Brijbhushan Singh : ‘शरद पवार मनाने मोठी व्यक्ती’, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंहांचं वक्तव्य, सुप्रिया सुळेंचंही कौतुक

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. 'शरद पवार मनाने मोठी व्यक्ती आहे. हे प्रकरण त्यांच्याबाबत असतं तर त्यांनी आतापर्यंत पाच वेळा माफी मागितली असती', असं बृजभूषण म्हणाले.

Brijbhushan Singh : 'शरद पवार मनाने मोठी व्यक्ती', राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंहांचं वक्तव्य, सुप्रिया सुळेंचंही कौतुक
शरद पवारांसोबत माझे संबंध, मला त्याचा गर्व-बृजभूषणसिंहImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 9:47 PM

लखनऊ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तशी घोषणाच त्यांनी केलीय. मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी तीव्र विरोध केलाय. विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केलंय. एकीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. ‘शरद पवार मनाने मोठी व्यक्ती आहे. हे प्रकरण त्यांच्याबाबत असतं तर त्यांनी आतापर्यंत पाच वेळा माफी मागितली असती’, असं बृजभूषण म्हणाले.

‘..तर राज ठाकरेंचा राजतिलक करु’

‘शरद पवार खरं बोलले. मी सर्व सभेत हे स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्राला माझा विरोध नाही, मराठ्यांना माझा विरोध नाही, माझा विरोध फक्त एका व्यक्तीला आहे. ज्यांचं नाव आहे राज ठाकरे. जर ते मराठा आहेत दर दुर्भाग्य आहे. माझा विरोध एका व्यक्तीला आहे. माझा विरोधही फार मोठा नाही, मी अशी कोणती मोठी अट घातली नाही. माझी अट ही आहे की, तुमचं मत परिवर्तन झालं आहे, तुम्ही येऊ इच्छित असाल तर माफी मागा. आमची माफी मागायची नसेल तर आमच्या देशातील संतांची माफी मागा की, जी चूक झाली ती झाली. पुढे चूक होणार नाही, तसं वचन मी देतो. संत आवाहन करतील, त्यांनी अयोध्याला यावं, त्यांचा राजतिकल करू’ असा दावाही बृजभूषण सिंह यांनी केलाय.

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं तोंडभरुन कौतुक

शरद पवार मनाने मोठी व्यक्ती आहे. जर हे प्रकरण शरद पवारांविरोधात असतं तर आतापर्यंत पाच वेळा माफी मागितली असती. कारण ती मोठी व्यक्ती आहे. मोठा नेता लवकर झुकतो, पवार मनाने खुप मोठे आहेत, अशा शब्दात बृजभूषण यांनी शरद पवारांचं कौतुक केलंय. तसंच शरद पवार आमचे चांगले मित्र आहे. ते आमच्यावर प्रेम करतात. सुप्रिया सुळेंचाही स्नेह आहे. लोकसभेत एकच व्यक्ती आहे जी नाश्ता घेऊन येते, टेबलवर ठेवते आणि नंतर निघून जाते. दिवसभर भूक लागल्यावर सर्वजण येतात, फुटाणे, फरसाण खातात. मग संध्याकाळी त्या येतात आणि डबा घेऊन जातात, असं सांगत त्यांनी सुप्रिया सुळे यांचंही कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.