शरद पवारांसह राहुल गांधींचा विश्वासू मोहरा संरक्षण विभागाच्या संसदीय समितीत
शरद पवार यांच्यासह कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनाही संरक्षण विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर आता सदस्यांना विविध समित्यांवर स्थान देण्यात आले आहे. चीनसोबतचा तणाव वाढला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना संरक्षण विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. राहुल गांधींचा विश्वासू मोहरा कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनाही संरक्षण विभागाच्या संसदीय समितीत स्थान देण्यात आले आहे. (Sharad Pawar in Defence Department related Parliamentary Standing Committee)
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना रेल्वे, शरद पवार आणि राजीव सातव यांना संरक्षण तर प्रियांका चतुर्वेदी यांना वाणिज्य विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
भाजप खासदार भागवत कराड यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर वर्णी लागली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या नियुक्त्या केल्या. रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रीपद असल्याने त्यांना कोणत्याही समितीमध्ये पाठवण्यात आलेले नाही.
हेही वाचा : 6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा, पवारांना सोळावी शपथ
याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांना मानव संसाधन विकास, दिग्विजय सिंह यांना नगर विकास, मल्लिकार्जुन खर्गे यांना वाणिज्य, एचडी देवेगौडा यांना रेल्वे विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
A day after administering the oath to 45 of 61 newly elected members of Rajya Sabha, Chairman Venkaiah Naidu today nominated all new members to different Department related Parliamentary Standing Committees. Jyotiraditya Scindia gets Human Resource Development (HRD) Department.
— ANI (@ANI) July 23, 2020
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड अशा महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
महाराष्ट्रातील सात खासदार
- उदयनराजे भोसले – भाजप
- भागवत कराड – भाजप
- रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
- शरद पवार – राष्ट्रवादी
- फौजिया खान – राष्ट्रवादी
- राजीव सातव – काँग्रेस
- प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
संबंधित बातम्या
महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ, काँग्रेस नेता म्हणतो आता शिवसैनिक शोभता!
(Sharad Pawar in Defence Department related Parliamentary Standing Committee)