Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय?”, शिंदेगटातील मंत्र्याचा राऊतांना सवाल

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय?, शंभुराज देसाई यांचा सवाल

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय?, शिंदेगटातील मंत्र्याचा राऊतांना सवाल
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 11:40 AM

मुंबई : मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली पण कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा निघालेला नाही, असं म्हणत संजय राऊत वारंवार टीका करत आहेत. त्याला शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय ? ठाकरे सेनेचे नेते दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर कसे येऊन उभे राहिले?, असा सवाल त्यांनी केला आहे.

संजय राऊत तीन महिने आराम करत होते तेव्हा महाराष्ट्र शांत होता. त्यांच्या वक्तव्यानं पुन्हा महाराष्ट्र अशांत करायचा आहे का ? संजय राऊतांनी बोलण्याचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करू , असं म्हणत देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.

संजय राऊतांना म्हणावं आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा घणाघात शंभुराज देसाई यांनी केला आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशात सभागृहात वारंवार गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागत आहे. त्यावरही शंभुराज देसाई यांनी भाष्य केलंय.

आम्ही सभागृहात चर्चा करायला तयार आहोत.सभागृहात चिखलफेक काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनाच करतीये, असं देसाई म्हणालेत.

आम्ही लवकरच बेळगावला जाणार आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिवांना पत्र लिहून आम्ही कळवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.