रात्री भोजनाला हजर राहणार नसल्याचं सांगितलं जातंय.

आज रात्रीभोज

विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आज संध्याकाळी 6 ते रात्री 8च्या दरम्यान होणार आहे. ही औपचारिक बैठक असेल. त्यानंतर 8 वाजता कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना रात्री डिनरची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बैठक सुरू होईल. ही बैठक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अजेंडा काय?

1. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यासाठी एक उपसमिती स्थापन करणे

2. पक्षांचे संमेल, रॅली आणि दोन पक्षातील विरोधीभास दूर करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करणे

3. राज्यातील त्या त्या पक्षाच्या ताकतीनुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यावर चर्चा

4. ईव्हीएमवर चर्चा करून निवडणूक आयोगाला सुधारीत सूचना देणं.

5. आघाडीचं नाव ठरवणं

6. संभाव्य आघाडीसाटी एक सामान्य सचिवालय स्थापन करणे.

मिनिट टू मिनिट कार्यक्रम

17 जुलै

संध्याकाळी 6 वाजता काँग्रेस अध्यक्षांचं भाषण

संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटाने मसुदा अजेंड्यावर संक्षिप्त चर्चा करणे

संध्याकाळी 7 वाजता- 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीतील अजेंड्याला मान्यता देणे

संध्याकाळी 7.30 वाजता- कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांकडून रात्रीभोजन

18 जुलै

सकाळी 11 वाजता- काँग्रेस अध्यक्षांकडून अजेंड्याचं वाचन

सकाळी 11.10 वाजता- अजेंड्यावर चर्चा

दुपारी 1 वाजता – जेवण

दुपारी 2.30 वाजता – उप समूह आणि सचिवालयाची स्थापना

दुपारी 3 वाजता- बैठकीचा समारोप

दुपारी 4 वाजता – संयुक्त पत्रकार परिषद

कोणकोणते पक्ष सामील होणार

काँग्रेस- सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल

टीएमसी- ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी

सीपीआय – डी. राजा

सीपीआयएम – सीताराम येचुरी

एनसीपी- शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड

जेडीयू – नितीश कुमार, ललन सिंह, संजय झा

डीएमके – एमके स्टॅलिन, टीआर बालू

आप- अरविंद केजरीवाल

झारखंड मुक्ती मोर्चा – हेमंत सोरेन

ठाकरे गट – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत

आरजेडी – लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मनोज झा, संजय यादव

समाजवादी पार्टी – अखिलेश यादव, रामगोपाल यादव, जावेद अली खान, लालजी वर्मा, राम अचल राजभर, आशिष यादव

नॅशनल कॉन्फ्रन्स – उमर अब्दुल्ला

पीडीपी – मेहबूबा मुफ्ती

सीपीआय (एमएल) – जयंत सिंह चौधरी

इंडियन यूनियन मुस्लिम लीग – केएम कादर मोहिदीन, पीके कुणाली कुट्टी

केरळ काँग्रेस (एम) – जोश के मणि

एमडीएमके – थिरू वायको, जी रेणुगादेवी

व्हिसीके – थिरू थिरूमावालवन, रवि कुमार

आरएसपी – एन के प्रेमचंद्रन

केरला काँग्रेस – पीजे जोसेफ, फ्रान्सेस जॉर्ज के

केएमडीके – थिरू ई. आर. ईस्वरम, एकेपी चिनराज

एआयएफबी – जी. देवराजन

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.