Eknath Shinde : सेनेचे खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दिल्लीत राजकीय हालचालींना वेग
कालपर्यंत शिवसेनेत असलेले खासदार आता शिंदे गटात सहभागी झाले आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ भेटच घेतली नाहीतर त्यांचा सत्कारही केला आहे. मंगळवारी याच बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान, खासदारांच्या वतीनेही या निर्णयामागचे कारण समोर येईल असा आशावाद आहे.
मुंबई : आमदारां पाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी होणार यावर आता शिक्कामोर्ब झाला आहे. (Shivsena) शिवसेनेच्या तब्बल 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवाय ते आता (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत ऑनलाईनद्वारे या खासदारांमध्ये बैठक झाली होती पण आता या 12 खासदारांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट भेटीगाठीही होऊ लागल्या आहेत. त्यामुळे 12 खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असूनय यावेळी हे 12 खासदारही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजकीय घडामोडींना वेग
मध्यंतरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये बैठकाचे सत्र सुरु होते. शिवाय राष्ट्रपतीपदाच्या एनडीए च्या उमेदवार यांनाच शिवसेनेचा पाठिंबा असणार असा निर्णयही बैठकीत झाला. त्यानंतर मतदानासाठी गेलेल्या खासदरांनी दिल्लीत थेट शिंदे गटातच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळत असला तरी शिवसेनेपुढील समस्या मात्र वाढत आहेत. असे असले तरी पक्षावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे राऊतांनी स्पष्ट केले आहे. शिवाय तो एक गट आहे त्यामुळे त्यांना कोणताही अधिकार नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्याची भेट अन् सत्कारही
कालपर्यंत शिवसेनेत असलेले खासदार आता शिंदे गटात सहभागी झाले आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ भेटच घेतली नाहीतर त्यांचा सत्कारही केला आहे. मंगळवारी याच बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान, खासदारांच्या वतीनेही या निर्णयामागचे कारण समोर येईल असा आशावाद आहे. यामध्ये भावना गवळी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, प्रताप जाधव, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.
या खासदारांच्या सुरक्षेत वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील खासदारांची ऑनलाईनद्वारे बैठक झाली होती. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या खासदारांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. शिवाय या 12 खासदारांचा आता शिंदे गटात समावेशही होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. खासदारांच्या बंडामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदारांबरोबर त्यांच्या मतदार संघातील घर आणि कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात अला आहे.