कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटलंय हं, शरद पवारांच्या वक्तव्याने हशा

शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु, असं कल्याणराव काळे आधी म्हणाले होते.

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटलंय हं, शरद पवारांच्या वक्तव्याने हशा
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 3:45 PM

पंढरपूर : भाजप नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर जाण्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. पंढरपूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ, असं म्हणत शरद पवारांनीही कल्याणरावांच्या पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे शरद पवारांसोबत एकाच मंचावर उपस्थित होते. (Sharad Pawar on Kalyanrao Kale in Pandharpur)

वयाच्या ऐशीव्या वर्षातही तरुणांना लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतंच राजीव आवळे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या उत्साही व्यक्तिमत्ताचा दाखला दिला होता. तुम्ही आता मला वडिलधारे म्हणू शकता, असं पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“कल्याणराव, सगळ्यांना एकत्र घेऊ म्हटलंय हं”

“सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊन निर्णय घेऊ. कल्याणराव, सगळ्यांना म्हटलंय हं.. सगळ्यांना बरोबरीत घेऊन निर्णय घेऊ. सगळे येतात, एकत्र चर्चा करतात, त्याचं काय वेगळं होणार आहे का?” असं पवार मिश्किलपणे म्हणाले.

कल्याणराव काळे काय म्हणाले?

कल्याणराव काळे यांनी या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु, असं काळे म्हणाले. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण  यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज सकाळी सरकोली येथे आले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष (Sharad Pawar on Kalyanrao Kale in Pandharpur)

सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचा भाजपला पहिला झटका, नेते कल्याण काळे घड्याळ बांधणार?

(Sharad Pawar on Kalyanrao Kale in Pandharpur)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.