Sharad Pawar | शरद पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत तातडीची बैठक; अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे

Sharad Pawar | शरद पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत तातडीची बैठक; अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 6:51 PM

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar MLA Meeting) यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नुकसानग्रस्त भागातील आमदार उपस्थित असून त्यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची माहिती शरद पवार घेत आहेत (Sharad Pawar MLA Meeting).

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित आहेत.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक डोळ्यादेखत वाहून गेलं. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.

सध्या राज्यात सर्वपक्षीय नेते मंडळी नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते सरकार आणि विरोधी पक्षातील नेते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यादरम्यान, कुठल्या भागात किती नुकसान झालं?. कुठले पंचनामे झाले?, कुठले नाही झाले? याबाबतचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांची नुकसानग्रस्त भागातील आमदारांसोबत चर्चा सुरू आहे.

Sharad Pawar MLA Meeting

संबंधित बातम्या :

विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली? त्यांनी शपथ घेऊन सांगावं : हसन मुश्रीफ

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय, मुख्यमंत्र्यांनी विदर्भातही यावं: आशिष देशमुख

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.