Sharad Pawar Health | शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद, चालण्याचीही परवानगी

शरद पवार यांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Sharad Pawar Health Update)

Sharad Pawar Health | शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद, चालण्याचीही परवानगी
sharad pawar
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 8:11 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून पवार रुग्णालयात दाखल आहेत. (Sharad Pawar Health Update from Mumbai Breach Candy Hospital by Nawab Malik)

डॉ. अमित मायदेव यांनी काल (गुरुवार) संध्याकाळी सात वाजता शरद पवार यांची तपासणी केली. आता त्यांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय त्यांची तब्येतही चांगली असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन सांगितले.

(Sharad Pawar Health Update from Mumbai Breach Candy Hospital by Nawab Malik)

शरद पवारांची शस्त्रक्रिया का?

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

सुप्रिया सुळेंचे फेसबुक लाईव्ह

शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काल सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून दिली होती. या व्हिडीओतही शरद पवार रुग्णालयातील बेडवर बसून पेपर वाचताना दिसले. पवार स्वतःचा फोटो पाहत असताना ‘योगायोगाने हाच फोटो लावलाय’ असं सुळे म्हणाल्याचं ऐकू येतं. ‘एकदा गुड मॉर्निंग म्हणता का? सगळे बघतायत तुमच्याकडे’ अशी विचारणाही सुप्रिया सुळे यांनी केली. तेव्हा पवारांनी सर्वांना हलकेसे स्माईल दिले. दरम्यानच्या काळात सुप्रिया सुळेंनी ब्रिच कँडीमध्ये शरद पवारांना दाखल केलेल्या रुमची सैरही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांना घडवली.

संबंधित बातम्या :

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार

शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधून स्वतःचाच फोटो न्याहाळून पाहतात…

(Sharad Pawar Health Update from Mumbai Breach Candy Hospital by Nawab Malik)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.