‘हाँ! मी अमित शाह आणि उद्योगपतींना भेटलो…’, अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

निवडणूक 2024 ची आहे, पण राजकारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुन सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्या घटना घडल्या आहेत त्यावरुन अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत दावा केलाय. त्या दाव्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'हाँ! मी अमित शाह आणि उद्योगपतींना भेटलो...', अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण
शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 4:29 PM

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे निवडणूक 2024 ची आहे, पण राजकारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुन सुरु आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्या घटना घडल्या आहेत त्यावरुन अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत दावा केलाय. त्या दाव्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते, असा दावा अजित पवारांनी पुन्हा एकदा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित बैठकीनंतरच आपण भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं होतं, असा दावा अजित पवारांनी केलाय. पण शरद पवारांनी संबंधित दावा फेटाळला आहे.

“विधानसभा निवडणुकीनंतर मी अनेक केंद्रीय मंत्री आणि उद्योगपतींना भेटलो होतो, पण कोणत्याही प्रकारे सरकार बनवण्याबाबत चर्चा झाली नव्हती. या भेटीगाठींवेळी अजित पवारही माझ्यासोबत होते. त्यावेळी केवळ महाराष्ट्र आणि कृषी विभागाशी संबंधित चर्चा झाली होती”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता त्यांनीदेखील आपल्या वक्तव्यावर पलटी घेतली आहे. आपल्या वक्तव्याला मोडूनतोडून दाखवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. गौतम अदानी यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीदेखील आपल्याला या भेटीबाबत काहीच कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार आता काय म्हणाले?

अजित पवार यांनी बीडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. गौतम अदानी आणि त्यावेळच्या सरकार स्थापनेचा दुरान्वयही संबंध नाही. लोक तथ्यांना चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत. त्यांना राजकारणाशी काहीच देणंघेणं नाही.” अजित पवार यांच्या या वक्तव्याने त्यांनी अदानी यांच्याबाबतच्या वक्तव्यावर माघार घेतल्याचं चित्र आहे. पण त्यांनी भाजप नेत्यांसोबत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचा दावा फेटाळलेला नाही.

हे सुद्धा वाचा

भाजपसोबत शरद पवारांनी खरंच चर्चा केली होती का?

महाराष्ट्र विधानसभेची 2019 ची निवडणूक ही प्रचंड राजकीय घडामोडींची ठरली होती. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर ठाम राहिली. महायुतीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. शिवसेनेचा हा दावा भाजपला मान्य नव्हता. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या. या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्यानुसार तीनही पक्षांचे नेते रात्रीच्या बैठकीनंतर सकाळी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार होते. पण त्याआधीच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

या घटनेमुळे महाराष्ट्राची जनता देखील चक्रावली होती. राजकारणात काय सुरु आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या घटनेमुळे शरद पवारांवरचा दबाव वाढला. त्यामुळे शरद पवारांनी आपण अजित पवार यांच्या भूमिकेसोबत नसल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर अवघ्या 36 तासांत शिवसेनाज-राष्ट्रवादीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर ठरल्यानुसार महायुतीचं सरकार कोसळलं होतं. पण त्यानंतर दोन वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत शरद पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेबाबत 2019 मध्ये बैठका झाल्याचं सांगत राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यानंतर शरद पवारांनी देखील आपण गुगली टाकण्यासाठी आणि भाजपचं खरं रुप दाखवण्यासाठी त्यांना भेटल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....