ममता बॅनर्जींकडून केजरीवालांचं फोनवर कौतुक, शरद पवारांकडूनही अभिनंदन
दिल्लीत 'आप'ने भाजपला नाकारलं आहे, 2021 साली पश्चिम बंगालमध्येही भाजपला असेच उत्तर मिळेल, असा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारणारे ‘आम आदमी पक्षा’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केजरीवालांना फोन करुन शुभेच्छा दिल्या, तर शरद पवार यांनीही ट्विटरवरुन अभिनंदन केलं (Pawar Banerjee Praises Kejriwal) आहे.
अरविंद केजरीवाल हे दहशतवादी नसल्याचं सिद्ध झालं. दोन कोटी जनतेने देशप्रेमी केजरीवालांना निवडलं. इथे फक्त विकास चालतो, सीएए, एनआरसी, एनपीआर नाकारला जाईल. दिल्लीत ‘आप’ने भाजपला नाकारलं आहे, 2021 साली पश्चिम बंगालमध्येही भाजपला असेच उत्तर मिळेल, असा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee on #DelhiElectionResults: I have congratulated Arvind Kejriwal. People have rejected BJP. Only development will work, CAA, NRC and NPR will be rejected pic.twitter.com/VgpX9TmoLs
— ANI (@ANI) February 11, 2020
‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘झाडून विजय’ मिळवल्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन!’ असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
Congratulations to Shri. Arvind Kejariwal ji and Aam Admi Party workers for achieving a ‘Sweeping Victory’ in the Delhi Assembly Polls!@ArvindKejriwal @AamAadmiParty #DelhiElectionResults #DelhiPolls2020 #DelhiResults #DelhiElection2020
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 11, 2020
‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. आप 56, तर भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
पूर्ण बहुमत मिळालेल्या आम आदमी पक्षाचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणार आहेत.
‘सीएए’विरोधी आंदोलन झालेल्या शाहीन बागमध्ये कोण आघाडीवर?
दिल्ली काबीज करण्यासाठी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या त्रिकूटाचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
भाजपने तीनशे खासदारांसह 11 राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरली होती. वीस वर्षांपासून सत्तेबाहेर असलेलं भाजप सत्ता मिळवण्यासाठी आसुसलं आहे.
2015 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजप आणि काँग्रेसला क्लीन स्वीप दिला होता. भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा शून्य मिळवलं आहे. विशेष म्हणजे आप सत्तेत येण्यआधी काँग्रेस सातत्याने 15 वर्षे सत्तेत होतं.
Pawar Banerjee Praises Kejriwal