AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्याच्या महापौरांसह इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने कोरोना लस घेतली, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

ठाण्याचे महपौर, एक शिवसेना आमदार आणि वरळीतील इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने कोविड लस घेतल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलाय.

ठाण्याच्या महापौरांसह इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने कोरोना लस घेतली, आशिष शेलारांचा गंभीर आरोप
ashish shelar
| Updated on: Mar 03, 2021 | 8:32 PM
Share

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फ्रंटलाईन वर्कर्सला प्रथम लस देण्यात येईल असं निक्षून सांगितलं. मात्र, ठाण्याचे महपौर, एक शिवसेना आमदार आणि वरळीतील इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने कोविड लस घेतल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलाय. तसेच असं होत असेल तर सरकारला माझं कसं म्हणायचं असा सवालही त्यांनी केला (Serious allegations of Ashish Shelar on Thackeray Government).

आशिष शेलार म्हणाले, “महाराष्ट्र सरकार हे आपलं सरकार आहे असा प्रचार सुरु आहे, पण शासनाचे चार खाते (विभाग) मंत्री किंवा अधिकारी नाही, तर वेगळीच माणसं चालवत आहेत. राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत निलांबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग किर्तीकुमार केडिया हे लोक चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? हे लोक उच्च शिक्षण मंत्र्यांकडे कर्जाऊ घेण्यात आलेल्या 15 ते 20 कर्मचाऱ्यांपैकी आहेत.”

“ठाकरे सरकारची 4 खाती मंत्री नाही तर बाहेरचे लोक चालवतात”

“जर शासनाची 4 खाती बाहेरच्या व्यक्ती चालवतात, एका खात्यात कर्मचारी कर्जाऊ आहेत, तर एमएमआरडीए सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर. ए. राजीव यांना कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार आपले सरकार कसे?” असा सवाल शेलार यांनी केला. कोरोना काळात सरकारने जे काम केलं त्यावरुन सरकार आपली पाट थोपटून घेतंय, पण या काळात खासगी रुग्णालयांनी नागरिकांना लुटल्याचाही आरोप आशिष शेलार यांनी केला. तसेच त्याबाबतची उदाहरणंही सांगत सरकारवर जोरदार टीका केली.

“कमला मिल आग प्रकरणी सरकारने अपिल का केलं नाही?”

“नुकतेच कमला मिलमधील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत कोरोनाचे नियम न पाळता गर्दी केल्याचे व्हिडीओ समोर आले. अशा लोकांचे धाडस का होते? याच कमला मिलमध्ये 29 डिसेंबर 2017 रोजी लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी रमेश गोवानी आणि रवी भंडारी या 2 मिल मालकांनी न्यायालयात जाऊन दोष मुक्त करुन घेतले. त्या विरोधात सरकारने अपिल करावे, अशी मागणी आम्ही केली. पण अद्याप या प्रकरणी सरकारने अपिल का केले नाही? यातूनच काही प्रवृत्ती वाढतात,” असं सांगत आमदार आशिष शेलार यांनी सरकारने नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

“मेट्रोची कारशेड आरेमधून कांजूरमार्गला आणण्याचा हट्ट जमीन मालकांच्या फायद्यासाठी”

“मेट्रोची कारशेड आरेमधून कांजूरमार्गला आणण्याचा हट्ट केला जातोय, पण यात काही जमीन मालकांच्या फायद्यासाठी तर हे केलं जात नाही ना? असं आम्ही वारंवार विचारत होतो. नुकतेच न्यायालयात सरकारने मालकांना नुकसान भरपाई देऊ असे सांगितले. हेच आम्ही सांगत होतो,” असं सांगून आमदार आशिष शेलार यांनी कांजूर मार्ग प्रकरणी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये बोगस नावे घुसवून इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या प्रकरणी पालिका अतिरिक्त आयुक्त कंकाणी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश ही दिले आहेत, अशी माहिती राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेत देण्यात आलीय.

हेही वाचा :

आता राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलार यांचा टोला

‘बेस्ट’ची थकबाकी ठेवणाऱ्या बिल्डरची एसआयटी चौकशी करा; भाजप आमदारांची मागणी

टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील पब आणि बारवर कारवाई करणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

व्हिडीओ पाहा :

Serious allegations of Ashish Shelar on Thackeray Government

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.