‘आम्ही आधी शिवसैनिक, मग मंत्री, राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात’, शंभूराज देसाईंचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर झापताना सीएम बीएम गेला उडत, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे.

'आम्ही आधी शिवसैनिक, मग मंत्री, राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात', शंभूराज देसाईंचा इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे, गृहर राज्यमंत्री शंभूराज देसाई
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 6:35 PM

सातारा : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 25 जून रोजी चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर झापताना सीएम बीएम गेला उडत, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे. (Shambhuraj Desai responds to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray)

नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी नारायण राणेंना इशाराच दिलाय.

नारायण राणे काय म्हणाले होते?

चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा तोल गेल्याचंही दिसलं. राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.” समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं.

काय मुख्यमंत्री? कसली संवेदना?

मुख्यमंत्री चौथ्या दिवशी कोकणात का आले ते सांगतो. काल साडे सहाला माझा फॅक्स आला. मी कोकणात येत असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पूरपरिस्थिती पाहण्याचा कार्यक्रम तयार केला. तेव्हा मातोश्रीचा दरवाजा उघडला. नाही तर बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. तर ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? ही परिस्थिती झाल्या झाल्या त्यांनी यायला हवं होतं. उभं राहून सर्व यंत्रणा कामाला लावायला हवी होती, असं ते म्हणाले. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री. या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अजित पवार यांचंही राणेंना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं. ” काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती”, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन आता करणार नाही, पण…; फडणवीसांनी दिला इशारा

उद्धव म्हणाले, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, फडणवीस म्हणतात, पॅकेज म्हणा किंवा काहीही, पण पूरग्रस्तांना मदत करा

Shambhuraj Desai responds to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.