AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा दावा

शाह आणि पवार यांची भेट होणार असल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. मात्र, ही राजकीय भेट आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. सहकार संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं मत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा दावा
pravin darekar
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 2:20 PM

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये देशपातळीवरील बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी दिलेले अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शाह आणि पवार यांची भेट होणार असल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. मात्र, ही राजकीय भेट आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. सहकार संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं मत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. (Praveen Darekar’s opinion about Pawar-Shah meeting)

शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवार थोड्याच वेळात संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाह हे देशाचे नवे सहकारमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकाराच्या मुद्द्यांवर शरद पवार नव्या केंद्रीय सहकार मंत्र्यांना भेटणार आहेत.

लोकलसाठी येत्या काळात भाजप प्रचंड आक्रमक होणार

मुंबईत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरु करण्यात यावा अशी मागणी सातत्यानं होताना दिसतेय. अशावेळी लोकलसाठी येत्या काळात भाजप प्रचंड आक्रमक होईल. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यायलाच हवी. नाहीतर दोन डोस घेतल्याचा फायदा काय? असा सवाल दरेकर यांनी विचारला आहे. तर राज्य सरकारची मोगलाई सुरु आहे. मंदिरं बंद आणि मदीरालय सुरु आहेत. त्यामुळे सरकारला लोकांच्या भावनेचा आदर नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केलीय.

शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीगाठी

शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते.  त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

शरद पवार दिल्लीत कोणाकोणाला भेटले? 

  • संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह
  • वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
  • गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

संबंधित बातम्या :

राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय? वाचा सविस्तर

राहुल गांधींचं ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर ‘सायकल मार्च’

Praveen Darekar’s opinion about Pawar-Shah meeting

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.