फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही : शरद पवार
शरद पवार यांनी केंद्र सरकारवर महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला (Sharad Pawar on Devendra Fadnavis).
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे (Sharad Pawar criticize Devendra Fadnavis). तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये काहीही तथ्य नाही, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही, असंही नमूद केलं. ते सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादीनं सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू असं प्रस्ताव भाजपनंच दिला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या निर्णयप्रक्रियेत किती स्थान? भाजप नेते म्हणायचे शिवसेनेसोबत सरकार बनवायचे नाही. स्थिर सरकारसाठी साथ द्या म्हणून भाजप नेते येत होते. भाजप नेते पाठिंबा मागण्यासाठी तीन वेळा आले होते. मात्र, मी मोदींना भेटून भाजपसोबत येणार नाही, असं सांगितलं. शिवसेनेबरोबर सरकार बनवू, वा विरोधात बसू असं सांगितलं. मोदींना भेटल्या भेटल्या मी संजय राऊतांना तपशील दिले.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“भाजपचे लोक महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडायचे म्हणतात. सरकार पाडायचे म्हणणाऱ्यांना जनमानसात किती स्थान? आधी म्हणायचे 3 महिन्यांत पाडू, आता म्हणतायत 6 महिन्यात पाडू. भाजपचं ‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. ‘ऑपरेशन कमळ’चा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही. मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना फडणवीस कळले. शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये असे पहिल्यापासून वाटत होते. भाजपच्या हातातील सरकार कधीच सेनेच्या हिताचे नसते. शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावे म्हणून मी बोललो,” असंही शरद पवार म्हणाले.
प्रियंका गांधीचे घर काढून घेणे क्षुद्रपणाचे राजकारण
शरद पवार म्हणाले, “हातातील सत्ता विनयाने वापरायची असती. प्रियंका गांधींना घराबाहेर काढण्यामागे सत्तेचा दर्प आहे. त्याचं घर काढून घेणे हा राजकीय क्षुद्रपणा आहे. राज्यामधील सरकारं पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा गैरवापर होत आहे. मुख्यमंत्री परिषदेत मोदी मनमोहनसिंगांना खूप कठोर बोलायचे. एक मुख्यमंत्री पंतप्रधानांविरुद्ध असे कधी बोलायचा नाही. टीका होऊनही मनमोहनसिंगांनी गुजरातविरोधी काही केले नाही. मी मोदींना भेटल्याच्या तक्रारी जायच्या, तरी मनमोहन सिंग दुर्लक्ष करायचे. गुजरात हा देशाचा भाग आहे, असं मनमोहनसिंग म्हणायचे. मनमोहनसिंग व आत्ताचे मोदींचे धोरण यात प्रचंड फरक आहे.”
“एकत्र आले पाहिजे असं देशातील विरोधकांना वाटत आहे. कोरोनामुळे विरोधकांच्या एकत्र येण्यात बाधा आली. संसद अधिवेशनावेळी, विरोधक ऐक्यासाठी पुढाकार घेईल,” असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा :
शिवसेना भाजपपासून दूर व्हावी, या हेतूने ‘ते’ वक्तव्य केले : शरद पवार
Sharad Pawar Saamana | जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…
देशाला आज एका मनमोहन सिंगांची गरज : शरद पवार
Sharad Pawar criticize Devendra Fadnavis on political claims