Sharad Pawar Saamana | जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…

कुठे जायचं याबद्दल माहिती न देता, चीनचे राष्ट्राध्यक्ष विश्रांतीला जिथे गेले आहेत तिकडे आपण जाऊ एवढं सांगून दुसऱ्या दिवशी सात वाजता तयार राहा असं मला सांगण्यात आलं... असा किस्सा शरद पवारांनी सांगितला

Sharad Pawar Saamana | जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते...
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 3:27 PM

मुंबई : 1993 मध्ये संरक्षण मंत्री असताना चीन दौऱ्यात तिथल्या संरक्षण मंत्र्यांनी अज्ञातस्थळी नेल्याची आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितली. चीनच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या अनौपचारिक गप्पांविषयी सांगताना चीन भविष्यात धोकादायक ठरण्याचे संकेत मिळाले होते, असे शरद पवार यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. (Sharad Pawar Interview by Sanjay Raut in Saamana Pawar told experience when Chinese Defense Minister took him to unknown place)

“मी 1993 साली संरक्षण मंत्री म्हणून चीनला गेलो होतो. त्यावेळी माझ्याबरोबर तेव्हाचे संरक्षण सचिव वोहरा सुद्धा होते. मी आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी सात दिवस चर्चा केली. त्यावेळी हिमालयाच्या सीमेजवळ आपलं सैन्य होतं आणि त्याचंही सैन्य होतं. हिमालयन बॉर्डरवर सैनिक ठेवणं हे अतिशय खर्चिक होतं. तसेच हवामानाच्या दृष्टीनेही बर्फ वगैरे असल्याने आपल्या जवानांसाठी अतिशय त्रासदायक होतं. त्यामुळे त्या सात दिवसांच्या चर्चेमध्ये दोघांनाही आपलं सैन्य मागे घ्यायचं यावर एकमत केलं. त्याच आधारावर आम्ही कराराचा मसूदा तयार केला. मी तो तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे पाठवला. तर चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी हा मसूदा चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दाखवायचा आहे तर तुम्ही माझ्याबरोबर चला असं मला सांगितलं.” असं पवार सांगत होते.

“कुठे जायचं याबद्दल माहिती न देता, चीनचे राष्ट्राध्यक्ष विश्रांतीला जिथे गेले आहेत तिकडे आपण जाऊ एवढं सांगून दुसऱ्या दिवशी सात वाजता तयार राहा असं मला सांगण्यात आलं. संरक्षण खात्याच्या विमानातून आम्ही गेलो. तीन तासांनंतर ते विमान उतरलं. एका सागरी किनाऱ्याजवळच ते शहर होतं. अजिबात लोकसंख्या नाही. जिथे ते उतरलं तिथे फक्त चांगले बंगले होते. कुठे आलो आहे असं विचारलं असता कम्युनिस्ट पार्टीच्या परदेश धोरणांसंदर्भातील सदस्यांच्या विश्रांतीसाठी हा परिसर आहे. इथं कोणी लोकसंख्या नाही हा सागरी किनारा आहे. त्यांचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष ली पांग तिथे विश्रांतीसाठी गेले होते. ठरल्याप्रमाणे आमच्यामध्ये झालेल्या चर्चेवर आधारित मसुदा त्यांना दाखवला. ठरलेल्याप्रमाणे अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत ही सगळी चर्चा संपली. नंतर त्यांनी एक वाजता आम्हाला जेवायला बोलवलं. जेवण तिथेच होतं, तसंच हे शहरच नसल्याने कुठं जायलाही जागा नव्हती. मग उरलेल्या एक दीड तासात काय करायचं असा प्रश्न होता” असं पवार सांगत होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“काय करायचं असा प्रश्न पडलेला असतानाच ली पांग मला म्हणाले की लेट्स वॉक. म्हणजेच समुद्रकिनाऱ्यावरुन आपण चालूयात. ही सुवर्णसंधी समजून या निमित्तानं त्यांच्याशी बोलता येईल असा विचार करुन मी होकार दिला. मग आम्ही त्या किनाऱ्यावर चालू लागलो. तास-सव्वातास आम्ही चालत होतो. मी अनेक प्रश्न त्यांना विचारत होतो. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मला एकच गोष्ट सांगायची आहे की माझं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. मला चीनला आर्थिक क्षेत्रातील महासत्ता बनवायची आहे. अमेरिकेच्या तोडीस तोड चीन उभा राहू शकतो हे चित्र जगायला दाखवायचं आहे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. अमेरिकेनंतर किंवा त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या अधिक पुढे गेलेला देश म्हणून मला चीनला समोर आणायचं आहे, असं मला सांगितलं” अशी आठवण पवारांनी सांगितली.

“तुमचं शेजारच्या देशांबद्दल काय धोरण आहे असा प्रश्न मी त्यांना विचारला. ते हसले आणि म्हणाले आमचं टार्गेट ते आहे. शेजारच्या लोकांचा आम्ही आता विचार करत नाही. बघू, त्यांच्याबद्दल पाच-पंचवीस वर्षांनी विचार करु, असं उत्तर मला त्यांनी दिलं” अशी आठवण सांगत पवारांनी चीनचे धोरण तेव्हापासून ठरल्याचं सांगितलं.

“ते उत्तर ऐकून माझ्या डोक्यात आलं की उद्या भारतासमोर संकट आलं तर ते आज नाही 25-30 वर्षांनी येईल. आता चीन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे आणि आता त्यांचं लक्ष्य भारत आहे” असंही पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

(Sharad Pawar Interview by Sanjay Raut in Saamana Pawar told experience when Chinese Defense Minister took him to unknown place)

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.