पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (sharad pawar reaction on Nana Patole resigned as the speaker of Legislative Assembly)

पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 4:28 PM

मुंबई: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी अवघ्या तीन शब्दात त्यावर भाष्य करून बॉम्बगोळा टाकला आहे. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं होतं आता ते खुलं झालं आहे, असं पवारांनी म्हटलं. पवारांचे हे तीन शब्द म्हणजे ठाकरे सरकारमध्ये उलथापालथ होण्याचे संकेत असल्याचंही बोललं जात आहे. (sharad pawar reaction on Nana Patole resigned as the speaker of Legislative Assembly)

पवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं असल्याने आता ते खुलं झालं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार? यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. पवारांनी अत्यंत मोजक्याच शब्दात पण अत्यंत मुद्देसुद भाष्य केलं आहे. पवारांची ही तीन वाक्ये काट्यासारखी टोकदार असल्याने त्याने आघाडीतल कोणता पक्ष घायाळ होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्षपदावर दावा करणार?

शरद पवार यांनी विधानसभेचं अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आणि आता ते खुलं झालं आहे, असं दुसरं वाक्य म्हटलं. आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेत अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची डील झाल्याची चर्चा होती. पण पवारांच्या या वाक्याने त्याला वेगळाच रंग मिळाला आहे. पवारांनी अध्यक्षपद खुलं झाल्याचं सांगितल्याने राष्ट्रवादीही या पदासाठी दावा करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तर विधानसभा अध्यक्षपद आपल्यालाच मिळेल या शिवसेनेच्या मनसुब्यावरही पवारांनी बोळा फिरवला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या एका पदावरून आघाडीत काय उलथापालथ होते, याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे.

उपमुख्यमंत्रीपद मिळणार की नाही?

विधानसभा अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये समझोता झाला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पवारांनी आता विधानसभा अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचाही दावा केल्याने काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदावबाबत गुगली टाकण्यामागे पवारांची नेमकी खेळी काय असेल हे येत्या काळातच समजून येईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

चर्चा कुठल्या मुद्द्यावर

आघाडीतील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलं होतं. पण आता विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याची गुगली पवारांनी टाकली आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाला द्यावं यावर चर्चा होणार की अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे द्यावं यावर चर्चा होणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याशिवाय ही चर्चा कुणामध्ये होणार? आणि कधी होणार? याबाबतची उत्सुकताही ताणली गेली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sharad pawar reaction on Nana Patole resigned as the speaker of Legislative Assembly)

वडेट्टीवार विरुद्ध थोरात

दरम्यान, काँग्रेसमध्येही विजय वडेट्टीवार विरुद्ध बाळासाहेब थोरात असा एक गट आहे. थोडक्यात पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असा हा वाद आहे. विशेष म्हणजे थोरात आणि वडेट्टीवार हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद देताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याला देऊ नये असा काँग्रेसचा सूर राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद दिल्यास राष्ट्रवादीच्या विस्तारात अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राष्ट्रवादीकडून थोरातांऐवजी वडेट्टीवारांच्या नावाल संमती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. (sharad pawar reaction on Nana Patole resigned as the speaker of Legislative Assembly)

संबंधित बातम्या:

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंना ना ना? अमित देशमुखांचं नाव चर्चेत, काय घडतंय पडद्याआड?

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल होण्याची वेळ आली; निलेश राणेंकडून राजकीय भूकंपाचा इशारा?

(sharad pawar reaction on Nana Patole resigned as the speaker of Legislative Assembly)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.