शिवसेना भाजपपासून दूर व्हावी, या हेतूने ‘ते’ वक्तव्य केले : शरद पवार

आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरुन पाठिंबा देतो हे म्हणण्यामागे हेतू हा होता की शिवसेना त्यांच्यापासून दूर व्हावी, असा दावा शरद पवार यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केला

शिवसेना भाजपपासून दूर व्हावी, या हेतूने 'ते' वक्तव्य केले : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 9:39 AM

मुंबई : “माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले, तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले, की आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरुन पाठिंबा देतो. हेतू हा होता की शिवसेना त्यांच्यापासून दूर व्हावी” असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रदर्शित झाला. (Sharad Pawar in Saamana Interview claims he wanted Shivsena BJP to apart)

शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये असे पहिल्यापासून वाटत होते. त्यांनी सरकार बनवले आणि चालवले, यात वाद नाही. पण भाजपच्या हातातले सरकार कधीच सेनेच्या हिताचे नसते. दिल्लीत सत्ता त्यांच्याच हातात. राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री यांच्या हातात. शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे, हेच त्यांना मुळात मान्य नाही. त्यामुळे आज न उद्या ते निश्चितपणे या सर्वांना धोका देणार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावे म्हणून मी तसे बोललो, आमची ही एक राजकीय चाल होती, असे शरद पवार म्हणाले.

“शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही. तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या, असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातील काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले. बोलले नाही हे खरे नाही, ते बोललेच.. एकदा नाही.. दोनदा नाही.. तीनदा बोलले… आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की पंतप्रधान आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे प्राईम मिनिस्टरने यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला” असं पवार म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काहीच तथ्य नाही. फडणवीसांना भाजपच्या निर्णयप्रक्रियेत किती स्थान?” असा सवाल पवारांनी विचारला. “भाजप नेते म्हणायचे शिवसेनेसोबत सरकार बनवायचे नाही. स्थिर सरकारसाठी साथ द्या म्हणून भाजप नेते येत होते. तीन वेळा पाठिंबा मागण्यासाठी भाजप नेते आले होते. मोदींना भेटून मी सांगितले, भाजपसोबत येणार नाही. शिवसेनेबरोबर सरकार बनवू वा विरोधात बसू असे सांगितले. मोदींना भेटल्या भेटल्या मी संजय राऊतांना तपशील दिले” असेही पवार यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

(Sharad Pawar in Saamana Interview claims he wanted Shivsena BJP to apart)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.