Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंबद्दल मनात आदर, त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये, शंभूराज देसाई यांचं आवाहन

बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे",असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंबद्दल मनात आदर, त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये, शंभूराज देसाई यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:50 PM

मुंबई : माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊतांची भाषा बोलू नये. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली. उद्धव ठाकरेंबद्दल आदाराची भावना त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. “आम्ही शिवसेनेसाठी अनेक वर्षे काम केलं. एकनाथ शिंदेनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीवर नाराज असल्यास वेळोवेळी सांगितलं. शिवसेना पोखरण्याचं काम सध्या सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) राष्ट्रीय आणि युगपुरुष आहेत. बाळासाहेबांना एका कुटुंबापूर्ती मर्यादीत करू नये. बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे”,असं शंभूराज देसाई म्हणाले आहे.

“बाळासाहेब सगळ्यांचे”

“सध्या शिवसेना पोखरण्याचं काम सध्या सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलं. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय आणि युगपुरुष आहेत. बाळासाहेबांना एका कुटुंबापूर्ती मर्यादीत करू नये. बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे”,असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत- उद्धव ठाकरे

ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा बगवा झेंडा फडकला.बाळासाहेब त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत सांगत राहिले. त्याच ठाण्यातील नेत्यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारला असता. ठाणेकर सूज्ञ आहेत. हा पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत- शिरसाट

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सभेत घेतलं जातं. त्या उंचीच्या नेत्याला एवढं खुजं करू नका, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.

ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं चुकलं का?

त्यावर राऊतांनी प्रश्न केला, तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केलं असतं. तर यांनी दुसरंच काहीतरी केलं असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्री पदही हवं आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुख ही व्हायचं आहे. हे शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करत आहेत, ही राक्षसी महत्वकांक्षा आहे, त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं, माझं तेही माझं, याचं तेही माझं, इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणांना सीमा नसते, असा घणाघात ठाकरेंनी केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.