‘आजोबा… काळजी घ्या’, शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातू भावनिक, रोहित आणि पार्थ पवारांचं ट्वीट काय?

शरद पवारांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांचे नातू भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आजोबा... काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलंय. तर आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करत पवारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

'आजोबा... काळजी घ्या', शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातू भावनिक, रोहित आणि पार्थ पवारांचं ट्वीट काय?
पार्थ पवार, शरद पवार, रोहित पवार
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 5:01 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. पवार यांनी स्वत: ट्वीट करत त्याबाबत माहिती दिली आहे. तसंच आपली प्रकृती चांगली असल्याचंही सांगत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु असल्याचं पवार म्हणाले आहेत. दरम्यान, पवारांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांचे नातू भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आजोबा… काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी केलंय. तर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही ट्वीट करत पवारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पार्थ पवार यांनी पवारांचे ट्वीट रिट्वीट करत आजोबा… काळजी घ्या. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, असं ट्वीट पार्थ पवार यांनी केलंय. तर ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’ असं भावनिक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

शरद पवार यांची ट्विटरवरुन माहिती

दरम्यान, पवार यांनी दुपारी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावीट, असं आवाहन पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

पंतप्रधान मोदींकडून पवारांची विचारपूस

पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

इतर बातम्या : 

Sharad Pawar Corona Update : पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्या चिन्हावर लढला होतात, राऊतांनी भुजबळांसह सेनेच्या वाघांची यादी वाचली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.