महिला ‘मुख्यमंत्री’ म्हणताच शरद पवार यांनी धरले स्वतःचे कान

पुणे येथे संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांनी एका प्रश्नावरून स्वतःचे कान धरले. तर मोदी यांच्यावर टीकाही केली.

महिला 'मुख्यमंत्री' म्हणताच शरद पवार यांनी धरले स्वतःचे कान
SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 10:48 PM

पुणे 12 ऑगस्ट 2023 : संभाजी बिग्रेडने आजचा सोहळा एका वेगळ्या उद्देशाने आयोजित केला आहे. संघटनेत अनेक लोक काम करतात. संभाजी ब्रिगेड वेगळ्याप्रकारे काम करते. बहुजन समाजातील नवी पिढीने अर्थकारणात जाण निर्माण करण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेड सांगते. राज्यात आणि देशात अनेक लोक असे आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. अनेक तरुण वेगळा विचार करतात. आपले अनेक आदर्श आहेत. अनेक कर्तुत्ववान असणारी माणसे या महाराष्ट्र राज्यात जन्माला आली. अनेक लोक त्यांचा विचार बाजूला ठेवून अनेकदा वेगळी भुमिका घेतात, असा टोला शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

आपल्या आईने आपल्याला कसं घडवलं हे सांगणं अवघड आहे, माझी बाई ही 13 मुलांची आई होती. सगळी जामीन आणि कुटुंब सांभाळत आम्हाला शिकवायचा निर्धार त्यांनी केला. माझी आई बिनविरोध निवडून आल्या आणि बैठकीला त्या रोज येत. त्या बैठक कधी चुकवत नसत. वेळेचं आणि दिवसाचं महत्व ते खूप जपत. 7 दिवसाचं मुल जन्माला घेऊन त्या बैठकीला आल्या होत्या आणि त्या बालकाचं नाव शरद पवार, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आज राज्यात जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आपण सगळे एकत्रित राहू. आपल्याला यावर विचार केला पाहिजे. आपण एका नव्या समाजाची रचना केली पाहिजे. त्या दृष्टीने पाऊले टाकली पाहिजे. राज्याचे राजकारण धर्माकडे नेले जात आहे का? राज्याचे राजकारण धर्माकडे नेण्याचा जरी विचार असला तरी मला वाटत की मराठी माणूस ते होऊ देणार नाही. त्याची चिंता करण्याची गरज नाही असे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

200 वर्ष मागे नेण्याचं काम मोदी यांनी केलं

संसदेचे उदघाटन करताना देशाचे पंतप्रधान साधू घेऊन गेले. त्यांच्या पाया पडले हे चुकीचं आहे. ते आपल्या देशाच संसद आहे जिथून देशाची दिशा ठरवली जाते तिथं आपल्या देशाचे प्रमुख त्यांना घेऊन जातात आणि दंडवत करतात. ते लोक कोण होते ते माहित नाही. संसदेत कुठलाही कार्यक्रम असला की राष्ट्रपती असतात. संसदेची नवीन वास्तू बांधली पण त्यांना निमंत्रत केलं नाही. त्या महिला आहेत म्हणून बोलावलं नाही? उपराष्ट्रपती यांनाही बोलावलं नाही. असा सोहळा देशाच्या कार्यपद्धतीत न बसणारा आहे असे वागून समाजाला 200 वर्ष मागे नेण्याचं काम तुम्हीं करत आहात अशी टीका त्यांनी मोदी यांच्यावर केली.

फोडाफोडी करून सत्ता आणली

युवकांनी सध्याच्या राजकारणाचा अभ्यास करावा. अर्थकारणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यवसायाला महत्व दिले पाहिजे. धोरणात्मक निर्णय घेणारी व्यवस्था आणि तिचा दृष्टिकोन किती महत्वाचा याचा विचार केला पाहिजे. देशाचे चित्र बदलत आहे. मोदींच्या विचारांचा पक्ष राज्यात दुसऱ्या विचाराने जात आहे. केरळमध्ये त्यांचे राज्य नाही. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गोव्यात देखील नव्हतं पण त्यांनी फोडाफोडी केली. आपल्या राज्यात कसं सरकारं आणलं हे तुम्हीं बघितलं. अनेक राज्यात त्यांचे सरकारं नाही. हे सत्य आहे. लोकांना बदल हवा हे तो बदल होत आहे.

लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न

आम्ही लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही INDIA मधून एकत्र होत आहोत. लवकरच तिसरी बैठक घेत आहोत. आमचा प्रयत्न आहे की ज्या धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे ती धोरणे राबवली पाहिजे. सगळे घटक आम्हीं एकत्र करत आहोत. तुम्ही सगळे सोबत राहिलात तर त्यात यश येईल.

महिला मुख्यमंत्री का दिला नाही?

यावेळी शरद पवार यांना राज्यता महिला मुख्यमंत्री का दिला नाही असा प्रश्न केला गेला. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी स्वतःचे कान धरले. राज्यात पहिले महिला धोरण मी आणले. त्याचा परिणाम झाला. 50 टक्के भगिनी अनेक क्षेत्रात दिसतात. पण, अजुन प्रयत्न केला पाहिजे. संसदेत आमचा पक्ष छोटा आहे पण अनेक महिला खासदार आहेत. पहाटेच्या शपथविधीवर महिला नाही का ? असे म्हणताच शरद पवार जोरात हसले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.